मुंबई : प्रतिनिधी राज्यातील दुष्काळाचा सामना करण्यासाठी सुक्ष्म जलसंधारण प्रकल्पाची कामे सुरु करत त्यासाठी स्वतंत्र संकल्पनेच्या माध्यमातून जलसंधारण विभागाचे प्रणेते ठरलेल्या आणि राज्याचे माजी मुख्य सचिव राहीलेले अरुण बोंगीरवार यांचे आज शुक्रवारी पहाटे दीर्घ आजाराने वयाच्या ७६ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा पियुष, कन्या दीप्ती आणि गार्गी असा परिवार आहे. मुख्यमंत्र्यांचे …
Read More »नोटिशीवरून मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागणे राष्ट्रवादीची बौद्धिक दिवाळखोरी भाजपा प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा टोला
मुंबई : प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा प्रयत्न केला असता ती दाखल करून घ्यावी की नाही याविषयी बाजू मांडण्यासाठी मुख्यमंत्र्यांना कायदेशीर प्रक्रियेप्रमाणे नोटीस बजावली. या घटनेचे भांडवल करून राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागणे ही त्या पक्षाची बौद्धिक दिवाळखोरी असल्याचा टोला भाजपाचे प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी गुरुवारी लगावला. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे प्रतिज्ञापत्र सादर केले होते. त्यात त्यांच्यावर दाखल असलेल्या सर्व प्रकरणांची माहिती स्पष्टपणे देण्यात आली होती. या संदर्भात यापूर्वी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ती याचिका उच्च न्यायालयाने तथ्यहीन मानून फेटाळली होती. संबंधित …
Read More »मुख्यमंत्र्यांना आलेली ती नोटीस फक्त विचारणा करणारी मुख्यमंत्री कार्यालयाचा खुलासा
मुंबई : प्रतिनिधी निवडणूकीच्या कालावधीत दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये स्वत:बद्दलची सर्व माहिती दिलेली आहे. तरीही अँड.सतीश उके यांनी यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली. मात्र सर्वोच्च न्यायालयाने सदरची याचिका न्यायालयात दाखल करून घ्यायची की नाही याबाबत विचारणा करणारी नोटीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविली असल्याचा खुलासा मुख्यमंत्री कार्यालयाने …
Read More »स्वत:वरील गुन्हे लपविल्याने मुख्यमंत्री फडणवीसांनी राजीनामा द्यावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची मागणी
मुंबई : प्रतिनिधी निवडणूक प्रतिज्ञापत्रात फौजदारी गुन्हे लपवल्याप्रकरणी मुख्यमंत्री पदावर राहण्याचा नैतिक अधिकार देवेंद्र फडणवीस यांनी गमावला आहे. सुप्रीम कोर्टात त्यांची निवडणूक रद्द होईल तेव्हा होईल. परंतु त्यांनी मुख्यमंत्री पदाचा तात्काळ राजीनामा दयावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली. सुप्रीम कोर्टाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना …
Read More »भाजपा नेत्यांनाच पडला विसर स्व. गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीचा आम्ही फक्त ट्विटरवर अभिवादन वाहणार
मुंबई : प्रतिनिधी भाजपला मराठावाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राच्या गावागावात पोहोचविण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या माजी केंद्रीय मंत्री स्व.गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती. परंतु या नेत्याच्या माध्यमातून पक्षाच्या पदावर तर कधी सरकार दरबारी कामे करून घेण्यासाठी फिरणाऱ्या आताच्या भाजप वरिष्ठ नेत्यांना मुंडे यांच्या जयंती दिनीच त्यांचा विसर पडला आहे. केवळ प्रदेश कार्यालयातील …
Read More »मराठा आरक्षणाबाबत अँड. हरीष साळवे न्यायालयात बाजू मांडणार मुख्यमंत्री फडणवीस, महसूल मंत्री पाटील आणि साळवे यांच्यात तासभर चर्चा
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाखाली आरक्षण देण्याविषयीचा कायदा मंजूर करण्यात आल्यानंतर या आऱक्षणाच्या विरोधात काही जणांनी धाव घेतली. त्यामुळे याप्रकरणी राज्य सरकारची बाजू मांडण्यासाठी प्रसिध्द वकील अँड. हरिष साळवे यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. मराठा आरक्षणाचा कायदा न्यायालयातही टिकावा यासाठी यापूर्वीच राज्य सरकारकडून मुंबई …
Read More »महाराष्ट्र गृहनिर्माण महामंडळाच्या माध्यमातून ५ लाख घरांची निर्मिती महामंडळाच्या सहअध्यक्ष पदी सोलापूरचे राजेंद्र मिरगणे यांची निवड
मुंबई : प्रतिनिधी केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेखाली राज्यातील सर्वसामान्य नागरीकांसाठी परवडणारी घरे निर्माण करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या महाराष्ट्र गृहनिर्माण महामंडळाच्या माध्यमातून या योजनेखाली २०२२ पर्यंत राज्यात ५ लाख घरे बांधण्याचे उद्दिष्ट महामंडळासाठी निश्चित करून दिले असून त्यासाठी लागणारी आवश्यक ती यंत्रणा आणि संसाधने निर्माण करण्याची …
Read More »महार बटालियन आणि शौर्याचा इतिहास सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांचा खास लेख
आताच्या नवबौध्द आणि पूर्वाश्रमीच्या महार जातीच्या पराक्रमी इतिहासाची मोठी परंपरा आहे. लढवय्या महारांना आपल्या पुर्वजांकडून मिळालेल्या अंगभूत नैसर्गिक साहसी गुणामुळे त्यांनी आपला इतिहास घडवता आला. डॉ. बाबसाहेब आंबेडकरांनी सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, धार्मिक अशा सर्वच आघाड्यांवर प्रस्तापितांच्या अन्यायाविरोधी दिलेली कडवी झुंज याची साक्ष आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या …
Read More »शरद पवार म्हणतात भाजपला पर्याय काँग्रेसच निवडणूका होतील त्यावेळी देशातील चित्र बदलणार असल्याचे भाकित
मुंबई : प्रतिनिधी काल चार राज्यांचा लागलेला निकाल पाहता लोकांनी स्पष्ट नाराजी व्यक्त केली आहे. कालचे जे निकाल आले आहेत. त्याबद्दल भाजप सोडून इतर पक्षांमध्ये समाधान आहे. भाजपला पर्याय देण्यासाठी काँग्रेस हा पर्याय महत्वाचा पक्ष असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगितले. हा चार राज्याचा प्रश्न नाही तर …
Read More »कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ५०० रुपये अनुदान द्या शिवसेनेची मागणी
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील उन्हाळी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने ५०० रुपये अनुदान द्यावे अशी मागणी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मंत्रिमंडळ बैठकीत केली आहे. मध्य प्रदेश सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रति क्विंटल ८०० रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. याच धर्तीवर राज्यातही भावांतर योजना लागू करावी अशी मागणी …
Read More »
Marathi e-Batmya