Breaking News

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना उद्यापासून मदत : मुंबई लोकलवरून केंद्राचे राजकारण मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीच्या आधी मदत देण्यात येणार आहे. त्यादृष्टीने या शेतकऱ्यांना उद्यापासून मदतीचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. हि मदत उद्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवाळीत काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर …

Read More »

फडणवीसांचा सल्ला, अनावश्यक बाबींकडे लक्ष देण्यापेक्षा शेतकऱ्यांना तातडीने मदत करा मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना लिगिले पत्र

मुंबई: प्रतिनिधी अतिवृष्टी-बोंडअळीमुळे कापूस-सोयाबीनचे प्रचंड नुकसान झालेले असताना सुद्धा विदर्भातील शेतकर्‍यांना कुठलीही मदत नाही. शेतमाल खरेदी सुद्धा अद्याप सुरू झालेली नाही. त्यामुळे अन्य अनावश्यक बाबींकडे लक्ष देण्यापेक्षा राज्य सरकारने शेतकर्‍यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी करणारे पत्र माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना …

Read More »

राज्यात फटाकेमुक्त दिवाळीः पण २ ऱ्या लाटेला रोखण्यासाठीची पूर्व तयारी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी दिवाळी साजरी करताना गर्दी टाळा, खबरदारी घेऊन महाराष्ट्रात फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी नागरिकांना केले. सध्या कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात असली तरी कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात येणार असून फिव्हर सर्व्हेलन्स प्रभावीपणे करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नेमण्यात आलेले राज्य …

Read More »

महाविकास आघाडी सरकार राज्यात परवडणारी सिनेमागृहे उभारणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी सिनेमा व नाटक हा समाजाचा आरसा आहे असे म्हटले जाते. कारण समाजात जे आजूबाजूला घडत असते त्याचे प्रतिबिंब आपल्याला सिनेमातून पहायला मिळते. महाराष्ट्रात वेगवेगळया विषयावर बनत असलेल्या कलाकृती गावपातळीवर, खेड्यापाड्यात पोहोचण्यासाठी येणाऱ्या काळात महाराष्ट्रात ‘परवडणारी सिनेमागृहे’ उभारण्यासाठी राज्य शासन पुढाकार घेईल आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट …

Read More »

ऊर्जा मंत्र्यांनी तोटा कमी करण्यासाठी मांडला हा अॅक्शन प्लान उत्पन्नाचे नवे स्रोत शोधा, संगनमताने होणारी वीज बिलातील लूट थांबवा

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील तीनही वीज कंपन्यांची आर्थिक स्थिती चिंताजनक असल्याची गंभीर दखल घेत कंपन्यांनी आपला तोटा कमी करण्यासाठी तातडीने पावले उचलावीत. तसेच उत्पन्नाचे नवे स्रोत शोधायला हवे, स्वतःकडे असलेली सर्व संपत्ती आणि त्याचे मूल्य ही माहिती गोळा करून आपले बाजारमूल्य वाढवावे, बाह्ययंत्रणा कडून घेतलेले कर्ज कमी करून भविष्यातील कर्जासाठी …

Read More »

कोरोना: एकूण रूग्णसंख्या १७ लाखाच्या घरात पण घरी गेले १५ लाखाहून अधिक ५ हजार ५०५ नवे बाधित, ८ हजार ७२८ बरे झाले तर १२५ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी मागील सात महिने ५ दिवसात राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १६ लाख ९८ हजार १९८ वर पोहोचली आहे. मात्र दुसऱ्याबाजूला राज्यात कोरोनाबाधित ८ हजार ७२८ इतके रूग्ण बरे होत बरे होवून घरी जाणाऱ्यांची संख्या १५ लाख ४० हजार ००५ वर पोहोचली आहे. त्यामुळे राज्यात आजस्थितीला १ लाख १२ …

Read More »

या देशात भाजप समर्थकांना सात खून माफ आहेत का? राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक यांचा सवाल

मुंबई: प्रतिनिधी अन्वय नाईक यांच्या आत्महत्येत आरोपी असलेल्या अर्नव गोस्वामी यांच्या बचावासाठी केंद्रातील मंत्री येत असतील तर या देशात भाजप समर्थकांना सात खून माफ आहेत का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टिव्हीचे अर्नव गोस्वामी यांना आज अटक …

Read More »

अर्णव गोस्वामीवरील कारवाईने सत्ताधारी-विरोधक आमने सामने भाजपाचे ठिकठिकाणी मोर्चे

मुंबईः प्रतिनिधी रिपब्लिक टि.व्ही.चे संपादक अर्णव गोस्वामी यांना आर्किटेक्ट अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी आज सकाळी अटक करण्यात आली. या अटकेवरून सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजपा आमने-सामने आल्याचे चित्र राज्यात पाह्यला मिळाले. गोस्वामी यांना अटक केल्यानंतर भाजपाकडून महाविकास आघाडी सरकारवर काँग्रेसच्या मदतीने आणीबाणी आणत असल्याचा आरोप शिवसेनेवर करत महाराष्ट्रात लोकशाहीचा गळा …

Read More »

परंपरागत दरवर्षीची शिक्षक व विद्यार्थ्यांना दिवाळीची सुट्टी मिळणार! शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणातून दिवाळीची सुट्टी मिळणार असल्याची अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण देशात ऑनलाईन शिक्षण पध्दती अवलंब करण्यात येत आहे. शालेय विद्यार्थी, शिक्षक व पालकही अव्याहतपणे अध्ययन व अध्यापन प्रक्रियेत गुंतले आहेत व त्यांनी शाळा बंद असल्या तरी …

Read More »

राज्यातील स्विमिंग पूल, चित्रपटगृह-नाट्यगृहासह या गोष्टी उद्यापासून सुरु राज्य सरकारकडून अधिसूचना जारी

मुंबईः प्रतिनिधी Missionbeginagain अंतर्गत राज्य सरकारने आणि अनलॉक लॉकडाऊन अंतर्गत राज्यातील जलतरण खेळाडू आणि मर्यादीत लोकांकरीता स्विमिंग पूल, चित्रपटगृह-नाट्यगृह-मल्टीप्लेक्स आणि योगा इन्स्टिट्युट सुरु करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली. तसेच या तीन गोष्टी ५ नोव्हेंबर अर्थात उद्यापासून सुरु करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली असून त्या अनुषंगाने अधिसूचना जारी करण्यात आली. काही …

Read More »