राज्यातील शेतकरी अस्मानी संकटाने पुरता हवालदिल झाला आहे. पावसाने दडी मारल्याने खरीप हंगाम हातातून गेला आहे, दसरा दिवाळीचा सण तोंडावर आला आहे. दिवाळीचा सण कसा करायचा हा यक्षप्रश्न शेतकऱ्यासमोर उभा ठाकला आहे, मायबाप सरकार मदतीला धावून येईल अशी अपेक्षा असताना सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली आहेत. प्रचंड महागाई असताना ५ …
Read More »अंकिता भंडारी प्रकरणी राहुल गांधी यांचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना पत्र दुष्यंत कुमार यांच्या सिक्कीमचे राज्यपाल म्हणून केलेली नियुक्ती थांबविण्याची विनंती
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून विनंती केली आहे की, त्यांनी सरकारला दुष्यंत कुमार गौतम यांची सिक्कीमचे राज्यपाल म्हणून केलेली नियुक्ती पुनर्विचार करण्यास सांगावे. तसेच, अंकिता भंडारी हत्या प्रकरणाचा (२०२२) सीबीआय तपास पूर्ण होईपर्यंत त्यांना पदभार स्वीकारण्यापासून रोखावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. आपल्या …
Read More »सर्वोच्च न्यायालयाने बजावली काँग्रेस, राहुल गांधी आणि इतरांना बजावली नोटीस न्यायालयाच्या आवारात राजकीय निदर्शनावर बंदी
१२ ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी आलेल्या राहुल गांधी आणि ‘इंडिया’ (INDIA) आघाडीच्या इतर नेत्यांच्या मोर्चाबाबत आणि त्यांच्या न्यायालयीन नोंदणी विभागात (कोर्ट रजिस्ट्री) प्रवेश करण्याबाबत उपस्थित केलेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर, सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी काँग्रेस पक्ष, राहुल गांधी आणि इतर नेत्यांना नोटीस बजावली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती …
Read More »राहुल गांधी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्तांना नोटीस या याचिकवरील नोटीस कोणी तरी स्विकारेल अशी व्यक्त केली आशा, राहुल गांधी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर नोटीस
निवडणूक आयोगाद्वारे सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या ‘विशेष सखोल पुनरीक्षण’ (Special Intensive Revision – SIR) प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर नावे वगळल्याचा आणि कथित अनियमितता झाल्याचा आरोप करत, विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि इतर विरोधी नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. या याचिकांवर गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने भारतीय निवडणूक आयोग (ECI) आणि मुख्य …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांच्या घोषणेवर धाराशिवच्या शेतकऱ्याने १५०० रुपये कर्जाऊ घेत केली ५ हजाराची मनी ऑर्डर दीड एकर सोयाबीनच्या उत्पन्नात १५०० रुपयांच्या कर्जाची रक्कम एकत्रित करत पाठवले पाच हजार
धाराशिव तालुक्यातील सुर्डी येथील एका शेतकऱ्याने शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या पाच हजार रुपयांच्या अग्रीम मदतीवर नाराजी व्यक्त करत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाच हजार रुपयांची मनीऑर्डर पाठवली. तसेच दीड एकर सोयाबीनच्या पिकासाठी तब्बल २५ हजार रुपये खर्च करूनही हातात अवघे ३ हजार ९०० रुपये आल्याने शेतकऱ्याने हे पाऊल उचलल्याचे …
Read More »अभिनेता इम्रान खान यांना भाजपाच्या किरीट सोमय्या यांच्या तक्रारीवरुन एफआरआरओची देश सोडण्याची नोटीस अभिनेता इम्रान खान मुंबई उच्च न्यायालयात धाव घेणार
बॉलिवूड अभिनेता इम्रान खान ‘फॉरेनर्स रिजनल रजिस्ट्रेशन ऑफिस’ (FRRO) द्वारे बजावण्यात आलेल्या नोटीसविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात धाव घेणार आहे. या नोटीसमध्ये त्याला ‘फॉरेनर्स ॲक्ट’चे (परदेशी नागरिक कायदा) उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत, २८ ऑक्टोबरपर्यंत देश सोडून जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याचिका दाखल झाल्यानंतर, ती तातडीने सुनावणीसाठी सादर केली जाईल. मुख्य …
Read More »अभिजीत दीपके यांचा आरोप, एका व्यक्तीला वाचविण्यासाठी मोदी, शाह यांनी देशवासियांशी युद्ध पुकारले मोदींकडून ज्ञानेश कुमार यांना वाचविण्यासाठी सरकारी संसाधनांचा वापर
‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) चे नेते अभिजीत दीपके यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना वाचवण्यासाठी सरकारी संसाधनांचा वापर केला. तसेच निवडणूक आयोगाच्या प्रमुखांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या आंदोलकांना आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप केला. नेहा बोरा आणि अभिनेते प्रकाश राज, सर्वोच्च …
Read More »राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे तीन महत्वाचे निर्णय मंत्रिमंडळ बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री फडणवीस हे होते
राज्य मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठक ही आज सह्याद्री अतिथीगृहात पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे होते. आज झालेल्या बैठकीत घटनात्मक पदावर राहून सलग २५ वर्षे यशस्वीरित्या जनसेवा केल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन, छोट्या, चिंचोळ्या, पोहोच मार्ग नसलेल्या शासकीय भूखंड वितरणाच्या धोरणात सुधारणा, श्री संत गजानन महाराज संस्थानला मौजे …
Read More »लोककलेच्या नभांगणातील ‘मधुरंग’; लावणीसम्राज्ञी मधु कांबीकर…! पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी राजशिष्टाचार बाजूला ठेवून मधुबाईंसोबत धरलेला फुगडीचा फेर! महाराष्ट्राच्या लोककलेला देशाच्या सर्वोच्च नेतृत्वाकडून लाभलेल्या सन्मानाचा तो सुवर्णक्षण!
कलेची खरी ताकद कोणती? ती राजसत्तेपुढे झुकण्यात नसते, तर राजसत्तेलाही आपल्या सहजसौंदर्याने भारावून टाकण्यात असते! महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या, लोकपरंपरेच्या संस्कारांत घडलेल्या आणि लावणीच्या ठसक्याने देश-विदेशातील रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या मधु कांबीकर यांच्या आयुष्यातील एक प्रसंग या सामर्थ्याची साक्ष देणारा आहे. देशाच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि महाराष्ट्राच्या या लोककलावंताने एकत्र धरलेला …
Read More »चंद्रशेखर बावनकुळे यांची निर्देश, बंद पाणीपुरवठा योजना तातडीने सुरू करा; टँकरचा पर्याय शेवटी वापरा • दुष्काळी उपाययोजनांचे जिल्हानिहाय प्रस्ताव १५ दिवसांत मागविण्याचे निर्देश • दुष्काळसंदर्भातील मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक
राज्यातील काही दुष्काळी तालुक्यांत प्रलंबित वीजबिलांमुळे किंवा ट्रान्सफॉर्मरअभावी बंद असलेल्या पाणीपुरवठा योजना तातडीने सुरू कराव्यात. जिल्हाधिकाऱ्यांकडून जिल्हानिहाय उपाययोजनांचे प्रस्ताव येत्या १५ दिवसांत मागवून ते मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्याची कार्यवाही करावी. पिण्याच्या पाण्यासाठी टँकर हा शेवटचा पर्याय ठेवून त्यापूर्वी अन्य सर्व उपाययोजना पडताळून पाहाव्यात, असे निर्देश महसूल मंत्री तथा दुष्काळसंदर्भातील मंत्रिमंडळ उपसमितीचे …
Read More »
Marathi e-Batmya