महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लागू असतानाही रुग्णांकडून पैसे घेणाऱ्या रुग्णालयांवर शासनाकडून कारवाई करण्यात येत असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत दिली. योजनांमध्ये पारदर्शकता वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (ए.आय.) आधारित यंत्रणेचा वापरही करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. या …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची आशा, अमेरिका इस्त्राईल इराण युद्ध संपून शांतता निर्माण व्हावी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी घेतली इराणचे कॅान्सुल जनरल सईद रझा मोसायब मोतलाघ यांची भेट
अमेरिका इस्त्राईल इराण यांच्यात सुरु असलेल्या युद्धाचा जगभर परिणाम होत आहे. या युद्धजन्य परिस्थितीमुळे भारतातही गॅस व इंधन तुटवडा जाणवू लागला आहे. हे युद्ध लवकर संपून आशियात शांतता निर्माण व्हावी, अशी सदिच्छा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज इराणच्या कॉन्सुलेटला भेट …
Read More »ओडिशा : कटकमधील एससीबी मेडिकल कॉलेजमध्ये आगीत १० रुग्णांचा मृत्यू
कटक, ओडिशा : ओडिशामधील कटकमध्ये सोमवारी सकाळी एक दुःखद घटना घडली. कटकमधील एससीबी मेडिकल कॉलेजच्या ट्रॉमा केअर आयसीयूमध्ये पहाटे २:३० वाजता आग लागली. मुख्यमंत्री मोहन चरण मांझी यांनी आगीत १० रुग्णांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली. घटनास्थळी पोहोचलेल्या तीन अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली आणि रुग्णांना सुरक्षित ठिकाणी हलवले. अपघातानंतर …
Read More »Gold Price : सोन्याची चमक कमी झाली, चांदीच्या किमती ₹३,००० पेक्षा जास्त घसरल्या
Gold Price: सोमवारी सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण झाली, ज्यामुळे दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमती सुमारे ₹३,५०० ने कमी झाल्या. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (एमसीएस) वर, २ एप्रिल २०२६ च्या करारात सोने ₹१,१९२ किंवा ०.७५ टक्क्यांनी कमी होऊन ₹१,५७,२७४ वर व्यवहार करत होते. आतापर्यंत, सोने ₹१,५७,३४७ चा उच्चांक आणि ₹१,५६,६६५ चा नीचांक …
Read More »Oscar 2026 : ‘वन बॅटल आफ्टर अदर’ ने सर्वोत्कृष्ट चित्रपट जिंकला, फक्त सहा पुरस्कार जिंकले
Oscar 2026: ९८ व्या अकादमी पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपट श्रेणीत पॉल थॉमस अँडरसनचा “वन बॅटल आफ्टर अदर” आणि “सिनर्स” यांच्यात चुरशीची स्पर्धा झाली. दोन्ही चित्रपट टॉप दोन नामांकनांमध्ये होते, परंतु “वन बॅटल आफ्टर अदर” ने सर्वोत्कृष्ट चित्रपट जिंकला. हे देखील उल्लेखनीय आहे की “वन बॅटल आफ्टर अदर” ने वेगवेगळ्या श्रेणींमध्ये …
Read More »राहुल गांधी यांचे पंतप्रधान मोदी यांना पत्र, कांशीराम यांना भारतरत्न प्रदान करा उत्तर प्रदेशातील कांशीराम यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमानंतर केली मागणी
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून, बहुजन समाज पक्षाची (BSP) स्थापना करणारे आणि दलितांचे प्रेरणास्थान असलेले कांशीराम यांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ प्रदान करण्याची मागणी केली. राहुल गांधी यांनी ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) वर लिहिले: “मी अशी मागणी करतो की, भारत सरकारने सामाजिक न्यायाचे …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा स्पष्टोक्ती, काँग्रेस मुक्ता कदम आणि डॉ दीपक पवार यांच्या पाठिशी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे ट्वीट
भाजपा आणि रा.स्व.संघाच्या यंत्रणेला धक्का पोहोचू लागला की सत्तेच्या माध्यमातून त्यांचे हस्तक बनलेल्या प्रशासनाकरवी अभिव्यक्ति स्वातंत्र्याची गळचेपी करून बोलणाऱ्यांचा आवाज ते दाबू पाहतात. आपल्या या महाराष्ट्राच्या मातीला लढाऊ बाणा वारसा हक्काने लाभलाय. याच स्वाभिमानी महाराष्ट्राच्या भूमीतील स्वतंत्र पत्रकार म्हणून जबाबदारी पार पाडणाऱ्या मुक्ता कदम व मराठी भाषा केंद्राचे अध्यक्ष व …
Read More »रामदास आठवले म्हणाले, अतिरेक्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानशी भारताची मैत्री कधीही नाही पंतप्रधान मोदींची विकासाची गाडी कोणी अडवू शकत नाही
अतिरेक्यांना आश्रय देणे थांबवून आतंकवाद संपवला तरच पाकिस्तानशी मैत्रीची चर्चा होईल. मात्र आतंकवाद संपवण्याची पाकिस्तानची ईच्छा नाही. पाकिस्तान अतिरेक्यांना पाठबळ देत आहे. अतिरेक्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानशी भारताची कधीही मैत्री होणार नाही असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज केले. जम्मू येथील आमंत्रण रिसॉर्ट हॉल येथे महाराजा हरिसिंह डोगरा …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास, मुक्त शिक्षण प्रणालीमुळे शिक्षणापासून वंचित विद्यार्थ्यांना संधी 'एज्युकेट गर्ल्स' संस्थेसोबत शासनाचा सामंजस्य करार
राज्यातील एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये ही राज्य शासनाची भूमिका आहे. ‘एज्युकेट गर्ल्स’सारख्या अनुभवी संस्थेच्या सहकार्यामुळे राज्य मुक्त शाळा प्रणाली अधिक बळकट होईल आणि शिक्षण अर्धवट राहिलेल्या विशेषतः मुलींना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात येण्याची संधी मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. राज्यातील मुक्त शिक्षण व्यवस्था अधिक …
Read More »राहुरी व बारामती विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणूक जाहीर मतदान २३ एप्रिलला तर ४ मे २०२६ रोजी मतमोजणी होणार
भारत निवडणूक आयोगाने देशातील सहा राज्यांतील आठ विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील राहुरी (जि. अहिल्यानगर) आणि बारामती (जि. पुणे) या दोन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. राहुरी मतदारसंघाचे आमदार शिवाजी भानुदास कर्डिले आणि बारामती मतदारसंघाचे आमदार अजित अनंतराव पवार यांच्या निधनामुळे या जागा रिक्त झाल्या असून त्यासाठी …
Read More »
Marathi e-Batmya