विधानसभेच्या उपाध्यक्ष पदी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे अण्णा बनसोडे यांची निवड झाली. यावेळी अभिनंदनचा प्रस्ताव सरकारकडून मांडण्यात आल्यानंतर विरोधकांकडून भास्कर जाधव बोलताना म्हणाले की, अधिवेशन संपत आले. आज शेवटचा दिवस आहे. उपाध्यक्ष पदाची निवड झाली, मात्र विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्याची निवड का नाही झाली? असा सवाल उपस्थित केला.
विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी भास्कर जाधव यांच्या नावाचे पत्र शिवसेना उबाठा पक्षाकडून पत्र देण्यात आले. मात्र त्यानंतरही यासंदर्भात राज्य सरकारने अद्याप कोणतीही कारवाई केली नाही.
भास्कर जाधव पुढे म्हणाले, विरोधी पक्षनेते पदासाठी संख्याबळ लागतं असा कुठेही नियम नाही आहे. यापूर्वीचे हे काही संदर्भ दिले. आम्ही विधमंडळ सचिवाला पत्र दिले. त्यावेळी विधिमंडळ सचिवाने सांगितले की, संख्याबळाचा असा कुठेही नियम नाही. मग असे असताना अजून पर्यंत विरोधी पक्षनेते पदाची निवड का होत नाही? जर भास्कर जाधव विरोधी पक्षनेते पदासाठी सभागृहाला नको आहे. तर मी माझं पत्र मागे घेतो. असा नाराजीचा सूर भास्कर जाधवांनी आळवला. आणि आमच्या पक्षाकडून किंवा महाविकास आघाडीकडून दुसरी कुठल्या तरी नावाचे पत्र देतो. पण विरोधी पक्षनेते म्हणून भास्कर जाधव नको. हे जर सत्ताधाऱ्यांना वाटत असेल तरी ही भावना चुकीचे आहे. पण एवढे सरकारकडे बहुमताचा आकडा असतानाही विरोधी पक्षाला सरकार का घाबरत आहे. विरोधी पक्ष नेतेपदाची निवड अजून का करत नाही?, असा संतप्त सवालही यावेळी केला.
एका वृत्तपत्राने विधानसभेत लक्षवेधी, तारांकित प्रश्न लावण्यासाठी पैसे घेत असल्याची वृत्त प्रकाशित केले. त्या मुद्यावरून आमदार भास्कर जाधव यांनी लक्षवेधी लावण्यात सत्ताधारी पक्षावर गंभीर आरोप केले. लक्षवेधी लावण्यासाठी सत्ताधारी पक्षातील आमदार विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयात जाऊन कर्मचारी, अधिकाऱ्यांना म्हणतात की, आमची लक्षवेधी लावण्यासाठी किती पैसे पाहिजेत सांगा. पण आमची लक्षवेधी लावा असं म्हणतात. असा गंभीर आरोपही यावेळी केला. याबाबत वृत्तपत्रामध्ये बातमी आली आहे. त्याचा हा पुरावा आहे. मी जबाबदारीने बोलतोय आणि याची चौकशी व्हावी अशी मागणीही यावेळी केली.
भास्कर जाधव यांच्या आरोपावर मध्येच उपमुख्यमंत्री अजित पवार हे बोलायला उठले आणि म्हणाले की, आम्हाला जनतेने निवडून दिले आहे. या ठिकाणी संविधानाने लोकशाही मार्गाने सभागृहातील कामकाज चालते. पण भास्कर जाधव आणि जे गंभीर आरोप केलेत. हे काही योग्य नाही. हे सभागृहाच्या रेकॉर्डवरून काढून टाकावे. पण यात जे कोणी दोषी असतील. कर्मचारी दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल… गुन्हा दाखल करण्यात येईल, असं सांगितले. भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनीही भास्कर जाधवाच्या आरोपावर आक्षेप घेत हे रेकॉर्डवरून काढून टाकण्यात यावे. दरम्यान यावेळी सभागृहात दोन्हीकडून गोंधळ झाल्यामुळे विधान सभागृहाचे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.
विधानसभेत उपाध्यक्षांची निवड झाली पण विरोधी पक्षाचा कधी होणार? असा सवाल विरोधी पक्षातील आमदार भास्कर जाधव, आमदार विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. यावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांनी खंबीर भूमिका मांडली पाहिजे. मीही विरोधी पक्षनेता होतो. विरोधी पक्षनेते पदासाठी माझा विरोध नाही. हा निर्णय माझा नाही. विधानसभा अध्यक्षांचा आहे. तो निर्णय घेतील तो मला मान्य आहे. पण विरोधी पक्ष समाधानी झाला तर तो कधीच तो प्रगती करू शकत नाही. असा चिमटा मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांचा काढला.
Marathi e-Batmya