मोदी सरकारवर जनता नाराज नाही तर रागावलीय प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे टीकास्त्र

सरकारने लाजेखातर म्हणून आज पेट्रोल-डिझेलचे दर कमी केले असल्याची जोरदार टिका करत देशातील जनता नाराज नाही तर ती मोदींवर रागावली आहे. कारण त्यांनी देशातील जनतेला फसवलं आहे. त्यामुळे ही जनताच बदला घेईल हे निश्चित असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील केले. ठाणे येथे आय़ोजित कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
आपला लढा हा सेना-भाजपबरोबर आहे असे सांगतानाच भाजपाच्या मागे फरफटत जाणाऱ्या सेनेचा आणि त्यांच्या प्रमुखांचा चांगलाच समाचार घेतला. जयंत पाटील यांनी आपल्या भाषणामध्ये अनेक मुद्यांना हात घातला शिवाय कार्यकर्त्यांमध्ये नवसंजीवनी भरण्याचेही काम केले.या मेळाव्यामध्ये माजी मंत्री गणेश नाईक, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मार्गदर्शन केले. तर या मेळाव्याचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी केले.
गेले दोन दिवस प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील आणि माजी मंत्री गणेश नाईक यांचा संयुक्त दौरा सुरु असून या दौऱ्याला कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आज अंबरनाथ, भिवंडी आणि शेवटी ठाणे शहरामध्ये कार्यकर्ता मेळावा पार पाडला. भिवंडीमध्ये निरीक्षक नसीम सिद्दीकी,नगरसेवक खालीद गुड्डू आदींसह इतरप्रमुख पदाधिकारीउपस्थित होते.
ठाणे शहर कार्यकर्ता मेळाव्याला प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील,माजी मंत्री गणेश नाईक, आमदार जितेंद्र आव्हाड,प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद,जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे,निरिक्षक हिंदूराव अशोक पराडकर, नगरसेवक नजीब मुल्ला, महिला जिल्हाध्यक्षा करीना दयालानी, माजी महापौर मनोहर साळवी, ठाणे विरोधी पक्षनेता मिलिंद पाटील, गटनेते हणमंत जगदाळे, ओबीसी सेलचे अध्यक्ष राज राजापूरकर, युवक अध्यक्ष मंदार केणी, विदयार्थी अध्यक्ष अभिजित पवार, युवती अध्यक्षांसह सर्व सेलचे अध्यक्ष,पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

About Editor

Check Also

मनसेच्या माजी नगरसेविका स्नेहल- सुधीर जाधव पती पत्नीचा शिंदेच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश संपन्न

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या – मनसे माजी नगरसेविका स्नेहल जाधव आणि त्यांचे पती माजी नगरसेवक सुधीर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *