Breaking News

छत्रपती पुतळा विटंबनाप्रकरणी सेनेचा भाजपाला इशारा, ज्वालामुखी बाहेर येवू देवू नका… भाजपाचे सगळे पोपट गप्प कसे ? खासदार अरविंद सावंत यांचा संतप्त सवाल

मराठी ई-बातम्या टीम महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना बंगळूरु येथे झाल्याने शिवसेना आक्रमक झाली असून राज्यभरात निषेध केला जात आहे. मुंबईतही ठिकठिकाणी शिवसैनिकांकडून निषेध आंदोलन करण्यात येत असून यावेळी शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त करताना म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं …

Read More »

भाजपात फडणवीस विरूध्द पंकजा मुंडे संघर्ष संपुष्टात? मुंडेकडून चक्क कौतुक भरसभेत फडणवीसांच्या कौतुक आणि सल्ला दिल्याची कबुलीही

मराठी ई-बातम्या टीम मागील पाच वर्षात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये ग्रामविकास खात्याचे मंत्री असल्यापासून भाजपामध्ये देवेंद्र फडणवीस विरूध्द पंकजा मुंडे असा संघर्ष असल्याचे चित्र पाह्यला मिळत होते. तसेच ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरून पंकजा मुंडे यांनी काही दिवसांपूर्वीच फडणवीस यांच्यावर त्यांचे नाव न घेता टीका केली. त्यानंतर आज एकदम मुंडे यांनी …

Read More »

सरसंघचालक भागवत म्हणाले, भारतातील सगळ्यांचा डिएनए एकच केंद्रातील मोदी सरकारवर संघाचा कंट्रोल नाही

मराठी ई-बातम्या टीम मागील ४० हजार वर्षापासून भारतातील सर्वांचा डिएनए सारखाच असल्याचे विधान राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी करत आमच्या पूर्वजांनी बलिदान दिलं आहे. त्याग केला आहे. त्यामुळे आपली संस्कृती आजही जिवंत आहे. आपला देश प्रगती करत आहे. आपण आपल्या पूर्वजांचंच अनुकरण करतो. त्यामुळेच त्यांच्या प्रती आपली निष्ठा …

Read More »

देवेंद्र फडणवीस म्हणाले, आघाडी सरकार हरवलय…. हे सरकार गरीबांचे नव्हे तर दारू विकणाऱ्यांचे सरकार असल्याचा आरोप

मराठी ई-बातम्या टीम राज्यातील हे सरकार हे गरीबांचे सामान्य माणसांच नाही तर सामान्य माणसांच्या विरोधातील सरकार असून या सरकारला तुम्हीच खालू आणू शकता. तसेच हे सरकार काम करताना दिसत नसून आघाडी सरकार सध्या हरवलं आहे. या सरकारला शोधून देणाऱ्यास पुरस्कार देवू अशी उपरोधिक टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास …

Read More »

सावधान ! राज्यघटनेतील “धर्मनिरपेक्षते” च्या विरूध्द वातावरण तयार होतेय भाजपापाठोपाठ काँग्रेसकडूनही आता उघडपणे आळवला जातोय “हिंदू (त्व)”चा राग

तरीही २०१९ च्या सार्वत्रिक निवडणूकीत काँग्रेससह त्यांच्या प्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीचा धु‌‌व्वा भाजपाने हिंदू आणि हिंदूत्वाच्या बळावर उडविलाच. परंतु त्यावेळी भाजपाच्या मदतीला पुलवामा येथील जवानांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी केलेला हल्ला हा सहाय्यभूत ठरला. या हल्ल्याप्रकरणी तपास यंत्रणांनी एका स्थानिक काश्मीरी युवकास अटक करत त्याचे धागेदोरे पाकिस्तानातील दहशतवादी गटाशी असल्याचे सिध्द केले. …

Read More »

५ वर्षांत बँक ग्राहकांसोबत सायबर फसवणूकीत २१ पटीने वाढ, महाराष्ट्रात सर्वाधिक खाजगी बँकांमध्ये सर्वाधिक प्रकरणे

मराठी ई-बातम्या टीम अलिकडच्या वर्षांत देशातील बँकांमध्ये डिजिटल व्यवहार वाढले आहेत. परंतु सायबर फसवणुकीच्या घटनांमध्येही झपाट्याने वाढ झाली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार, देशात सायबर आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये गेल्या ५ वर्षांत २१ पटीने वाढ झाली आहे. पैशाच्या बाबतीत अशा फसवणुकीत सुमारे ३०० टक्केवाढ झाली आहे. कार्ड/इंटरनेट फसवणुकीची प्रकरणे २०१६-१७ …

Read More »

राहुल गांधी म्हणाले, तुम्हाला आठवतेय का? मोदी तरूणपणी मगरीशी भिडले होते हिंदू म्हणजे नेमके काय सांगतो म्हणत पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा

मराठी ई-बातम्या टीम हिंदू आणि हिंदुत्ववादी यांच्यातला फरक स्पष्ट करताना राहुल गांधी म्हणाले, महात्मा गांधींनी त्यांचं पूर्ण आयुष्य सत्य समजून घेण्यात घालवलं, तर दुसरीकडे गोडसे हा हिंदुत्ववादी होता. गोडसेला कुणीही महात्मा म्हणत नाही, कारण त्याने एका अशा हिंदूची हत्या केली, जे नेहमी सत्य बोलायचे. गोडसे हा घाबरट होता. एक कमकुवत …

Read More »

राकेश झुनझुनवाला यांना ‘या’ शेअर्समधून ४२१ टक्के नफा झाला मात्र आयपीओ गुंतवणूकदारांचे १० टक्के नुकसान

मराठी ई-बातम्या टीम भारतीय अब्जाधीश आणि शेअर बाजारातील प्रसिद्ध गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांना अलीकडेच शेअर बाजारात लिस्ट झालेल्या शेअर्सने ५,४१८ कोटी रुपयांचा नफा दिला आहे. म्हणजे त्यांच्या नफ्यात तब्बल ४२१ टक्के वाढ झाली आहे. मात्र, या शेअर्समध्ये IPO गुंतवणूकदारांना १० टक्के तोटा झाला. विमा कंपनी स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स …

Read More »

आज पुन्हा ओमायक्रॉनचे ८ रूग्ण, तर विषाणूचा शिरकाव आता साताऱ्यातही मुंबई विमानतळावर ४, पुणे १ तर साताऱ्यात ३

मराठी ई-बातम्या टीम मागील काही दिवस मुंबई, पुणे, मुंबई महानगरात आढळून येणारे ओमायक्रॉन व्हेरियंटचे रूग्ण आता राज्यातील नागपूर, उस्मानाबाद येथे आढळून आल्यानंतर आज थेट साताऱ्यातही आढळून आला आहे. साताऱ्यात तब्बल तीन रूग्ण आढळून आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार राज्यात आणखी ८ रुग्ण ओमायक्रॉन बाधित …

Read More »

सहकार मंत्रालयाची स्थापना कशासाठी? विचारणाऱ्यांना उत्तर द्यायला आलोय केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांचा अप्रत्यक्ष राष्ट्रवादीला टोला

मराठी ई-बातम्या टीम स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षांनी मोदी सरकारने पहिल्यांदा सहकार मंत्रालय स्थापन केलं. अनेकांनी विचारलं या मंत्रालयाची कालसुसंगतता काय? असा सवाल विचारणाऱ्यांना   उत्तर द्यायला मी आलोय. देशातील सहकारी साखर कारखान्यांमधून एकूण ३१ टक्के साखरेचं उत्पन्न होतं. हे देशात सर्वांना माहिती नाही. दुधाचं २० टक्के उत्पादन सहकार क्षेत्र करते. १३ टक्के …

Read More »