वंचित बहुजन आघाडीने घेतले महापुरातील दुर्घटनाग्रस्त ‘ब्रह्मनाळ’ गाव ७०० कुटुंबाचे पुर्नवसन करणार अँड.प्रकाश आंबेडकर यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी
सांगलीत आलेल्या महापुरातून स्वतःचा जीव वाचविण्यासाठी पलुस तालुक्यातील ब्रम्हनाळ गावातील नागरीक बोटीने जात असताना झालेल्या दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू झाला. या ब्रम्हनाळ गावातील ७०० नागरीकांचे पुर्नवसन करण्याच्या उद्देशाने वंचित बहुजन आघाडीने हे गाव दत्तक घेण्याचा निर्णय घेतला असल्याची घोषणा वंचित आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केली.
मागील आठवड्यात सांगलीत महापूर पाणी घुसले असताना प्रशासन व स्थानिक गावकऱ्यांकडून बचावकार्य सुरु होते. यात बह्मनाळ गावातील नदीपात्रात बोट उलटुन 14 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला होता. त्यामुळे बह्मनाळ या गावावर सध्या शोककळा पसरलेली आहे. या गावची ३५०० लोकसंख्या असून गावातील ७०० कुंटुंबांचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी वंचित आघाडीने घेतल्याचे त्यांनी सांगितले.
वंचित आघाडीने ब्रम्हनाळ गाव दत्तक घेतल्याचे कळताच गावचे सरपंच व गावक-यांनी समाधानी व्यक्त केले आहे. ग्रामपंचायतीने पत्र देऊन आम्ही पुनर्वसनासाठी आमचे गाव देत असल्याचे जाहीर केले.
ब्रह्मनाळ गावात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ७०० कुंटुंबाना पुढील एक महिना पुरेल एवढी राशन धान्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच गावामध्ये स्वच्छता आणि औषध फवारणी, आरोग्य तपासणी व औषध उपचार करण्यात येतील.
गावातील विदयार्थ्यांना गणवेश व शालेय साहित्य उपलब्ध करून दिले जाईल. गावात स्वच्छ पाण्याची कायमस्वरुपी सोय व्हावी म्हणून वॉटर एटीएम लावली जाणार आहे. गावकऱ्याचे मनोधैर्य उंचावण्यासाठी मानस उपचार व वर्षभर सांस्कृतीक कार्यक्रम राबविण्याबरोबरच गावकऱ्यांना शासकीय मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला जाणार असल्याचे वंचित आघाडीकडून जाहीर करण्यात आले.

About Editor

Check Also

लेफ्टनंट जनरल एन.एस राजा सुब्रमणी नवे सीडीएस म्हणून नियुक्त एन.एस राजा सुब्रमणी हे निवृत्त असून माजी लष्करी अधिकारी अअनिल चौहान यांच्या ठिकाणी नियुक्त

लेफ्टनंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी (निवृत्त) यांची पुढील संरक्षण प्रमुख (CDS) म्हणून नियुक्ती करण्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *