औरंगाबाद-मुंबई : प्रतिनिधी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा अवमान करणारे वक्तव्य मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केल्याचा आरोप भाजपाकडून करण्यास सुरुवात झाली. मात्र भाजपाकडून करण्यात येत असलेला तो आरोप उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदावर असताना केला नसून तो मुख्यमंत्री होण्याआधी पालघर येथील पोटनिवडणूकीत केल्याचा दावा शिवसेनेचे विधान परिषद आमदार अंबादास …
Read More »योगी आदित्यनाथ यांचा अवमान केल्याप्रकरणी आता भाजपाकडून मुख्यमंत्र्यांच्या विरोधात तक्रारी यवतमाळ पाठोपाठ नाशिकमध्येही अर्ज दाखल
नाशिक-मुंबई: प्रतिनिधी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेनेकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात तक्रारी दाखल केल्यानंतर आता भाजपाकडून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विरोधात तक्रारी दाखल करण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला असून यवतमाळमध्ये तक्रार अर्ज दाखल केल्यानंतर आता नाशिकमध्येही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी तक्रार …
Read More »अनिल परबांच्या त्या क्लिपची सीबीआय चौकशी करा संयमी माणसासोबत राहूनही शिवसेना संकुचित का राहते ? आशिष शेलार यांचा सवाल
मुंबई: प्रतिनिधी ज्यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे अटक झालेली नव्हती, त्यापुर्वीच राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब दूरध्वनीवरुन अनेक संशयास्पद बाबी बोलत असल्याची ध्वनी फित समोर आली आहे. राणे यांच्या अटकेसाठी पोलीस यंत्रणेवर दबाव आणत होते, न्यायालयाबाबत काही गंभीर विधाने करुन अपमान करीत असल्याची व्हिडीओ क्लीप समोर आल्याने या संपूर्ण प्रकरणाची केंद्रीय गुप्तचर विभागामार्फत …
Read More »जमिनी दिलेल्या या प्रकल्पग्रस्तांना मिळणार नोकऱ्या तिन्ही कंपन्यात सामावून घेण्याचा प्रस्ताव सादर करा- ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत
मुंबई : प्रतिनिधी वीजनिर्मिती केंद्रांसाठी जमीनी संपादन केलेल्या प्रकल्पग्रस्तांची यादी महानिर्मितीच्या पातळीवर ठेवण्यात येते तसेच महानिर्मितीमधील तंत्रज्ञ पदांच्या भरतीसाठी या उमेदवारांना ५० टक्के जागा राखीव ठेवल्या जातात. तथापि, या उमेदवारांना लवकरात लवकर नोकरीची संधी मिळावी यादृष्टीने महानिर्मिती, महावितरण तसेच महापारेषण या तिन्ही कंपन्यांनी सामावून घेण्यासाठी प्रस्ताव तयार करुन एमएसईबी सूत्रधारी कंपनीकडे सादर करावा, असे निर्देश …
Read More »नाशिक गुन्हेप्रकरणात नारायण राणेंना उच्च न्यायालयाचा तुर्त दिलासा १७ सप्टेंबर पर्यंत कठोर कारवाई न करण्याचे आदेश
मुंबईः प्रतिनिधी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी नाशिक सायबर पोलिसांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या गुन्हे प्रकरणात १७ सप्टेंबर पर्यत कोणतीही कारवाई करून नये असे आदेश नाशिक पोलिसांना देत मुंबई उच्च न्यायालयाने राणे यांना तात्पुरता दिलासा दिला. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी …
Read More »शालेय अभ्यासक्रमात कृषी विषयाचा होणार समावेश शालेय आणि कृषी विभाग तयार करणार अभ्यासक्रम-शालेय शिक्षणमंत्री आणि कृषी मंत्र्यांच्या बैठकीत निर्णय
मुंबई : प्रतिनिधी कृषी या विषयाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद आणि महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद यांनी संयुक्तपणे अभ्यासक्रम तयार करावा असा निर्णय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड आणि कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. कृषी विषयाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्याच्या …
Read More »नारायण राणेंचा पुन्हा सूचक शब्दातून इशारा, माझं कोणीच काही करु शकत नाही यात्रा पुन्हा सुरु होणार असल्याचे सांगत त्यांना एकटा पुरून उरलोय
मुंबई: प्रतिनिधी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबद्दल विधान केल्याप्रकरणी पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर जामिनावर बाहेर आलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज पुन्हा एकदा शिवसेना आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे नाव न घेता पुन्हा थेट इशारा दिला. माझं कोणीच काही करू शकत नाही. तुम्हालाही मुलं-बाळं नाहीत का असे वक्तव्य करत मी तुम्हा …
Read More »राणे यांना सूडबुद्धीने अमानुष वागणूक, तरीही त्यांची जन आशिर्वाद यात्रा होणारच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची घोषणा
पुणे : प्रतिनिधी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची न्यायालयाने जामीनावर मुक्तता केल्यामुळे सत्याचा विजय झाला आहे. ठाकरे सरकारने सूडबुद्धीने अमानुष वागणूक दिल्यामुळे नारायण राणे यांची तब्येत बिघडली. पण ते बरे झाल्यानंतर त्यांची कोकणातील जन आशिर्वाद यात्रा लवकरच पुन्हा सुरू होईल, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी पुण्यात पत्रकारांना सांगितले. केंद्रीय …
Read More »भारतातील सामाजिक लढ्यातील शिलेदार डॉ. ऑम्व्हेट यांचे निधन सांगलीतील कासेगांव येथे अंत्यसंस्कार
सांगली-मुंबई: प्रतिनिधी अमेरिकेसारख्या देशात जन्माला येवून ही तेथील भौतिक आणि सधनतेचा कोणताही मोहात न अडकता भारतातील जातीय-वर्ग लढ्यातील एक बिनीची शिलेदार म्हणून काम करण्याचे धाडस करणाऱ्या डॉ.गेल ऑम्व्हेट यांचे आज सकाळी वृध्दपकाळाने निधन झाले. त्या ८१ वर्षाच्या होत्या. त्यांच्यावर कासेगांव येथील क्रांतिकारक पाटणकर संस्थेच्या आवारात अंत्यसंस्कार करण्यात आले. भारतातील अनेकांना …
Read More »नारायण राणेंना आधी न्यायालयीन कोठडी नंतर अटींवर जामीन मंजूर जिल्हा सत्र न्यायालयातील सुनावणी दरम्यान दिला निर्णय
महाड: प्रतिनिधी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांनी गोळवली येथून जेवत असताना अटक करून त्यांना महाड पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर रात्री उशीरा महाड येथील सत्र न्यायालयात त्यांना हजर करण्यात आले. त्यावेळी सुरूवातीला राणे यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली. मात्र १५ मिनिटाच्या अंतरानंतर …
Read More »
Marathi e-Batmya