Breaking News

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, राज्यात १ लाख कोटींची गुंतवणूक आणण्याचे उद्दिष्ट सिंगापूर, जपानसह देशातील उद्योगपतींबरोबर ३५ हजार कोटींचे सामंजस्य करार

मुंबईः प्रतिनिधी महाराष्ट्र सरकार आणि गुंतवणूकदार यांच्यात एक विश्वास आहे. त्यामुळे मागील सांमजस्य करारातील ६० टक्के उद्योगांच्या बाबतीत सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगत राज्यात १ लाख कोटी रूपयांची गुंतवणूक आणण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. मँग्नेटीक महाराष्ट्र २.० अंतर्गत राज्यात सिंगापूर, जपान यांच्यासह देशातील विविध उद्योगपतींसोबत ३५ …

Read More »

रब्बी हंगामासाठी ३ लाख १४ हजार क्विंटल बियाणे अनुदानावर वाटप करणार कृषीमंत्री दादाजी भुसे यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी कृषि विद्यापीठांमार्फत नव्याने संशोधित केलेल्या सुधारीत व संकरीत वाणांच्या प्रसारासाठी कृषि विभागामार्फत रब्बी हंगामासाठी ३ लाख १४ हजार क्विंटल बियाणे अनुदानावर वाटप करण्यात येणार असून त्यासाठी ६२.७९ कोटीची तरतूद करण्यात आली आहे, असे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. राज्यात चालु वर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने रब्बी हंगामासाठी …

Read More »

रिझर्व्ह बँकेने आर्थिक व्यवसायाच्या वेळेत केली वाढ ९ तारखेपासून वाढीव वेळेत सुरु राहणार

मुंबईः प्रतिनिधी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन लागू करण्यात आल्याने गेली काही महिने आर्थिक बाजारातील व्यापारावर वेळेचे निर्बंध आणण्यात आले. परंतु आता लॉकडॉऊनमध्ये शिथिलता आणत सर्वच गोष्टी पूर्वपदावर आणण्यात येत आहेत. यापार्श्वभूमीवर आर्थिक बाजारातील व्यापारावर असलेली वेळेची मर्यादेत पुन्हा वाढ कऱण्याचा निर्णय घेण्यात आला असून या वाढीव वेळेची अंमलबजावणी ९ नोव्हेंबर …

Read More »

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील पाच रिक्त जागांसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर आचारसंहिता आजपासून लागू १ डिसेंबरला होणार मतदान

मुंबईः प्रतिनिधी विधानसभा निवडणूकीत पदवीधर मतदारसंघातून ३ पैकीपैकी एक विधान परिषद सदस्य विजयी झाल्याने तर २ शिक्षक पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेल्या सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने या पाच जागांसाठीच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. या निवडणूकीसाठी आजपासून आचारसंहिता लागू झाली असून १ डिसेंबर २०२० रोजी मतदान होणार आहे. विधान परिषदेवर औरंगाबाद …

Read More »

सुशांतसिंह प्रकरणी महिना झाला तरी ‘इतना सन्नाटा क्यूँ है भाई? सीबीआय बिहारच्या आदर्श आचारसंहितेचे पालन करत आहे का? काँग्रेसचा सवाल

मुंबई : प्रतिनिधी अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या दुर्दैवी निधनावर काही मंडळींनी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर सीबीआयने या प्रकरणाचा तपास केला पण ते कोणत्याच निष्कर्षापर्यंत पोहचू शकले नाहीत. मुंबई पोलीस व कूपर रुग्णालयाच्या शवविच्छेदन अहवालावर शंका उपस्थित करत एम्सकडे ते तपासासाठी पाठवण्यात आले पण सुशांतने आत्महत्याच केल्याचा अहवाल एम्सच्या पॅनलनेही दिला. या अहवालाला …

Read More »

कोरोनावर मात करून उपमुख्यमंत्री अजित पवार रुग्णालयातून घरी उत्तम प्रकृतीसाठी सदिच्छा... प्रार्थना करणाऱ्या सर्वांसह राज्यातील जनतेचे उपमुख्यमंत्र्यांनी मानले जाहीर आभार

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील कोट्यवधी जनतेच्या सदिच्छा… कार्यकर्त्यांची प्रार्थना तसेच उपचार करणाऱ्या डॉक्टर, नर्सेस, सपोर्ट स्टाफच्या प्रयत्नांमुळे मी कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून आज घरी परतलो आहे. माझी प्रकृती उत्तम असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील आणखी काही दिवस घरीच विलगीकरणात राहणार आहे. माझ्या उत्तम प्रकृतीसाठी सदिच्छा व्यक्त करणाऱ्या हितचिंतकांचा मी मनापासून आभारी आहे, अशा …

Read More »

११ वीचे ऑनलाईन क्लासेस सुरु: जॉंईनींगसाठी या संकेतस्थळावर नाव नोंदवा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी कोरोनाच्या प्रादुर्भावात घट होताना दिसत असले तरी शाळा, कॉलेज सुरु करण्याबाबत राज्य सरकारने अद्याप निर्णय घेतलेला नाही. यापार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये यासाठी शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन क्लासेस सुरु करण्यात आले. त्याचधर्तीवर आता ११ वीच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन क्लासेसच्या मार्फत शिक्षण सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून या …

Read More »

कोरोना : १ ऑक्टों. ते १ नोव्हें.मध्ये वाढलेल्या रूग्णांपेक्षा घरी जाणारे दुप्पट ५ हजार ३६९ नवे बाधित, ३ हजार ७२६ बरे झाले तर ११३ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी राज्यात ऑक्टोंबर महिन्यात साधारणत: २१ लाख ४९ हजार ४२० अर्थात दिवसाकाठी ७० हजार चाचण्या झाल्या असून या चाचण्यामागे २ लाख ८२ हजार ८५३ इतके बाधित आढळून आले आहेत. १ ऑक्टोंबर २०२० रोजी राज्यात २ लाख ५९ हजार ००६ इतकी अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या होती. त्यात १ नोंव्हेंबर २०२० …

Read More »

मनसे कार्यकर्त्याच्या आत्महत्येमुळे राज ठाकरे जेव्हा व्यथित होतात, तेव्हा… पुन्हा अशी श्रध्दांजली वाहण्याची वेळ येवू देवू नका असे भावनिक आवाहन

मुंबई: प्रतिनिधी नांदेडमधील मनसैनिकाने जात आणि पैशामुळे राजकारण करू शकत नसल्याचे कारण देत आपण सोडून जात असल्याचे सांगत आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली. या घटनेमुळे व्यथीत झालेल्या मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी तुम्ही धीर सोडू नका, तुम्ही खचलात, उन्मळून पडलात तर सगळ्यात मलाच जास्त त्रास होईल असे सांगत जात आणि पैशाच्या …

Read More »

जळगांवकडे येताना एकनाथ खडसेंच्या गाडीला अपघात सर्वजण सुखरूप असल्याची खडसेंची माहिती

जळगांव : प्रतिनिधी भाजपातून नुकतेच राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या जळगांवकडे येताना धरणगांव नजिक गाडीला अपघात झाला. मात्र सर्वजण सुखरूप असल्याची माहिती खडसे यांनीच ट्विटरवरून माहिती दिली. आज जळगांवकडे येताना धरणगांव येथे गाडीला किरकोळ स्वरूपात अपघात झाला. सुदैवाने गाडीचा वेग कमी असल्याने आणि ड्रायव्हरच्या प्रसंगावधनाने आम्ही …

Read More »