काँग्रेसच्या AICC नेत्यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची घेतली भेट महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीला अभूतपूर्व यश

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत वंचित बहुजन आघाडीला अभूतपूर्व यश मिळाले असून फुले–शाहू–आंबेडकरवादी विचारधारेवर विश्वास ठेवणाऱ्या वंचित बहुजन आघाडी, महिला आघाडी, युवा आघाडी तसेच सम्यक विद्यार्थी आंदोलनातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या एकत्रित मेहनतीमुळे ७० पेक्षा अधिक नगरसेवक निवडून आले आहेत. या सर्व निवडून आलेल्या उमेदवारांचे अभिनंदन करण्यात येत असून, हा विजय घडवून आणणाऱ्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत.

या पार्श्वभूमीवर दिल्ली मधून ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे सेक्रेटरी व्यंकटेश आणि काँग्रेस मुंबई कमिटीतील काही पदाधिकाऱ्यांनी दादर, मुंबई येथील राजगृह निवासस्थानी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, युवा नेते सुजात आंबेडकर तसेच पक्षाचे रणनितीकार सुमित आनंद उपस्थित होते.

प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेस सेक्रेटरी व्यंकटेश यांच्यात यावेळी बैठक झाली. या बैठकीत काँग्रेसकडून स्थानिक स्वराज्य संस्था तसेच राष्ट्रीय पातळीवरील काही प्रस्ताव मांडण्यात आले. मात्र, या प्रस्तावांबाबत अद्याप कोणतीही अंतिम स्पष्टता झालेली नसल्याचे सांगण्यात आले असून, योग्य वेळी याबाबत प्रकाश आंबेडकर माहिती देतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

या संदर्भात प्रतिक्रिया देताना वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर म्हणाले, “आज समाधान आणि आनंद यासाठी आहे की या निमित्ताने काँग्रेस पक्षाला हे भान आले आहे की भाजपाच्या विरोधात ते एकटे लढू शकत नाहीत. भाजपा व आरएसएसला पराभूत करण्यासाठी महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीशिवाय कोणतेही राजकारण शक्य नाही.”

About Editor

Check Also

रविंद्र चव्हाण यांचा इशारा, भिवंडी महापौर निवडणुकीत बंडखोरी करणा-यांवर कारवाई भाजपामधून फुटून सेक्युलर फ्रंटमध्ये सहभागी होणाऱ्या नगरसेवकांवर कारवाईचा इशारा

भिवंडी निजामपूर महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या पक्षादेशा (व्हीप) विरोधात बंडखोरी करणा-या नारायण चौधरी आणि त्यांच्याबरोबरच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *