महिला शेतकऱ्यांसाठी २३ जानेवारी रोजी मुंबईत चर्चासत्राचे आयोजन कृषी विभाग आणि एमएस स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशन यांचा संयुक्त उपक्रम

महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागाने आणि एमएस स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशन (एमएसएसआरएफ) यांच्या संयुक्त विद्यमाने महिला शेतक-यांच्या विविध विषयाच्या अनुषंगाने २३ जानेवारी २०२६ रोजी चर्चा सत्र होणार आहे.या चर्चा सत्राचे उद्घाटन कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, राज्य कृषी मंत्री ॲड आशिष जयस्वाल यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह येथे हॉल क्रमांक ४ येथे सकाळी १० वाजता होणार आहे.

महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागाने आणि एमएस स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशन (एमएसएसआरएफ) यांच्यात आणि महिला सक्षमीकरण, संसाधन हक्क, पोषण सुरक्षा, लिंग न्याय, पर्यावरणीय शाश्वतता आणि शेतकरी समृद्धी मजबूत करण्यासाठी मदत करणारे व्यापक धोरण तयार करण्यासाठी आणि अंमलबजावणी कार्यक्रमांची आखणी करण्यासाठी संयुक्तपणे सामंजस्य करार केला आहे. या करारातंर्गत शेतकरी महिलांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

याच उपक्रमातंर्गत या विविध विषयावर चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चा सत्राला कृषि विभागाचे अपर मुख्य सचिव विकास चंद्र रस्तोगी, एमएस स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ.सौम्या स्वामीनाथन, कुमारीबाई, व्दारकाताई, सल्लागार समितीचे डॉ.गोविंद केळकर,सीमा कुलकर्णी, एमएस स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशनच्या कार्यकारी संचालक डॉ. आर. रेंगलक्ष्मी, श्रीमती मीरा सौदरराजन यांची व्याख्याने होणार आहेत. हे चर्चा सत्र सकाळी १० ते २ या वेळेत होणार आहे.

About Editor

Check Also

बाजारपेठेची स्‍थिरता कृषी विकासाची किल्ली संस्थात्मक वित्तीय संरचनेद्वारे एआय फॉर अॅग्रीला गती देणारे ‘ट्रस्ट इंजिन’ या परिसंवादात तज्ज्ञांचे मत

कृषी क्षेत्रात शासनाची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. यासोबतच बाजारपेठ मजबूत राहणेही गरजेचे आहे. उत्पादनाचे प्रमाण, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *