Breaking News

अखिलेश यादव यांचा ओम बिर्लांना खोचक शुभेच्छा, सभागृह तुम्ही चालवावे, पण उलट घडू नये लोकसभा अध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर अखिलेश यादव यांची प्रतिक्रिया

१८ व्या लोकसभेच्या अध्यक्ष पदी ओम बिर्ला यांची निवड झाली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ओम बिर्ला यांना लोकसभा अध्यक्ष पदाच्या खुर्चीवर नेऊन विराजमान केले. त्यानंतर सत्ताधारी पक्षाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओम बिर्ला यांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर अखिलेश यादव यांनी शुभेच्छा पर भाषण देताना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना खोचक शब्दात शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोलताना अखिलेश यादव म्हणाले की, नवीन लोकसभेत खासदारांचे निलंबन आणि हकालपट्टी यासारख्या कृती होणार नाहीत. खासदारांच्या निलंबनासारख्या कृतीमुळे सभागृहाच्या प्रतिष्ठेला धक्का बसला आहे. कोणत्याही लोकप्रतिनिधीचा आवाज दाबला जाणार नाही, तसेच हकालपट्टीसारखी कारवाई पुन्हा होणार नाही, अशी आमची अपेक्षा आहे. तुमचे नियंत्रण विरोधी पक्षावर आहे, पण ते सत्ताधाऱ्यांवरही असले पाहिजे,” असा चिमटाही यावेळी ओम बिर्ला यांना काढला.

अखिलेश यादव यांनी मागील संसदेच्या गेल्या हिवाळी अधिवेशनातील खासदारांच्या विक्रमी निलंबित करण्याच्या घटनांचा संदर्भ देत म्हणाले की, टीएमसी खासदार महुआ मोईत्रा यांचीही नैतिक गैरवर्तणुकीच्या कारणास्तव हकालपट्टी करण्यात आली.

पुढे बोलताना अखिलेश यादव म्हणाले की, निपक्षपातीपणा ही या महान पदाची मोठी जबाबदारी आहे.” विरोधी पक्षांप्रती सभापती निष्पक्ष राहतील अशी अपेक्षा व्यक्त करत म्हणाले की, सभा तुमच्या इशाऱ्यावर चालली पाहिजे, उलटपक्षी सभागृहाने तुम्हाला चालविले नाही पाहिजे असे सांगत आम्ही तुमच्या सर्व न्याय्य निर्णयांच्या पाठीशी उभे आहोत… मला आशा आहे की तुम्ही सत्ताधाऱ्यांचा जितका आदर करता तितकाच तुम्ही विरोधकांचाही आदर कराल,” अशा खोचक शब्दात ओम बिर्ला यांना शुभेच्छा दिल्या.

अखिलेश यादव म्हणाले, तुम्ही लोकशाही न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून येथे बसला आहात अशी शेवटी आठवणही करून दिली.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत