मुंबई : प्रतिनिधी कर्तव्य बजावताना कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झालेल्या परभणी जिल्ह्यातील ग्रामविकास अधिकाऱ्याच्या वारसास ५० लाख रुपयांची विमा कवच रक्कम अदा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. सुपा (ता. गंगाखेड, जि. परभणी) या ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी रामदास आम्ले हे ग्रामस्थांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी …
Read More »नोंदणी झालेल्या बांधकाम कामगारांच्या खात्यावर दुसरा हप्ता जमा होणार कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदीत सक्रीय (जिवित) बांधकाम कामगारांना आणखी ३ हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. बांधकाम कामगारांच्या खात्यात दुसरा हप्ता मंजूर करण्याबाबत कामगार मंत्री यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा फायदा राज्यातील …
Read More »मिस्टर विकास… सर्जनशील लेखक सुदेश जाधव यांची वास्तवाधारीत कथा
जग्गूचा कुत्रा फेमस. जग्गूला २०१४ च्या प्रचार मोर्चात एका रस्त्याच्या कडेला पक्षाचा झेंडा चघळत पडलेला सापडला. जग्गूने त्याला उचलून घरात आणलं आणि मोदी निवडून आल्यावर चांगल्या पायगुणाचा कुत्रा म्हणून चक्क जग्गूने त्याचं जे बारसं घातलं, ते अख्या गावभर फेमस झालं. लोकांनी कुत्र्याचं नावं विकास ठेवलं. जग्गू ने गावाला विश्वास ठेवायला भाग पाडलं कि माझ्या कुत्र्याचा …
Read More »परदेश शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याच्या मुदतीत २८ ऑगस्ट पर्यंत वाढ सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी आंतरराष्ट्रीय स्तरावर नामांकित विद्यापीठांमध्ये पदव्युत्तर पदवी किंवा तत्सम उच्च शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या परदेश शिष्यवृत्ती साठी सन २०२० – २१ या नवीन शैक्षणिक वर्षात लाभ मिळवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी दिलेली १४ ऑगस्ट पर्यंतची मुदत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंधरा दिवसांनी वाढवुन आता २८ ऑगस्ट पर्यंत …
Read More »चाकरमान्यांनो पोलिस स्टेशनला नाव नोंदवा गणेशोत्वासाठी टोल माफी मिळवा सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना टोल माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गणेशोत्सव सुरू होण्याच्या दोन दिवस आधी आणि परतीच्या प्रवासात दोन दिवस टोल मधून सवलत मिळणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. यासंदर्भात मंत्री शिंदे, गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सार्वजनिक …
Read More »कोरोना: रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७० टक्क्यांवर तर मृतकांची संख्या सर्वाधिक ११ हजार ८१३ नवे बाधित, ९११५ बरे होवून घरी गेले
मुंबई : प्रतिनिधी राज्यात ९११५ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यभरात कोरोनाचे एकूण ३ लाख ९० हजार ९५८ रुग्ण बरे झाले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होणाचे प्रमाण ६९.८ टक्के एवढे आहे. आज ११ हजार ८१३ नविन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ४९ हजार ७९८ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत. …
Read More »कोरोना: आठवड्यात दुसऱ्यांदा घरी जणारे, बाधित रूग्ण आणि मृतकांची संख्या जास्त १२ हजार ७१२ नवे बाधित, १३ हजार ४०८ बरे झाले ३४४ मृतकांची नोंद
मुंबई: प्रतिनिधी एकाच आठवड्यात आज दुसऱ्यांदा १३ हजार ४०८ जण बरे झाल्याने घरी गेले आहेत. तर १२ हजार ७१२ नवे बाधित रूग्ण आढळून आले आहेत. यापूर्वी ९ ऑगस्ट रोजी १३ हजार ३४८ जणांना घरी तर १२ हजार २४८ नवे बाधित रूग्ण आढळून आले होते. तसेच याच दिवशी सर्वाधिक ३९० मृतकांची …
Read More »MPSC परिक्षेच्या तारखेत पुन्हा बदल २० सप्टेंबर रोजी होणार
मुंबई: प्रतिनिधी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परिक्षा नियोजित तारखेला घेण्याऐवजी पुढे ढकलण्यात आली होती. मात्र त्यानंतर ही परिक्षा जून आणि नंतर १३ सप्टेंबर रोजी घेण्याचे निश्चित करण्यात आले. परंतु आता त्याही तारखेची परिक्षा वेळापत्रकात बदल करण्यात आला असून आता ही परिक्षा २० सप्टेंबर रोजी घेण्यात येणार …
Read More »या लाभार्थ्यांना मिळणार पाच महिने मोफत चणाडाळ राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
मुंबई: प्रतिनिधी प्रधान मंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतील राज्यामधील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थींना जुलै ते नोव्हेंबर २०२० या कालावधीकरिता अख्या चण्याऐवजी प्रति महिना प्रत्येक शिधापत्रिकाधारकास एक किलो मोफत चणाडाळ वितरित करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. राज्यात अख्या चण्याऐवजी डाळ …
Read More »गुजरातमधल्यापेक्षा राज्यातल्या निवासी डॉक्टरांना मिळणार जास्त विद्यावेतन राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील १८ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व ३ दंत महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात वाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यानुसार कनिष्ठ निवासी व वरिष्ठ निवासी यांच्या सध्याच्या विद्यावेतनात १० हजार रुपये वाढ याच महिन्यापासून करण्याचे ठरले. यामुळे २९ कोटी ६७ लाख …
Read More »
Marathi e-Batmya