Breaking News

राज्यातील १५६६ ग्रामपंचायतींवर प्रशासक तर १२ हजार ६६८ च्या निवडणूका स्थगित ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील एप्रिल, मे आणि जूनमध्ये मुदत संपलेल्या १ हजार ५६६ इतक्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. यासंदर्भात ग्रामपंचायत कायद्यामध्ये आवश्यक दुरुस्ती करण्यासाठी अध्यादेश काढण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली असून राज्यपालांकडे तशी शिफारस करण्यात येत असल्याचे सांगत …

Read More »

आशा गटप्रवर्तक आणि अर्धवेळ स्त्री परिचरांना मिळणार प्रत्येकी १ हजार रुपये ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीम यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावांमध्ये काम करणाऱ्या आरोग्य विभागाच्या आशा गटप्रवर्तक तसेच अर्धवेळ स्त्री परिचर यांना त्यांच्या कामाची दखल घेऊन प्रत्येकी १ हजार रुपये इतकी प्रोत्साहनपर रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. राज्यातील गावांमध्ये सर्व यंत्रणा जीवाची पर्वा न करता दिवसरात्र …

Read More »

सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी मे पाठोपाठ जून महिन्यातही कर्ज ? आर्थिक जमवाजमव करण्यासाठी वित्त विभागाची दमछाक

मुंबई: विशेष प्रतिनिधी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर कोविड विरोधी लढ्याला आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी पैसा कमी पडू नये यासाठी राज्य सरकारने सर्व योजनांसाठीचा निधी, अर्थसंकल्पीय तरतूदीनुसार राखीव ठेवण्यात आलेला निधी आतापर्यत वापरला. मात्र लॉकडाऊनमुळे राज्याची गंगाजळी आटल्याने कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी मे महिन्यात कर्ज काढण्यात आले. आता पुन्हा एकदा जून महिन्याच्या पगारीसाठी कर्ज …

Read More »

केंद्राच्या प्रस्तावित वीज (सुधारणा) विधेयक २०२० मुळे संघराज्य रचनेला सुरुंग ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांची टीका

मुंबई : प्रतिनिधी केंद्र सरकारने प्रस्तावित वीज (सुधारणा) विधेयक बिल २०२० मुळे घटनेचे स्पष्ट उल्लंघन करून संघराज्य रचनेला सुरुंग लावण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सत्तेचे विकेंद्रीकरण करून वीज क्षेत्रात कार्यक्षमता वाढवणे व  पारदर्शकता निर्माण करणे आवश्यक असल्याचे मत राज्याचे ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी व्यक्त केले. प्रस्तावित वीज (सुधारणा) विधेयक बिल …

Read More »

मुंबईसह राज्याचे रक्षण करणाऱ्यांचे आभार मानत, मुख्यमंत्र्यांनी दिले पंचनाम्याचे आदेश दोघांचा अपघातात मृत्यू झाल्याची मुख्यमंत्री ठाकरेनी दिली माहिती

मुंबई: प्रतिनिधी ‘निसर्ग ‘ चक्री वादळाच्या तडाख्यातून मुंबईसह महाराष्ट्राचे रक्षण करणाऱ्या सगळ्यांचेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आभार मानले आहेत. मुख्यमंत्री आपल्या निवेदनात म्हणतात, “महाराष्ट्रावर करोनाचे संकट घोंघावत असतानाच चक्री वादळाचा तडाखा बसला.संकट म्हटले तर मोठे होते. पण हे संकट आपण सगळ्यांनी परतवून लावले आहे. जनता व प्रशासनाने झूंज दिली व …

Read More »

रत्नागिरीत चक्रीवादळामुळे चार जण जखमी जीवीतहानी नाही वित्तहानी नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आल्याची पालकमंत्री उदय सामंत यांची माहिती

रत्नागिरी: प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळामुळे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध ठिकाणी झाडे पडण्याचे तसेच विजेच्या तारा तुटण्याचे प्रकार घडले. यात ४ जण जखमी झाले मात्र जीवितहानी नाही. तसेच नुकसानीचे पंचनामे सुरू झाले असून नुकसानीबाबत २ दिवसात भरपाई रक्कम शासकीय नियमांप्रमाणे दिली जाईल, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत …

Read More »

१२२ मृत्यूसह एकूण संख्या ७५ हजाराच्या तर अॅक्टीव्ह रूग्णांची ४० हजाराच्या काटावर नव्याने २५६० रूग्णांचे निदान ९९६ जणांना घरी सोडले

मुंबई: प्रतिनिधी कोरोनाग्रस्तांच्या बरे होण्याच्या टक्केवारीत जरी वाढ झालेली असली तरी दररोजच्या रूग्णसंख्येत किमान २ हजार रूग्णांच्या नोंदीत कमी आलेली नाही. त्यातच आज १२२ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली असून राज्यात आज २५६० कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाल्याने एकूण संख्या आता ७४ हजार ८६० पर्यंत पोहोचली आहे. आज नवीन ९९६ …

Read More »

निसर्ग चक्रीवादळाचा महावितरणला मोठा फटका वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम युध्दस्तरावर सुरू असल्याची ऊर्जामंत्री राऊत यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी जोरदार वादळी वा-यासह आलेल्या निसर्ग चक्री वादळाचा महावितरणला मोठा फटका बसला आहे. चक्रीवादळाच्या रौद्ररूपामुळे अनेक ठिकाणी वीज वाहिन्या व विजेचे खांब कोसळ्ले असून वीजपुरवठा रवंडित झाला आहे. चक्रीवादळाची तीव्रता कमी होताच महावितरणने वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम युध्दस्तरावर सुरू केले आहे. निसर्ग चक्रीवादळाचे रौद्ररूप बघता महावितरणचे किती नुकसान …

Read More »

हिंदुस्थान युनिलिव्हरने दिली १० कोटीहुन अधिक किंमतीच्या वैद्यकीय संसाधनांची मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मानले आभार

मुंबई: प्रतिनिधी हिंदुस्थान युनी लिव्हर लि. कंपनीने गेल्या सप्ताहात राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व आरोग्य विभागाला मिळून १० कोटी रुपयांहुन अधिक किंमतीच्या वैद्यकीय संसाधनांची मदत केली. यामध्ये ५.०४ कोटी रुपयांच्या २८ हजार ८०० टेस्टिंग किटसचा समावेश आहे तर आणखी ५ कोटी रुपये किंमतीची विविध वैद्यकीय संसाधनेही त्यांनी उपलब्ध करून दिली. यामध्ये …

Read More »

मुख्यमंत्री ठाकरेंचा निर्णय राज्यपाल कोश्यारींनी केला रद्दबातल विद्यापीठ कायद्यानुसार अंतिम वर्षाच्या परिक्षा घेण्याचे आदेश

मुंबई: विशेष प्रतिनिधी दोनच दिवसांपूर्वी राज्यातील विद्यापीठस्तरावरील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परिक्षा रद्दबातल करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जाहीर केला. मात्र या निर्णयावरून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत विद्यार्थ्यांच्या भविष्याच्यादृष्टीने मुख्यमंत्र्यांचा हा निर्णय रद्दबातल करत विद्यापीठ कायद्यानुसार विद्यार्थ्यांच्या परिक्षा घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे परिक्षेच्या कारणावरून …

Read More »