Breaking News

राज्यावर भारनियमनाचे सावटः पण टाळण्यासाठी शर्थीचे प्रयत्न कोळशाअभावी वीजनिर्मिती केंद्रांकडून वीज पुरवठ्यात घट

विजेच्या मागणीबाबत देशभरात सध्या अभूतपूर्व संकटाची परिस्थिती आहे. इतर राज्यांमध्ये सर्वच ग्राहकांना विजेच्या तात्पुरत्या भारनियमनाला सामोरे जावे लागत आहे. त्या तुलनेत महाराष्ट्रात भारनियमन टाळण्यासाठी महावितरणकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र विजेची वाढती मागणी व कोळश्या अभावी अपुऱ्या वीज निर्मितीमुळे सुमारे २,५०० ते ३,००० मेगावॅट विजेची तूट भरून काढण्यासाठी गरजेनुसार शहरी …

Read More »

संजय राऊत म्हणाले, आता सोमय्या खोटी कागदपत्रे तयार करतोय विक्रांतचे पैसे निवडणुकीत वापरले, भाजपने खुलासा करावा

युध्दनौका आयएनएस विक्रांतला वाचविण्यासाठी कोट्यावधी रूपये जमा करत ते पैसे निवडणूकीत वापरले असल्याचे सांगत शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी करत आता राजभवनावरून आलेल्या कागदपत्रांपेक्षा वेगळी खोटी कागदपत्रे तयार कऱण्याचे काम सोमय्याकडून सुरु असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. भाजपाने भाग सोमय्या भाग नावाचा चित्रपट काढावा. सोमय्या गायब असल्याने आता भाग सोमय्या …

Read More »

अनिल परब म्हणाले की, “त्या” हल्लेखोर कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई एसटी महामंडळाच्या बैठकीनंतर परब यांची माहिती

संप काळात ज्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली त्यांना पुन्हा सेवेत रुजू करण्यात येणार आहे. मात्र जे कर्मचारी शरद पवार यांच्या घरावर हल्ला करण्यात सहभागी झाले होते, त्यांच्यावर मात्र कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज दिली. एसटीच्या कायद्यामध्ये एखादा कर्मचारी गंभीर गुन्ह्यांमध्ये सामील असेल …

Read More »

विद्यार्थ्यांनी काय खावे, काय परिधान करावे, हे भाजपा कसे ठरविणार राष्ट्रवादीचा आरोप, भाजपा धर्मनिरपेक्ष शैक्षणिक संस्थांचे सांप्रदायिकीकरण करतेय

अभाविपच्या माध्यमातून भाजप आपल्या धर्मनिरपेक्ष शैक्षणिक संस्थांचे सांप्रदायिकीकरण करत आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला. जेएनयू कॅम्पसमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनेचा महेश तपासे यांनी तीव्र निषेध केला. अभाविपचे स्वयंसेवक हे त्यांच्या उजव्या विचारसरणीची विविध संस्थांमधील विद्यार्थ्यांवर अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करत आहेत. संस्थेचीच धर्मनिरपेक्ष चौकट कमकुवत …

Read More »

Save Vikrant प्रकरणी सोमय्या पिता पुत्रांचा अटक पूर्व जामिन फेटाळला आता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेणार

आयएनएस विक्रांत युध्द नौकेच्या नावावर कोट्यावधी रूपयांची माया गोळा करून ती राज्यपालांकडे जमा न करता ती भलत्याच ठिकाणी वापरल्याचा आरोप शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी केला. त्यानंतर ट्रॉम्बे येथील पोलिसांनी गुन्हा नोंदविल्यानंतर किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलाविले. परंतु त्यांनी पोलिस स्टेशनला हजर न होता …

Read More »

सिल्व्हर ओक आंदोलनप्रकरणात नागपूर कनेक्शनः सदावर्तेंचा मुक्काम वाढला गिरगांव सत्र न्यायालयाने सुनावली दोन दिवसांची पोलिस कोठडी

पाच महिन्याहून अधिक काळ आझाद मैदानावर शांततेत आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालानंतर पहिल्यांदा जल्लोष करून दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी हल्लाबोल करत आंदोलन करण्यात आले. या हल्लाबोल आंदोलनात नागपूर कनेक्शन उघडकीस आल्याची माहिती पोलिसांनी गिरगांव सत्र न्यायालयासमोर ठेवली. त्यामुळे न्यायालयाने त्यांना …

Read More »

‘कर नाही तर डर कशाला’ असे म्हणणारे भाजपा नेते आता का घाबरतायत ? गुन्हा दाखल होताच किरीट सोमय्या दोन दिवसांपासून गायब?-अतुल लोंढे

आयएनएस ‘विक्रांत बचाव’ च्या नावाखाली भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी सर्वसामान्य जनतेकडून जमा केलेला निधीसंदर्भात चौकशी सुरु असताना सोमय्या अचानक गायब झाले आहेत. विरोधी पक्षांच्या नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांकडून राजकीय हेतूने कारवाई होत असताना ‘कर नाही तर डर कशाला’ असे म्हणणारे भाजपा नेते किरिट सोमय्या, प्रविण दरेकर त्यांच्यावरील कारवाईवेळी कशाला …

Read More »

जयंत पाटील यांचा सवाल, भाजपचे लोक काय धुतल्या तांदळाचे आहेत का ? आजपासून राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेला उरणमधून सुरुवात...

मविआचे निवडून आलेले आमदार फोडण्याचा प्रयत्न झाला, मात्र ते शक्य झाले नाही. म्हणून ईडी, इन्कम टॅक्सची धाड टाकली जात आहे. ईडी काय महाराष्ट्रातच आहे का ? भाजपचे लोक काय धुतल्या तांदळाचे आहेत का ? असा रोखठोक सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला. आजपासून राष्ट्रवादी परिवार …

Read More »

पन्नास लाखाच्या घडयाळात टायमिंग चुकलेले आता जागे झाले नाल्यांना जलपर्णींचा वेढा, गाळाचे ढिगारे -भाजपा नेते आमदार ॲड आशिष शेलार यांची पाहणी

पश्चिम उपनगरातील मालाड ते दहिसर दरम्यानच्या नाल्यांची पाहणी आज भाजपा नेते आमदार ॲड आशिष शेलार यांनी केली. तेव्हा नाल्यांना जलपर्णीचा पुर्ण विळखा पडला असून ही काय नवीन शेती तर केली जात नाही ना ? असा सवाल करीत हे कधी साफ होणार ? असा सवाल करत आम्ही दौरे करायला लागताच पन्नास …

Read More »

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा संपूर्ण कायापालट करणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही आणि निर्देश

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा चेहरा मोहरा बदलून याठिकाणी केवळ मुंबई किंवा राज्यातूनच नव्हे तर देशविदेशातून वन पर्यटकांचा ओघ सुरू झाला पाहिजे असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा विकास आराखडा तातडीने तयार करावा, असे निर्देश वन विभागाला दिले. मुख्यमंत्री यांचे वर्षा या शासकीय निवासस्थानी संजय गांधी राष्ट्रीय …

Read More »