Breaking News

न्यायालयाने राज्यपालांना फटकारले: मुख्यमंत्र्याशी चर्चा करून निर्णय घ्यावा मुंबई उच्च न्यायालयाचे राज्यपालांना फटकारले

मुंबई : विशेष प्रतिनिधी महाविकास आघाडी सरकारने राज्यपाल नियुक्त आमदार पदासाठी १२ जणांच्या नावाची शिफारस राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे पाठविण्यात आली. मात्र राज्यपालांनी या शिफारसींवर कोणताही निर्णय न घेतल्याने महाविकास आघाडीने केलेल्या शिफारसींवर निश्चित कालावधीत एक तर निर्णय अर्थात स्विकारायला पाहिजे अन्यथा सदरच्या शिफारसी पुन्हा राज्य सरकारकडे परत पाठवायाला हव्यात …

Read More »

अखेर १५ टक्के शुल्क माफीचा आदेश: भरलेली फी समायोजित करा अन्यथा परत राज्य सरकारच्या निर्णयाला खाजगी शाळा देणार आव्हान

मुंबई: प्रतिनिधी सर्वोच्च न्यायालयाच्या दट्यानंतर अखेर राज्य सरकारने १५ टक्के शुल्क कपातीचा शासन निर्णय आज राज्य सरकारने जारी करत भरलेली फी एक तर पुढील वर्षभरात तिमाही, सहामाही पध्दतीने समायोजित करा किंवा सदरची फी परत देण्याचे आदेशही राज्य सरकारने सर्व खाजगी शाळांना या शासन निर्णयान्वये दिले. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांना एकप्रकारे …

Read More »

सामाजिक न्याय विभागाचा निधी इतरत्र वळविला जावू यासाठी कायदा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे याची माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाला मागासवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या विविध योजनांसाठी दरवर्षी हजारो कोटी रुपयांचा निधी प्राप्त होत असतो या निधीचा विनियोग नियोजनबद्धरित्या करून प्रत्येक गरजू लाभार्थ्यांना लाभ मिळेल यासाठी प्रत्येक योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी व मूल्यमापन करता यावे यासाठी तेलंगणा राज्याच्या धर्तीवर बजेट अंमलबजावणीचा कायदा करण्यात येणार …

Read More »

संसदेत काल जे घडले ते अलोकतांत्रिक गुजरात मॉडेलची प्रतिकृती संसदेत महिला सदस्यांसोबत झालेली धक्काबुक्की ही अशोभनीय घटना-नवाब मलिक

मुंबई: प्रतिनिधी संसदेत महिला सदस्यांसोबत पुरुष मार्शलने जी धक्काबुक्की केली. बळाचा वापर करण्यात आला ही घटना अशोभनीय असून जे घडले ते अलोकतांत्रिक गुजरात मॉडेलची प्रतिकृती होती असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी करत नाराजी व्यक्त केली. संसदेचे कामकाज दोन दिवसाअगोदर स्थगित करण्यात आले. …

Read More »

आघाडी सरकारकडून मुंबईकरांची लोकल कोंडी भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची टीका

मुंबई: प्रतिनिधी लसीचे दोन डोस घेतलेल्या मुंबईकरांना लोकल प्रवास करण्याची परवानगी देण्याची प्रक्रिया हेतुपूर्वक किचकट करून राज्य सरकार मुंबईकरांची ‘लोकल कोंडी’ करीत आहे. कमीत कमी मुंबईकरांनी लोकल मधून प्रवास करावा अशीच सरकारची इच्छा असल्याचे दिसते आहे. अनेक निर्बंधांनी वैतागलेल्या सामान्य मुंबईकरांची लोकल कोंडी करणे राज्य सरकारने थांबवावे असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते केशव …

Read More »

जाब विचारणारे ट्विट करत जेरीस आणल्याने मोदींच्या दबावाखाली काँग्रेसची खाती बंद काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा आरोप

मुंबई: प्रतिनिधी काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांचे ट्विटर खाते बंद केल्यानंतर आता अखिल भारतीय काँग्रेस पक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षासह देशभरातील काँग्रेसचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांची ट्विटर खाती बंद करण्यात आली आहेत. ट्विटरची ही कारवाई पक्षपातीपणाची असून केंद्रातील मोदी सरकारला जाब विचारणारे ट्विट करून जेरीस आणल्यामुळेच मोदी सरकारच्या …

Read More »

#BreakTheChain दोन लस घेवून १४ दिवस झालेल्यांसाठी या सर्व गोष्टी खुल्या दुकाने, रेस्टॉरंट, शॉपिंग मॉल अखेर रात्री उशीरापर्यंत सुरू राहणार

मुंबई : प्रतिनिधी १५ ऑगस्टपासून मुंबईतील सर्वसामान्यांना लोकलने प्रवास करण्यास राज्य सरकारने परवानगी दिल्यानंतर आता रात्री १० वाजेपर्यंत हॉटेल्स-रेस्टॉरंट, दुकाने, शॉपिंग मॉल आदी गोष्टी सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. याशिवाय लग्नासाठी असलेली लोकसंख्या मर्यादेची अट शिथिल करत हॉल-लॉनच्या क्षमतेपेक्षा ५० टक्के पर्यत नागरीकांच्या उपस्थितीत मान्यता देण्यात आली आहे. याशिवाय सलून-स्पा …

Read More »

राज्यातील मुंबई, नांदेड, पुणे, रायगड, पालघरसह ८ जिल्ह्यात आढळले डेल्टाचे २० रूग्ण जिनोमिक सिक्वेंसिंगमध्ये आणखी २० डेल्टा प्लस रुग्ण आढळले

मुंबई: प्रतिनिधी कोरोना प्रतिबंध आणि नियंत्रण उपाययोजनांचा एक अविभाज्य भाग म्हणून कोरोनाविषाणूचे जनुकीय क्रमनिर्धारण (जिनोमिक सिक्वेंसिंग) नियमित स्वरुपात करण्यात येत आहे. आज सी. एस. आय. आर. आय जी आय बी प्रयोगशाळेने आणखी २० डेल्टा प्लस रुग्ण शोधले असून त्यामुळे राज्यात आतापर्यंत आढळलेल्या डेल्टा प्लस रुग्णांची संख्या ६५ झाली आहे. नव्याने …

Read More »

अनाथांना आरक्षणासह या महत्वाच्या प्रश्नी राज्य मत्रिमंडळाने घेतले हे निर्णय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत झाली बैठक

मुंबई: प्रतिनिधी आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनाथ मुलांना शिक्षण आणि नोकरीत आरक्षण देताना याची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वसतीगृह उलपब्ध करण्याच्या धोरणातही बदल करत दुय्यम आणि मुद्रांक निरिक्षक पदे लोकसेवा आयोगा मार्फत भरण्याच्या निर्णयासह काही महत्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले. ते निर्णय …

Read More »

चंद्रकांत पाटील म्हणाले, अशोकराव द्यायचे की नाही ते स्पष्ट सांगा अशोक चव्हाणांना भाजपाचे थेट मराठा आरक्षणावरून थेट आव्हान

मुंबई : प्रतिनिधी मराठा समाजाचे अस्तित्वात असलेले आरक्षण महाविकास आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात कमकुवतपणे बाजू मांडून गमावल्यानंतर या सरकारचे मंत्री अशोक चव्हाण सातत्याने मराठा आरक्षणाबाबत नवे मुद्दे काढून दिशाभूल करत आहेत. आता घटनादुरुस्तीनंतर राज्याला पूर्ण अधिकार मिळाल्यानंतर ते पन्नास टक्क्यांच्या मुद्द्यावर अडून बसले आहेत. राज्याच्या अधिकारातील कामे पूर्ण करण्याच्या ऐवजी …

Read More »