कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ५०० रुपये अनुदान द्या शिवसेनेची मागणी

मुंबई: प्रतिनिधी

राज्यातील उन्हाळी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने ५०० रुपये अनुदान द्यावे अशी मागणी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मंत्रिमंडळ बैठकीत केली आहे.

मध्य प्रदेश सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रति क्विंटल  ८०० रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. याच धर्तीवर राज्यातही भावांतर योजना लागू करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. सध्या द्राक्षे डाळिंब लसूण या शेतीमाल खरेदी आणि निर्यात करणार्यां व्यापारी वर्गाला २५ ते ३० टक्के वाहतूक अनुदान दिले जाते. कांद्यांची खरेदी आणि निर्यात करणाऱ्यांना ही वाहतूक सवलत दिली जावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

About Editor

Check Also

शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी काँग्रेस पक्षाची सोमवारी ३० मार्चला ‘शेतकरी संघर्ष न्याय यात्रा’ प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या नेतृत्वाखाली धाराशीव जिल्ह्यातील सुरतगाव ते तुळजापूर यात्रा, ज्येष्ठ नेते, पदाधिकारी व शेतकऱ्यांचा यात्रेत सहभाग

राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने एल्गार पुकारला असून शेतकऱ्यांच्या हक्कासाठी ‘शेतकरी संघर्ष न्याय यात्रा’ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *