धारावी झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने मोठा भ्रष्टाचार केला आहे. पुनर्वसन प्रकल्पासाठीच्या ४५ एकर जमिनीसाठी फडणवीस सरकारने रेल्वेला ८०० कोटी दिले. परंतु आजपर्यंत ती जमीन राज्य सरकाला मिळालेली नाही आणि ८०० कोटी रुपयेही परत मिळाले नाहीत. ही जनतेच्या पैशाची लूट असून या घोटाळ्याची एसआयटी मार्फत चौकशी करावी, अशी …
Read More »महाविकास आघाडीतील “हे” मंत्री मंत्रिमंडळाच्या बैठकीला दांडी मारण्यात आघाडीवर मंत्रिमंडळाच्या बैठकीत गैरहजर राहण्यात गडाख, शिंगणे, सामंत आघाडीवर
मंत्रिपद मिळवण्यासाठी पक्ष श्रेष्ठीकडे जोरदार लॉबिंग करायचे, श्रेष्ठींना गळ घालायची, स्पर्धकांना मागे टाकण्यासाठी राजकीय डावपेच आखायचे आणि एकदा मंत्रिपद मिळाले की मग मंत्रिमंडळाच्या बैठकांना गैरहजर रहायचे धक्कादायक माहिती राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या बाबतीत पुढे आली आहे, राज्यातील सत्ताधारी शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांच्या बाबतीत. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब यांनी आतापर्यंत बोलावलेल्या …
Read More »पटोलेंचा आरोप, नरेंद्र मोदी हे महापुरुषांपेक्षा मोठे असल्याचे दाखविण्याचा भाजपा प्रयत्न महाराष्ट्र आणि महापुरुषांचा अवमान भाजपा करतेय
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतीबा फुले, सावित्रीबाई फुले हे आमचे दैवत आहेत. आमच्या या दैवतांचा भारतीय जनता पक्ष, नरेंद्र मोदी, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे सातत्याने अवमान करत असतात. कर्नाटकातील भाजपा सरकारही छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. मुंबईतील प्रदेश काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार …
Read More »पंतप्रधान मोदींचा काँग्रेस, राष्ट्रवादीला टोला तर फडणवीसांचे केले कौतुक पुणे मेट्रोसाठी देवेंद्र फडणवीसच मागे लागलेले होते ते सतत दिल्लीला यायचे
आपल्याकडे अनेक योजनांचे भूमिपूजन तर व्हायचे पण त्याचे उद्घघाटन कधी होईल हे माहित नसायचे असा उपरोधिक टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीचे नाव न घेता लगावत पुढे बोलता म्हणाले की, या सुस्त वृत्तीमुळे देशाचे मोठे नुकसान झाले. आता आपल्याला वेगाने काम करायला हवे. यासाठी आमच्या सरकारने पीएम गतिशक्ती नॅशनल …
Read More »राज्यपालांच्या उपस्थितीतच त्यांचीच तक्रार अजित पवारांनी केली पंतप्रधानांकडे मोठ्या व्यक्तींकडून नको ती वक्तव्य केली जातात ती न पटणारी असतात
पुणे मेट्रो आणि १४० ईलेक्ट्रीक बसेससह इतर महत्वाच्या योजनांचा लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. यावेळी बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे नाव न घेता त्यांच्याकडून करण्यात येत असलेल्या वादग्रस्त वक्तव्याची तक्रार करत टोला लगावला. एमआयटी काँलेजच्या मैदानावर आयोजित …
Read More »युक्रेनमधून आलेल्या वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय आयोगाने घेतला “हा” निर्णय भारतात इंटरशिप करण्यास परवानगी
रशियाने युक्रेन विरोधात सुरु केलेल्या लष्करी कारवाईमुळे युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या अनेक भारतीय विद्यार्थ्यांना भारतात जीव मुठीत पकडून परतावे लागले. यापार्श्वभूमीवर अशा वैद्यकीय विद्यार्थ्यांना भारतात इंटरशिप करण्यास राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने परवानगी दिली आहे. युक्रेनमध्ये अनेक भारतीय विद्यार्थी अडकून पडले असून त्यांना मायदेशी परत आणण्यासाठी केंद्र सरकारकडून ऑपरेशन गंगा राबवण्यात …
Read More »शरद पवारांच्या टीकेला पंतप्रधान मोदींचे वाराणसीच्या प्रचारसभेतून उत्तर युक्रेनच्या संकट काळातही विरोधकांकडून राजकारण
युक्रेनच्या विरोधात रशियाने सुरु केलेल्या लष्करी कारवाईमुळे हजारो भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकल्याची माहिती बाहेर आल्यानंतर या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात केंद्र सरकारला अपयश येताना दिसत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या पुणे येथील मेट्रोच्या उद्घाटनासाठी येत असल्याच्या यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी उद्घाटन सोहळ्यांबरोबर युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी …
Read More »१५ विमानातून २ हजार ९०० विद्यार्थी युक्रेनमधून मायदेशी आणले परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
मागील काही दिवसांपासून रशियाने युक्रेनच्या विरोधात सुरु केलेल्या लष्करी कारवाईमुळे हजारो भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत. या विद्यार्थी आणि नागरीकांना भारतात आणण्याचे काम केंद्र सरकारकडून सुरु आहे. आतापर्यंत जवळपास १३ हजार ३०० नागरिक भारतात सुखरूप परतले आहेत. मागील २४ तासांमध्ये आणखी १५ विमानांद्वारे २ हजार ९०० जण आले असून, …
Read More »तृतीयपंथीयांना देखील सन्मानाने जगण्याचा अधिकार तृतीयपंथीयांच्या समस्या सरकार दरबारी मांडून न्याय देऊ : संध्याताई सव्वालाखे
तृतीयपंथीयांना देखील सन्मानाने जीवन जगण्याचा, स्वत:ची प्रगती व उन्नती करण्याचा अधिकार असून तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत अशी ग्वाही मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली. मुंबई प्रदेश महिला कॉंग्रेस कमिटी व महिला कॉंग्रेस तृतीयपंथी सेलच्या माध्यमातून मालाड, मालवणी येथील रमजान अली शाळेच्या प्रांगणात तृतीयपंथीयांच्या विविध प्रश्नांसंदर्भात …
Read More »राज्यपालांवरील शरद पवारांच्या टीकेला फडणवीसांनी दिले “हे” उत्तर राज्यपाल हटाव मोहिमच दिसतेय
राज्यात महाविकास आघाडी सरकार विरूध्द राज्यपाल भगतसिंग कोश्यारी असा संघर्ष सातत्याने बघायला मिळत आहे. मात्र हा संघर्ष दिवसेंदिवस कमी होण्याऐवजी या ना त्या कारणाने या भरच पडत असल्याचे दिसून येत आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्यासंदर्भात केलेले वादग्रस्त वक्तव्य आणि राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय …
Read More »
Marathi e-Batmya