Breaking News

देशाची नैसर्गिक शेतीकडे वेगाने वाटचाल

देशातील शेतकरी बंधू-भगिनींना सबळ बनवण्यासाठी वचनबद्ध आहोत. याच अनुषंगाने, दिल्लीत पिकांच्या 109 नवीन वाणांचे उद्घाटन करण्याची संधी मिळाली. या हवामानानुरुप आणि भरघोस पीक देणाऱ्या वाणांच्या उत्पादनात वाढ झाल्यामुळे आपल्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही वाढ होईल, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. नवी दिल्लीत आज पिकांच्या 109 नवीन वाणांचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.

शेतकरी नैसर्गिक शेतीकडे वळत असल्याबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले. त्यांनी यावेळी शेतकऱ्यांचे अनुभवही ऐकले आणि नैसर्गिक शेतीच्या लाभांबाबत सविस्तर चर्चा केली. “मला समाधान आहे की आमचे शेतकरी बंधू-भगिनीही नैसर्गिक शेतीकडे वेगाने वाटचाल करत आहेत. आज त्यांचे अनुभव जवळून जाणून घेण्याची संधी मिळाली. यावेळी आम्ही नैसर्गिक शेतीच्या फायद्यांवरही सविस्तर चर्चा केली.”

Check Also

एकात्मिक कापूस,सोयाबीन व इतर तेलबियांसाठी ऑनलाईन अर्ज केला का? उत्पादकता वाढ व मूल्यसाखळी विकास योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे राज्य सरकारचे आवाहन

कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया आधारित पीक पद्धतीस चालना देवून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करुन कापूस, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *