Breaking News

दिवाळीच्या या खास वेळी शेअर बाजारात पैसे कमवण्याची संधी जाणून घ्या मुहुर्त ट्रेडिंगबद्दल

मुंबईः प्रतिनिधी शेअर बाजाराने अनेक वर्षांपासून आपल्या परंपरा जपल्या आहेत. यातील सर्वात महत्त्वाची परंपरा म्हणजे दिवाळीच्या दिवशी मुहूर्त ट्रेडिंग. दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर शेअर बाजारात मुहूर्ताचं ट्रेडिंग केलं जातं. गुंतवणूकदार मुहूर्तच्या विशेष प्रसंगी नव्या गुंतवणुकीस सुरुवात करतात. मुहूर्त ट्रेडिंग केल्याने गुंतवणुकदारांची वर्षभर भरभराट होईल असे म्हटले जाते. बीएसई आणि एनएसई दिवाळीच्या …

Read More »

मुंबईतील ६ किल्ल्यांचा होणार विकास सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांचे निर्देश

मुंबई: प्रतिनिधी मुंबईतील शिवडी, वरळी, वांद्रे, धारावी, सेंट जॉर्ज आणि माहिम अशा ६ किल्ल्यांसाठी एकत्रित विकास आराखडा तातडीने तयार करण्यात यावा, अशा सूचना सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिल्या. गड- किल्ल्यासंदर्भातील आढावा बैठक मंत्रालयात सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सांस्कृतिक कार्य …

Read More »

मुख्यमंत्री म्हणाले, ” संपूर्ण राज्य हाच माझा मतदारसंघ” अर्थसंकल्पातील योजना आणि विकासकामांचा लाभ मतदारसंघातील नागरिकांना देण्यासाठी सजग राहून पाठपुरावा करावा

मुंबई: प्रतिनिधी अर्थसंकल्प ही ठिपक्यांची रांगोळी असून प्रत्येक ठिपका हा राज्याचा मतदारसंघ आहे, हे मतदारसंघ जोडले तर जी सुंदर रांगोळी तयार होणार आहे त्यात आपल्याला विकासाचे रंग भरावयाचे आहेत. त्यातूनच विकसित राज्याची सुंदर रांगोळी आपल्याला रेखाटता येणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. अर्थसंकल्पातील योजना आणि विकासकामांचा अधिकाधिक लाभ …

Read More »

MPSC कडून या पदांकरीता जाहिरात प्रकाशितः जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा २९० पदांसाठी जाहिरात २ जानेवारीला होणार परिक्षा

मुंबईः प्रतिनिधी राज्य मंत्रिमंडळाने जाहिर केल्याप्रमाणे २०२१ मधील पहिली शासकीय पदांसाठीची जाहिरात आज प्रसिध्द करण्यात आली असून यासाठी अर्ज करण्याची तारीख २५ ऑक्टोंबरपर्यंत राहणार आहे. आज प्रसिध्द झालेल्या जाहिरातीत उपजिल्हाधिकारी, पोलिस उपअधिक्षक-सहायक पोलिस उपायुक्त, सहायक राज्य कर आयुक्त, गटविकास अधिकारी व तत्सम पदे, सहायक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा …

Read More »

ऑक्टोबरमध्ये घरबसल्या पैसे कमवण्याची संधी या कंपन्याचे येणार आयपीओ

मुंबईः प्रतिनिधी गुंतवणूकदारांना ऑक्टोबर महिन्यात घर बसल्या पैसे कमवण्याची उत्तम संधी मिळणार आहे. याचं कारण म्हणजे या महिन्यात पॉलिसी बाजारसह १२ कंपन्यांचे आयपीओ येणार आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भारतीय कंपन्यांनी आतापर्यंत आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये आयपीओद्वारे ५९,७१६ कोटी रुपये उभारले आहेत. त्याचबरोबर अनेक कंपन्या अजूनही त्यांच्या आयपीओसाठी भांडवली बाजार नियामक …

Read More »

सुभाष साबणे म्हणाले, “भाजपा हा शिवसैनिकांसाठी मावशीसारखा” देगलूर पोटनिवडणुकीतील भाजपाच्या विजयाने राज्यात परिवर्तनाची गती वाढेल-चंद्रकांत पाटील

देगलूर: प्रतिनिधी  महाविकास आघाडीच्या पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखविले म्हणून पोलिसांकडून शिवसैनिकांना लाथांनी तुडविण्यात आले. शिवसैनिकांचा अपमान करण्यात आला. हे आपल्याला सहन झाले नाही. त्यामुळे अनेक शिवसैनिकांसह आपण भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपा हा पक्ष शिवसैनिकांसाठी मावशीसारखा आहे. राज्यात भाजपा शिवसेना युतीचे सरकार असताना शेतकऱ्यांना वेगवेगळ्या स्वरुपाची मदत मिळाली. मतदारसंघात रस्त्यांची कामे …

Read More »

सार्वजनिक विसर्जन करण्यास मनाई :गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी नवरात्रौत्सव साजरा करताय मग या मार्गदर्शक सूचनांचे पालन करा

मुंबई : प्रतिनिधी गृह विभागाने सार्वजनिक नवरात्रौत्सव २०२१ बाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. नवरात्रोत्सव साजरा करताना सर्व नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीकोनातून योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ७ ते १५ ऑक्टोबर, २०२१ दरम्यान नवरात्र / दुर्गापुजा /दसरा सण साजरा करण्यात येणार आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी, अजूनही कोरोनाचा धोका …

Read More »

आणि मुख्यमंत्री ठाकरेंना आठवला त्यांच्या शाळेचा पहिला दिवस…. सुरू झालेल्या शाळा परत बंद करायच्या नाहीत हा निर्धार ठेऊया- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई: प्रतिनिधी आजपासून सुरु झालेल्या शाळा परत बंद करायच्या नाहीत अशा निर्धाराने शिक्षण सुरू ठेवू, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. राज्यातील सर्व विद्यार्थी, शिक्षक यांच्याशी दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला व त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यावेळी ते बोलत होते. शाळा सुरु करुन आपण मुलांच्या विकासाचे, प्रगतीचे दार …

Read More »

पीडित शेतकरी कुटुंबियांना भेटणे भाजपाच्या राज्यात गुन्हा आहे का ? उत्तर प्रदेशात भारतीय जनता पार्टीचे तालिबानी राज !: नाना पटोले

मुंबई : प्रतिनिधी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस व उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियंका गांधी या पीडित शेतकरी कुटुंबियांना भेटण्यास जाताना उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना केलेल्या अटकेचा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी तीव्र निषेध केला आहे. उत्तर प्रदेशात कायद्याचे राज्य नसून अजयसिंह बिष्ट यांच्या नेतृत्वाखालील तालीबानी राज असल्याचा …

Read More »

जीएसटीतून सलग तिसऱ्या महिन्यात १ लाख कोटींचं उत्पन्न अर्थव्यवस्था लागली रूळावर यायला

मुंबईः प्रतिनिधी चालू आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला देशाला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करावा लागला. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवरही परिणाम झाला. पण आता अर्थव्यवस्था रुळावर येत असल्याचे दिसून येत आहे. सप्टेंबरमध्ये जीएसटी कलेक्शन ५ महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचले आहे. सप्टेंबर महिन्यात जीएसटीपासून १ लाख १७ हजार १० कोटी रुपयांचा महसूल सरकारला मिळाला आहे. जीएसटी …

Read More »