Breaking News

अलाहाबाद न्यायालयाची खळबळजनक मागणी: राम-कृष्णाच्या सन्मानार्थ कायदा करा न्यायालयाच्या निकालाने सामाजिक आणि राजकिय वर्तुळात खळबळ

अलाहाबाद-वृत्तसंस्था: प्रतिनिधी लोकशाहीप्रधान असलेल्या भारत देशाने राज्यघटना स्विकारताना धर्मनिरपेक्ष पध्दतीने राज्य कारभार चालविला जाईल अशी हमी दिली. त्यानुसार कोणत्याही धार्मिक गोष्टीचा फाटा देत राज्य सरकार पातळीवरून धर्मनिरपेक्ष वातावरण कसे राहील याबाबत आतापर्यत सर्वच राज्य सरकारने प्रयत्न केले. तसेच रामायण आणि महाभारत या दोन्ही ग्रथांतील व्यक्ती रेखांबद्दल नेहमीच संशयातीत भूमिका राहिली …

Read More »

काँग्रेस नेत्यांचे राजभवनासमोर मौनव्रत आंदोलन ‘महाराष्ट्र बंद’मध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे!: नाना पटोले

मुंबई: प्रतिनिधी उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाने शेतकऱ्यांना अत्यंत क्रूर पद्धतीने गाडीखाली चिरडून मारले. या शेतकरी हत्याकांडाच्या निषेधार्थ व गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी महाराष्ट्र विकास आघाडीने सोमवारी ११ तारखेला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. तसेच काँग्रेस नेते राजभवनासमोर मौनव्रत आंदोलनही करणार आहेत. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सोमवारच्या …

Read More »

एनसीबीचा तो सगळा बनाव, सर्व फुटेज जाहीर करा राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांचे एनसीबीला आव्हान

मुंबई: प्रतिनिधी मी म्हटलं ११ पैकी तिघांना सोडलं. एनसीबी सांगतंय ११ नाही, १४ लोकं होते. आम्ही सगळं फूटेज पाहिलं. तीन लोक सोडल्यानंतर हे फूटेज आम्ही जगासमोर आणलं आहे. मी एनसीबीला आव्हान करतो, की जर १४ लोकं होते, तर आणखीन तीन लोकं कोण होते ते त्यांनी जाहीर करावं. तुमच्या ऑफिसमधून ते …

Read More »

कोळसाटंचाईचे संकट गडद; कोळशाअभावी वीजनिर्मिती केंद्रांतील १३ संच बंद सकाळ-संध्याकाळ ६ ते १० पर्यंत वीज कमी वापरण्याचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी कोळशाच्या टंचाईमुळे महावितरणला वीजपुरवठा करणाऱ्या विविध औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांतील १३ संच सद्यस्थितीत बंद पडले आहेत. त्यामुळे तब्बल ३३३० मेगावॅट विजेचा पुरवठा ठप्प पडला आहे. विजेची ही तूट भरून काढण्यासाठी तातडीच्या वीजखरेदीसह जलविद्युत व अन्य स्त्रोतांकडून वीजपुरवठा उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरु आहे. राज्यात विजेचे भारनियमन टाळण्यासाठी महावितरणकडून शर्थीचे …

Read More »

मलिकांचे आरोप, एनसीबीचा खुलासा तर फडणवीसांकडून पाठराखण आणि गौप्यस्फोट आर्यन खान अटकप्रकरणावर राजकिय वातावरण चांगलेच तापतेय

मुंबई: प्रतिनिधी बॉलीवूड स्टार शाहरूख खान यांचा मुलगा आर्यन खान यांच्यासह तिघांना एनसीबीने अटक करून तुरुंगात ठेवल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक यांच्याकडून एनसीबीच्या कार्यपध्दतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत यामागे भाजपाचा हात असल्याचा आरोप करत आहेत. मात्र आज दुसऱ्यांदा पुन्हा एकदा मोहित कंबोजच्या मेहुण्यावरून मलिक यांनी आरोप केल्यानंतर एनसीबीने …

Read More »

नवाब मलिक, भाजपावर टीका करून सत्य लपत नसते भाजपाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा टोला

मुंबई : प्रतिनिधी अल्पसंख्यांक कल्याणमंत्री नवाब मलिक यांनी मंत्रिपदाचे भान सोडून एनसीबीने अटक केलेल्या आरोपींची वकिली सुरू केल्याचे दिसते. तथापि, मीडिया ट्रायलमध्ये भारतीय जनता पार्टीवर टीका करून कोणी निर्दोष ठरणार नाही आणि सत्यही लपणार नाही. असत्याची कास धरून स्वतःला आरोपी करू नका, असा टोला भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये …

Read More »

१८ हजार कोटींना विकत घेतलेल्या एअर इंडियाचे इतक्या रकमेचे कर्ज फेडणार टाटा केंद्र सरकार घेणार २० हजार कोटींचे कर्ज

मुंबई : प्रतिनिधी सरकारी विमान कंपनी एअर इंडियाची आता पुन्हा घरवापसी झाली आहे. टाटा समूहाने १८,००० कोटी रुपयांना एअर इंडिया खरेदी केली. वित्त मंत्रालयाच्या गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाने (डीआयपीएएम) ही घोषणा केली. एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसचे नेतृत्व टाटा करणार आहे. तसेच एअर इंडियाच्या डोक्यावर असलेल्या कर्जाचे जवळपास ५० टक्के कर्ज टाटाला फेडावे लागणार आहे. टाटा सन्सचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांनी आपल्या ट्विटमध्ये टाटा समूहाने एअर इंडियाची बोली जिंकणे ही मोठी बातमी असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, एअर इंडियाच्या पुनर्बांधणीसाठी खूप मेहनत घ्यावी लागेल. पण त्यामुळे टाटा समूहाला विमान उद्योगात मोठ्या प्रमाणात व्यवसायाच्या संधी उपलब्ध होतील. काही उद्योग खासगी क्षेत्रासाठी उघडण्याच्या धोरणाबद्दल रतन टाटा यांनी सरकारचे कौतुक केले. स्पाइसजेटचे अध्यक्ष आणि कन्सोर्टियमचे नेते, एअर इंडियासाठी दुसऱ्या क्रमांकाची  सर्वाधिक बोली लावणारे अजय सिंह यांनी या करारासाठी टाटा समूह आणि सरकार दोघांचे अभिनंदन केले. एअर इंडियाच्या बोलीसाठी शॉर्टलिस्ट होणे ही त्यांच्यासाठी …

Read More »

आणि मुख्यमंत्र्यांनी राणेंना करून दिली “त्या” फोनची आठवण जनतेच्या कामासाठी नेहमीच आपण राजकारण विरहीत काम करतो

सिंधुदूर्ग: विशेष प्रतिनिधी राणेंच्या जनादेश यात्रेच्या दरम्यान झालेल्या अटक नाट्यानंतर पहिल्यादांच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे हे चिपी विमानतळाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने एकाच मंचावर आले. मात्र या दोघांमध्ये असलेले शत्रुत्व सर्वश्रुत आहे. परंतु एका कामासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना फोन केल्याची आठवण दस्तुरखुद्द …

Read More »

उद्घाटन चिपी विमानतळाचे पण फटाके उडविले राणे आणि मुख्यमंत्री ठाकरेंनी कोकणात रंगला शाब्दीक सामना

सिंधुदूर्ग (चिपी विमानतळ) : प्रतिनिधी गेल्या अनेक वर्षापासून उद्घाटनाच्या प्रतिक्षेत असलेल्या जिल्ह्यातील चिपी विमानतळाचे उद्घाटन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते आणि केंद्रिय हवाई उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी केंद्रीय सुक्ष्म, मध्यम आणि लघु मंत्री नारायण राणे, केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब …

Read More »

सणासुदीच्या काळात ‘ह्या’ १० बँका देत आहेत स्वस्त गृहकर्ज, त्वरीत घ्या लाभ रिझर्व्ह बँकेने पतधोरण जैसे थे ठेवले तरी बँकाकडून स्वस्त कर्ज

मुंबई: प्रतिनिधी या सणासुदीच्या काळात तुम्हीही घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. सध्या अनेक बँकां, गृहनिर्माण वित्त कंपन्यांनी गृह कर्जाचा व्याजदर कमी केला आहे. हे गृहकर्जाचे व्याजदर गेल्या १० वर्षांतील सर्वात कमी आहेत. 1. एसबीआय देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ …

Read More »