कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी स्थानिक नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आमसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी नागरिक आपापल्या भागातील समस्या मांडत होते. त्यावेळी कार्यक्रमस्थळी उपस्थित असलेले अधिकारीही नागरिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देत समजूत काढण्याचा प्रयत्न करत होते. मात्र एका नागरिकांने उपस्थित केलेल्या प्रश्नावर एका अधिकाऱ्याने उत्तर देण्याचा प्रयत्न केला असता रोहित पवार हे चांगलेच संतापले आणि भर आमसभेतच अधिकाऱ्यावर संताप व्यक्त करत आतापर्यंत गोट्या खेळत होतास? खिशातला हात काढ, मिजासखोर आधी शब्दात आपला संताप व्यक्त केल्याचे दृष्य पाह्यला मिळत होते.
जामखेडमधील एका नागरिकाने तो ज्या परिसारत राहतो तिथल्या गटाराची समस्या आमसभेत मांडताना सांगितले की, आमच्या घराच्या मागे बाजार आहे, तिथून थेट पाणी आमच्या घरात शिरतंय. कारण तिथे गटाराची काम झालेली नाहीत. त्यावर रोहित पवार यांनी त्यासाठी ८० कोटीचा निधी मंजूर करून घेतला आहे. त्यावर अधिकाऱ्यांनी स्थानिकांना सांगितले की, तुमच्या गटाराचं काम चालू आहे. यावर पुन्हा स्थानिक नागरिकांने सांगितले की, काम चालू आहे. पण अत्यंत निकृष्ट दर्जाच काम आहे. त्या कामावर कुठल्याही अधिकाऱ्यांचं लक्ष नाही. कंत्राटदार त्याच्या मनाने वाट्टेल तसे काम करत करतोय असे सांगत त्यांच्याकडील फोटो आणि व्हिडिओ दाखवले.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) September 19, 2025
यावर उत्तर देण्यासाठी अधिकारी उत्तर देण्यासाठी उभे राहिले. त्यावर स्थानिकांनी विचारलं की, सदर कामांवर तुमचा अधिकारी हे का? यावर अधिकारी म्हणाले की, आम्ही विविध कामावर सुपर व्हायजर कन्सल्टंट नेमले आहेत. सदर कामावर दोन माणंस नेमली आहेत. तुम्ही म्हणताय तशी स्थिती नाही. दोन जण लक्ष ठेवून आहेत असे सांगितले. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी पुन्हा एकदा त्यांच्याकडील पुरावे म्हणून फोटो आणि व्हि़डीओज दाखवले आणि म्हणाले की, हे काही दुसऱ्या कामाचे फोटो नाहीत. तुमच्याच ड्रेनेज लाईनच्या कामाचे फोटो आहे. इथे तुमचा सुपरवाईजर आहे का? त्यावर अधिकारी म्हणाले, आम्ही खराब काम करत नाही. हवं तर उद्या तिथं जावून चेंबर पाहु असे सांगितले. अधिकाऱ्यांच्या या उत्तरावर रोहित पवार संतापून म्हणाले की, एवढे दिवस तू काय गोट्या खेळत होतास ? याकडे गांभीर्याने बघ आणि काम कर,
संतापलेले आमदार रोहित पवार नेमके अधिकाऱ्याला काय म्हणाले…
ए…आजपर्यत तू गोट्या खेळात होतास का? हे बावळट लोक आहे का ? हि माणसं वेडी आहेत का? खिशातला हात आधी काढ. लय शहाणा बनू नको. खूप मोठं काम करतोयस ते आम्हाला माहित आहे. मिजासखोर बनू नकोस. लोकांनी दाखवलेलं काम खराब आहे. हा तुमच्या बापाचा पैसा नाही. तु कुठलाही असशील, परंतु या लोकांना इथेच राहायचं आहे. ही खराब काम आहेत आणि तू उद्या बघतो, करतो अशी उत्तर देतोयस. तुझे व तुझ्या अधिकाऱ्यांचे पराक्रम आम्हाला माहित आहेत. तू त्या कामावर कन्सलटंट लाव आणि चांगल्या दर्जाचं काम कर जास्त अहंकार दाखवू नको, उद्या ही माणसं पिसाळली तर तुला फिरता येणार नाही असा सज्जड दमही भरला.
Marathi e-Batmya