पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानस्थित दहशतवादी तळावर हल्ले करून उद्धवस्त केले. तत्पूर्वी बिहारमध्ये निवडणूक रॅलीला संबोधित करण्यासाठी गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेरे शरीर मे खून नही तो गरम सिंदूर बह रहा है असे वक्तव्य करत उपस्थित समुदायाला भावविवश केले. त्यास तीन चार महिनेच उलटून जात नाहीत तोवर भारत पाकिस्तानमधील क्रिकेट सामन्याला केंद्र सरकारला परवानगी दिली. त्यावरून शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर हल्लाबोल करत सडकून टीका करत आता गरम सिंदूरचं आता काय कोल्ड्रिंक्स झाल काय ? असा सवालही पंतप्रधान मोदी यांना केला.
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, कबुतरं, कुत्रे आणि हत्तीणीसाठी लोक रस्त्यावर उतरतात, मात्र हिच माणूसकी जेव्हा पहलगाममध्ये लोक मारले गेले तेव्हा कुठे गेली होती असा सवालही यावेळी करत तसेच आता पाकिस्तानबरोबर भारताची टीम क्रिकेट खेळणार आहे. मग कुठे गेला सिंदूर ? असा खोचक सवालही यावेळी केला.
उद्धव ठाकरे म्हणाले की, दोन तीन महिनेच झाले, आपले संरक्षण मंत्री म्हणाले होते की, आपले ऑपरेशन सिंदूर थांबलेले नाही तर पंतप्रधान मोदी म्हणाले की, रक्त आणि पाणी एकत्रित वाहणार नाही.आनंदाची गोष्ट आहे. मेरी रगो रगो मे खून नही गर्म सिंदूर बह रहा है मग त्या गरम सिंदूरचं आता कोल्ड्रिक्स झालं का? तुम्ही क्रिकेट खेळायला परवानगी देता? आपल्या देशाची टीम आता पाकिस्तानबरोबर क्रिकेट सामने खेळणार मग कुठे सिंदूर कुठे गेला ? तुम्ही घराघरात वाटला ना सिंदूर मग तो सिंदूर कुठे गेला? कशाला भाकडकथा करता ? असा खोचक सवालही पंतप्रधान मोदी आणि भाजपाला केला.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, प्रत्येक प्रश्नावेळी डोक्यावर बर्फ आहे, काय करू ? असा सवाल करत तसं थंडपणा आपल्याला परवडणारा नाही. माझी उंची हिमायलाची असली तरी जिगर सह्याद्रीची आहे. आपण सध्या शिक्षणाचा दर्जा आपण का उंचावत नाहीत. आमचा कोणत्याही भाषेला, हिंदीलाही विरोध नाही. परंतु आमचा सक्तीला विरोध असून सक्ती कशासाठी ?, आता माझ्यापेक्षा चांगले हिंदी पंतप्रधान मोदी बोलतात, मग ते कोणत्या शाळेत शिकले ? त्यांनाही पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती होती का ? मग तरीही आश्वासन देण्यापुरतं चांगलं हिदी येत ना असा उपरोधिक टोलाही यावेळी पंतप्रधान मोदी यांना लगावला.
Shivsena LIVE | ज. मो. अभ्यंकर ह्यांच्या विधानपरिषद सदस्यत्व वर्षपूर्ती निमित्त कार्य पुस्तीकेचे प्रकाशन! | UddhavSaheb Thackeray | छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर, दादर https://t.co/B72Cl2PyPB
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) August 23, 2025
उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, पंतप्रधान मोदी काल बिहारमध्ये गेले होते. तेव्हा ते म्हणाले की, विरोधक हे घुसखोरांना आणि भ्रष्टाचाऱ्यांना संरक्षण देण्यासाठी त्यांचा बचाव करण्यासाठी पुढे आले आहेत. मला त्यांना सांगायचाय की, तुम्ही जेव्हा महाराष्ट्रात येता तेव्हा तुमच्या आजबाजूला जो दंभ मेळा असतो, कुंभमेळा वेगळा आणि दंभ मेळा वेगळा असतो. तुम्ही ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोपी कोण ? आदर्श घोटाळ्याचा आरोप कोणी केला ? त्यानंतर दुसऱ्या दिवशी अशोक चव्हाण लगेच तिकडे गेले, मग तुम्हीच सांगा कोण कोणाचं संरक्षण करत असे सांगत पंतप्रधान मोदी आणि भाजपाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले.
बांग्लादेशी घुसखोरांच्याबाबत भाजपाच्या आरोपाबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, शेख हसीना यांना तुम्ही आश्रय दिला. आम्ही नाही. बांग्लादेशींना तुम्ही विरोध करता आणि बांग्लादेशातून पळून आलेल्या माजी पंतप्रधानांना तुम्ही आश्रय देता ? भ्रष्टाचाऱ्यांना उपमुख्यमंत्री पद आणखी काही पदे देता, खरं तर मला यांची कीव येते. आता आपल्याकडे कबुतरासाठी हजारो लोकं रस्त्यावर उतरतात. कुत्र्यासाठीही हजारो रस्त्यावर उतरतात, चांगली गोष्ट आहे. माणुसकी पाहिजे, मग ही माणुसकी जेव्हा पहलगाममध्ये आपले काही लोक मारले गेले ज्या माता भगिनींचा सिंदूर पुसला गेला, तेव्हा माणुसकी कुठे जाते ? असा सवालही यावेळी केला.
Marathi e-Batmya