सुप्रिया सुळे यांची स्पष्टोक्ती, मला आनंदच आहे पण तो त्यांचा प्रश्न महाराष्ट्रात आजही हुंडाबळी होतायेत हे एक समाज म्हणून आपलं अपयश

शरद पवार यांच्या नेतृत्वात सव्वीस वर्षांपूर्वी पक्षाची स्थापना झाली, आणि हा २६ वर्षांचा प्रवास संपूर्ण महाराष्ट्राने तसेच देशाने पाहिला आहे. त्यामुळे वर्धापन दिनाबद्दल वेगळं काही बोलण्याची आवश्यकता आहे, असं मला वाटत नाही. संघटना ही नेत्यांमुळे तर चालतेच, पण कार्यकर्ते हा सगळ्यात महत्वाचा घटक आणि त्यातला केंद्रबिंदू असतो. कारण तो रस्त्यावर झेंडा घेऊन झुंज देत असतो. असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

पुढे बोलताना सुप्रिया सुळे बोलताना म्हणाल्या की, राज्यात मोठ्या प्रमाणात महिलांवरचे अत्याचार महाराष्ट्रात वाढत आहेत, हे अत्यंत धक्कादायक आहे. म्हणजे, एकीकडे आपण कृत्रिम बुद्धिमत्तेची एआयवर AI चर्चा करतो आहोत, तर दुसरीकडे आपल्या महाराष्ट्रात आजही हुंडाबळी होतायेत हे एक समाज म्हणून आपलं अपयश असल्याची भावनाही यावेळी बोलून दाखविली.

सुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या की, काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत लेख लिहिला आहे. त्या लेखात महाराष्ट्रातील निवडणुकीत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केल्याचा आरोप केला आहे. त्यावर पवार साहेब आणि माझी चर्चा झाली. इलेक्शन कमिशन कडून काय उत्तर येतंय याची वाट पाहत आहोत असेही सांगितले.

पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येऊन जर राज्याची सेवा करणार असतील तर अतिशय आनंदाची गोष्ट आहे. लोकशाहीत कोणाला कुणासोबत जायचे, याचा पूर्ण अधिकार आहे. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येत असल्यास आनंद वाटणार. माझ्याही मनात तेच आहे, पण शेवटी तो त्यांचा विषय असल्याचेही यावेळी सांगितले.

राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार असतील किंवा उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकत्र येणार असतील, तर आम्ही का स्वागत करणार नाही? असा प्रतिप्रश्न सुप्रिया सुळे यांनी केला. यावेळी पत्रकारांनी राज ठाकरे महाविकास आघाडीत सामील होणार का, अशा आशयाचा प्रश्न विचारला. यावर, सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आता बघुया. महाष्ट्राच्या हितासाठी ते येणार असतील, तर मी अर्थातच त्याचे स्वागत करीन. एकत्र येणे हा एका सशक्त लोकशाहीमध्ये तो प्रत्येक संघटनेला अधिकार असल्याचे म्हणाल्या.

शेवटी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, बाळासाहेब ठाकरे यांनी फार कष्ट करून शिवसेनेची स्थापना केली. बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली कष्टाने कार्यकर्ते आणि नेत्यांमुळे तो पक्ष बांधला. दुर्दैवाने जी गोष्ट झाली ती झाली. परंतु, आज आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊन महाराष्ट्राची सेवा करणार असतील, तर ती अतिशय आनंदाची गोष्ट असल्याचेही यावेळी सांगितले.

About Editor

Check Also

माणगाव, तळा व म्हसळातील आदिवासी लाभार्थ्यांसाठी घरकुलासाठीचा प्रस्ताव सादर करा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे आदेश

माणगाव, तळा व म्हसळा नगरपंचायत हद्दीतील अनुसूचित जमातीच्या पात्र लाभार्थ्यांना आदिवासी घरकुल योजना (शहरी) अंतर्गत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *