मुंबई: प्रतिनिधी सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील तसेच कोकणातील महापुरामुळे खंडीत झालेला वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणने प्रभावी व नियोजनबद्ध अंमलबजावणी केली असल्याने या भागातील म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील २४ व सांगली जिल्ह्यातील १० अशी ३४ उपकेंद्रे १३ ऑगस्ट पर्यंत सुरु करण्यात आली आहेत. तसेच पूरग्रस्त भागातील २ लाख ७३ हजार ८१७ वीजग्राहकांचा …
Read More »वंचित बहुजन आघाडीने घेतले महापुरातील दुर्घटनाग्रस्त ‘ब्रह्मनाळ’ गाव ७०० कुटुंबाचे पुर्नवसन करणार अँड.प्रकाश आंबेडकर यांची घोषणा
मुंबई : प्रतिनिधी सांगलीत आलेल्या महापुरातून स्वतःचा जीव वाचविण्यासाठी पलुस तालुक्यातील ब्रम्हनाळ गावातील नागरीक बोटीने जात असताना झालेल्या दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू झाला. या ब्रम्हनाळ गावातील ७०० नागरीकांचे पुर्नवसन करण्याच्या उद्देशाने वंचित बहुजन आघाडीने हे गाव दत्तक घेण्याचा निर्णय घेतला असल्याची घोषणा वंचित आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केली. मागील …
Read More »“कृषी संवाद” च्या माध्यमातून शेतकऱ्यांना मंत्र्याकडे मांडता येणार प्रश्न उपक्रमाचा कृषीमंत्री डॉ.अनिल बोंडे यांच्या हस्ते शुमारंभ
मुंबई : प्रतिनिधी एकाच वेळी राज्यातील १० हजार शेतकऱ्यांशी संवाद साधता येणाऱ्या “कृषी संवाद” या उपक्रमाचा शुभारंभ आज कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केला. यावेळी अमरावतीसह सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील कृषी सहाय्यकांशी कृषीमंत्र्यांनी संवाद साधला.या उपक्रमाच्या माध्यमातून कृषी मंत्री शेतकऱ्यांसोबतच कृषीमित्र, कृषी सहाय्यक यांच्याशी विविध बाबींवर संवाद साधणार आहेत. …
Read More »शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफीसह हेक्टरी ६० हजार मदत द्या मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेसची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
मुंबई: प्रतिनिधी राज्याच्या अनेक भागात पुरामुळे प्रचंड जीवित व वित्तहानी झाली आहे. शेतकरी, व्यापारी अन् नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने पूरग्रस्तांना भरीव आर्थिक मदतीसह शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी आणि हेक्टरी ६० हजार रूपयांची मदत करावी अशी मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत राज्य सरकारकडे केली. …
Read More »पूरग्रस्तांच्या मदत व पुर्नवसनासाठी केंद्राकडे ६ हजार ८१३ कोटींचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
मुंबईः प्रतिनिधी राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी व पुर्नवसनासाठी केंद्र सरकारकडे ६ हजार ८१३ कोटींची मदत मागण्यात आली असून केंद्राची मदत येईपर्यंत ही रक्कम तातडीने खर्च करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. पूरग्रस्त भागातील पडझड झालेली तसेच पूर्ण नष्ट झालेली घरे सरकार बांधून देणार आहे. तर २०८८ कोटींची नुकसान भरपाई पिकांसाठी देण्यात येणार …
Read More »महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण? येदीयुरप्पा की फडणवीस? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांचा सवाल
मुंबईः प्रतिनिधी पूरग्रस्त महाराष्ट्राला मदत देण्याबाबत केंद्र सरकार तर्फे पूर्णपणे अनास्था दिसून येत असून अद्यापपर्यंत केंद्र सरकारने महाराष्ट्राला कोणतीही मदत दिली नाही. विरोधी पक्षांच्या रेट्यामुळे नाईलाजाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कर्नाटकचा हवाई दौरा करत असताना कोल्हापूर, सांगलीच्या पूराचे हवाई पर्यटन केले. परंतु इतिहासात पहिल्यांदाच असे घडले की, महाराष्ट्रातल्या पूरस्थितींची …
Read More »पूरग्रस्तांसाठी देहव्यापारातील भगिनीही देणार दोन दिवसाची कमाई सांगली-कोल्हापूर-सातारा भागात मदत वाटप, श्रम कार्यास नगर मधून चमू रवाना
अहमदनगरः प्रतिनिधी राज्यातील कोल्हापूर, सातारा, सांगली बरोबरच कर्नाटकातील बेळगावात अतिवृष्टीमुळे आलेल्या महापूरातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देहव्यापारातील भगिनींनीही पुढाकार घेतला आहे. या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी या भगिनीकडून दोन दिवसांची कमाई मुख्यमंत्री सहायता निधीसाठी अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात येणार असल्याची माहिती स्नेहालय परिवाराने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकातून देण्यात आली आहे. तसेच पूरग्रस्तभागातील मदत कार्य चमूत …
Read More »१.५० लाख राजपत्रित अधिकाऱ्यांकडून पूरग्रस्तांसाठी एकदिवसाचा पगार थेट पगारातून मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्याचे शासनास विनंती
मुंबईः प्रतिनिधी पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात आलेल्या महापूरामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे या पूरग्रस्तांना जनतेचे सेवक या नात्याने राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या विविध विभागातील कार्यरत राजपत्रित अधिकाऱ्यांनी आपला एक दिवसाचा पगार मदत म्हणून देण्याचा निर्णय घेतला असून यासंदर्भात महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने तसे पत्र राज्य शासनास दिले आहे. …
Read More »राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टच्यावतीने पुरग्रस्तांसाठी ५० लाखाची मदत मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे धनादेश आणि मागण्यांचे निवेदन सुपुर्द
मुंबईः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस वेलफेअर ट्रस्टच्यावतीने आज मुख्यमंत्र्यांकडे पूरग्रस्त मदत निधीचा सुमारे ५० लाखाचा धनादेश देण्यात आला शिवाय पुरग्रस्तांचे तात्काळ पुनर्वसन करण्यात यावे याबाबतच्या २५ विविध मागण्यांचे निवेदनही देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, पक्षाचे कोषाध्यक्ष आमदार …
Read More »महापूरप्रकरणी कृष्णा खोरे महामंडळावर खटला दाखल करणार प्रशासनाच्या गलथान कारभाराची उच्च स्तरीय चौकशी करण्याची काँग्रेस सरचिटणीस दाते-पाटील यांची मागणी
औरंगाबादः जगदीश कस्तुरे कोल्हापूर, सांगली आणि कराड परिसरात आलेला महापूर हा कृष्णा खोरे विकास महामंडळाने आपत्ती व्यवस्थापनाचे नियम पाळले नाहीत. त्यामुळे या भागात महापूर आल्याने या गलथान कारभाराच्या विरोधात कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या विरोधात औरंगाबाद खंडपीठात दाद मागणार असल्याची घोषणा औरंगाबाद जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस राजेंद्र दाते -पाटील यांनी केली. राज्यातील …
Read More »
Marathi e-Batmya