भारत बंद आंदोलनात हे ११ राजकिय पक्ष होणार सहभागी संयुक्त निवेदन जाहीर

मुंबई : प्रतिनिधी

चर्चेविना केंद्र सरकारने आणलेल्या शेतकरी विधेयकांच्या विरोधात दिल्लीत आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांनी ८ डिसेंबर २०२० रोजी भारत बंदची हाक दिली. त्या हाकेला प्रतिसाद देत देशभरातील ११ राजकिय पक्षांनी पाठिंबा देत त्यात सहभागी होणार असल्याचे संयुक्त पत्रकही काढण्यात आले.

या भारत बंद आंदोलनात काँग्रेसने सक्रिय सहभाग घेणार असल्याचे जाहीर केले असून त्यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल, पीएमजीडी, सीपीआयएम, सीपीआयएमएल, आरएसपी, डिएमके, समाजवादी पार्टी, सीपीआय, एआयएफबी आदी ११ राजकिय पक्षांनी पाठिंबा देत या आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला असून तसे संयुक्त परिपत्रक ही काढले आहे.

About Editor

Check Also

बाजारपेठेची स्‍थिरता कृषी विकासाची किल्ली संस्थात्मक वित्तीय संरचनेद्वारे एआय फॉर अॅग्रीला गती देणारे ‘ट्रस्ट इंजिन’ या परिसंवादात तज्ज्ञांचे मत

कृषी क्षेत्रात शासनाची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. यासोबतच बाजारपेठ मजबूत राहणेही गरजेचे आहे. उत्पादनाचे प्रमाण, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *