Breaking News

राज्यातली महिला बचत गटे झाली ग्लोबल ॲमेझॉन आणि जीईएम या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध झाल्याची मंत्री मुश्रीफ यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी कोरोना संकटकाळात बचतगटांचा व्यवसाय ठप्प झाल्याने त्यांना मोठा फटका बसला होता. ग्राहकांनाही बचतगटांच्या वस्तुंपासून वंचित रहावे लागले होते. पण आता बचतगटांची उत्पादने ही ॲमेझॉन आणि जीईएम या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करण्यात आली असून त्यामुळे बचतगटांना व्यवसाय आणि ग्राहकांना त्यांच्या वस्तू सुलभरित्या घरपोच मिळणार आहेत, अशी माहिती ग्रामविकास मंत्री …

Read More »

अर्सेनिक अल्बम व आयुर्वेदीक औषध ५ कोटी ग्रामीण जनतेस मोफत औषध खरेदीचे अधिकार जिल्हा परिषदांना – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई: प्रतिनिधी प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी अर्सेनिक अल्बम व आयुर्वेदीक औषध ग्रामीण भागातील सुमारे ५ कोटी जनतेस मोफत देण्यात येणार असल्याचे ग्रामविकास विभागाचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी जाहीर केले. यासाठी औषध खरेदीचे अधिकार जिल्हा परिषदेच्या समितींना देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील नियुक्त समितीने उपरोक्त …

Read More »

कोरोना: दोन महिन्यानंतर मुंबईतील संख्या हजाराच्या आत मात्र उपनगरात वाढच ४८७८ नवे रूग्ण तर २४५ रूग्णांच्या मृत्यूची नोंद

मुंबई: प्रतिनिधी मागील दोन महिन्यापासून मुंबईतील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने १२०० ते २८००च्या दरम्यान वाढीव रहात असे. मात्र आज पहिल्यांदाच मुंबई महानगर पालिका हद्दीत ८९३ इतक्या कमी प्रमाणात रूग्ण आढळून आले आहेत. कालही शहरामध्ये १२४५ च्या जवळपास संख्या होती. परंतु उपनगरातील ठाणे जिल्हा ५५० हून अधिक, नवी मुंबई १९५, कल्याण डोंबिवली ४३५, …

Read More »

एकत्रित वीजबिल भरणाऱ्यांना दोन टक्के सवलत- मदत कक्षाची स्थापना मागणी करणाऱ्या ग्राहकांना वीजबिलांच्या तीन सामान हप्त्यांची सुविधा-ऊर्जामंत्री

मुंबई : प्रतिनिधी तीन महिन्याचे एकत्रित वीजबिल एकरकमी भरणाऱ्या वीज ग्राहकांना त्यांच्या वीजबिलात दोन टक्के सवलत देण्यात येणार आहे. तसेच मागणी करणाऱ्या ग्राहकांना वीजबिलाचे तीन सामान हप्ते करून देण्यात येणार असल्याची माहिती ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी मंगळवारी दिली. वाढीव वीजबिलाच्या तक्रारींच्या अनुषंगाने आयोजित पत्रकार परिषदेत ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी …

Read More »

कौशल्य विभागाच्या त्या संकेतस्थळामुळे हजाराहून अधिकांना मिळाला रोजगार २५ हजार ४७ उमेदवार आणि ११५ उद्योगांचा सहभाग, ऑनलाईन रोजगार मेळावे- मलिक

मुंबई: प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या संकटकाळात राज्यातील बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी कौशल्य विकास विभागाने पुढाकार घेतला असून सध्याचा लॉकडाऊनचा कालावधी बघता प्रत्यक्ष रोजगार मेळावे घेता येणे शक्य नसल्याने विभागामार्फत आता ऑनलाईन रोजगार मेळावे आयोजित करण्यात येत असल्याची माहिती राज्याचे कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली. या मोहिमेंतर्गत राज्यात …

Read More »

चीनी अॅपवर बंदी घातली मात्र नमो अॅपचे काय? काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा सवाल

मुंबई: प्रतिनिधी देशातील १३० कोटी लोकांचे खाजगी माहिती धोक्यात असल्याचे सांगत चीनी ५९ मोबाईल अॅपवर बंदी घालण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. मात्र ज्या नमो Namo अॅपच्या माध्यमातून भारतीयांची खाजगी माहिती परदेशात पाठविली जाते. त्या अॅपवर बंदी कधी घालणार असा सवाल काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला. …

Read More »

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला ५ दिवसांचा आठवडा लागू पण अत्यावश्यक वगळून पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती

मुंबई :प्रतिनिधी केंद्र शासनाने घेतलेल्या निर्णयाच्या धर्तीवर राज्य शासनाने २४ फेब्रुवारी २०२० रोजी घेतलेल्या निर्णयानुसार राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा लागू करून सर्व शनिवार व रविवार हे सुट्टीचे दिवस ठरवण्यात आले आहेत. त्याच धर्तीवर येत्या ४ जुलै २०२० पासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना देखील पाच दिवसांचा आठवडा …

Read More »

भाजपाची अदानी वीज कंपनीसमोर सरकार विरोधात तीव्र निदर्शन आमदार अतुल भातखळकरांच्या नेतृत्वाखाली कार्यालयासमोर आंदोलन

मुंबई: प्रतिनिधी राज्य सरकारने राज्य वीज नियामक कायद्यातील कलम ४ चा वापर करून तातडीने राज्यातील सर्व वीज देयकांना स्थगिती देऊन ३०० युनिट पर्यंतची वीज बिलं माफ करावीत अशी मागणी करत अदानी वीज कंपनीच्या कार्यालयासमोर भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने केली. आज आमदार अतुल भातखळकर …

Read More »

अनलॉक-२ मध्ये प्रवेश, नोव्हेंबरपर्यंत ८० कोटी लोकांना मोफत धान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा

नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन लागू केल्याने काही प्रमाणात आपण या विषाणूला रोखू शकलो. आता आपण अनलॉक-२ मध्ये प्रवेश केला आहे. तसेच ही परिस्थिती आणखी काही काळ अशीच राहणार असल्याने येत्या नोव्हेंबर पर्यत देशातील ८० कोटी गरीब, गरजू, कामगार असलेल्या नागरिकांना महिन्याला प्रति व्यक्ती मोफत ५ किलो …

Read More »

केंद्राकडूनही ३१ जुलैपर्यंत या नव्या सवलतींसह अनलॉक-२ जाहीर जून्या सवलतींसह नव्या सवलतींचा समावेश

नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी राज्य सरकारपाठोपाठ केंद्रानेही ३१ जुलै पर्यंत अनलॉक-२ जाहीर केला आहे. या काळात खालीलप्रमाणे सवलती देण्यात आलेल्या आहेत. कंटेनमेंटच्या बाहेर- १) शाळा, कॉलेज, कोचिंग, शैक्षणिक संस्था ३१ जुलै पर्यंत बंद राहणार. पण ऑनलाईन-डिस्टन्स पध्दतीने शिक्षणाची प्रक्रिया सुरु राहणार. पण १५ जुलै २०२० पासून प्रशिक्षण संस्था सुरू करण्यास राज्य …

Read More »