Breaking News

शेतमालाला चांगला भाव देण्यासाठी कॉर्पोरेट कंपन्यांशी सामंज्यस करार महिंद्रा, रिलायन्स फ्रेशसह २०० कंपन्याशी करार केल्याची मंत्री देशमुखांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळावा यासाठी सहकार आणि पणन विभागामार्फत वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यासाठी आता कॉर्पोरेट क्षेत्रातील पलासा ॲग्रो, फ्युचर ग्रुप, रॉयल ॲग्रो, महिंद्रा, रिलायन्स फाउंडेशन आणि रिलायन्स फ्रेश आदी कार्पोरेट कंपन्यांनी पुढाकार घेतला असून अटल महापणन विकास अभियानांतर्गत २०० पेक्षा जास्त कॉर्पोरेट संस्था आणि खरेदी विक्री संघ, वि.का.स. सोसायट्या …

Read More »

प्रियांकाचा मराठी ‘फायरब्रँड’ तिसऱ्या मराठी चित्रपटाच्या चित्रिकरणास सुरूवात

मुंबई : प्रतिनिधी बॉलिवुडपासून हॉलिवुडपर्यंत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी ग्लॅमरस अभिनेत्री प्रियांका चोप्रा आज खऱ्या अर्थाने जागतिक पातळीवरील ‘फायरब्रँड’ बनली आहे. असं असलं तरी तिने भारतीय चित्रपटसृष्टीकडे मात्र पाठ फिरवलेली नाही. जागतिक पातळीवरील चित्रपटांमध्ये अभिनय करतानाच प्रादेशिक चित्रपटांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने प्रियांकाने आई डॉ. मधू चोप्रा यांच्या सहकार्याने मराठी, पंजाबी, …

Read More »

गान कोकिळेला सांगितिक मानवंदना १४ जानेवारीला होणार कार्यक्रम

मुंबई : प्रतिनिधी भारतरत्न या सर्वोच्च सन्मानाने गौरविण्यात आलेल्या व्यक्ती खऱ्या अर्थाने भारतातील अनमोल रत्नच आहेत. त्यांनी आपापल्या क्षेत्रात केलेल्या कार्याचं मोजमाप कोणत्याही परिमाणात करणं शक्य नाही. गानकोकिळा म्हणून जगभर प्रसिद्ध असलेल्या ज्येष्ठ पार्श्वगायिका भारतरत्न लता मंगेशकर यांनीही भारतीय संगीत क्षेत्रात अतुलनीय योगदान दिलं आहे. आज त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत …

Read More »

अग्निसुरक्षेसाठी काळबादेवीतील सुवर्ण कारागिरांचे व्यवसाय स्थलांतरीत करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

मुंबई : प्रतिनिधी शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या काळबादेवी परिसरात मोठ्या प्रमाणावर जून्या व मोडकळीस आलेल्या इमारती आहेत. त्यामुळे या परिसरातील सुवर्णकार कारागिरांचे उद्योग स्थलांतरीत करण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करत यासंदर्भात मुंबई महापालिकेने बैठक घेऊन कारवाई करावी असे निर्देशही त्यांनी दिले. मंत्रालयात झालेल्या ऑनलाईन लोकशाही दिनात काळबादेवी भागात राहणारे हरकिशन …

Read More »

मुंबईकरांची हालत धोबी का कुत्ता न घर का ना घाट का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विकासकांवर आरोप

मुंबई: प्रतिनिधी मुंबई शहरात परवडणाऱ्या घरांची कमतरता असून जून्या व मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुर्नविकास होणे आवश्यक आहे. मात्र मुंबईतील विकासाला परवानग्या देण्याचा बिकट प्रश्न असल्याने विकासकांनी मुंबईकरांची हालत म्हणजे धोबी का कुत्ता न घर का ना घाट का अशी अवस्था करून ठेवल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. मुंबै बँकेच्यावतीने …

Read More »

परवडणाऱ्या घरांसाठी पीएमएवायखाली राज्य सरकारची स्व-पुनर्विकास योजना ग्रीन आणि नो डेव्हलपमेंट झोनमध्ये घरे निर्माण होण्याचा मार्ग मोकळा

मुंबई: प्रतिनिधी मुंबईसह राज्यात परवडणारी घरे निर्माण व्हावीत याकरिता राज्य सरकारने नवे गृहनिर्माण धोरण आणण्याचे निश्चित केले आहे. या धोरणानुसार पहिल्यांदाच शासकिय जमिनीबरोबरच खाजगी जमिनीवर परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीसाठी राज्य सरकारकडून पंतप्रधान आवास योजना अर्थात पीएमएवायखाली प्रोत्साहन देण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यात ५ ते १० लाख परवडणारी घरे निर्माण होणार असल्याची …

Read More »

बोंड अळी, ओखी वादळ नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्राकडे मागणी राज्य सरकारने मागितले केंद्राकडे २ हजार ४२५ कोटी रूपये

मुंबई: प्रतिनिधी राज्यात कापूसावरील बोंड अळी आणि ओखी वादळामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षांकडून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी केली. त्यानुसार राज्य सरकारने या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे जाहीर केली. मात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी राज्य सरकारच्या तिजोरीत पैसे नसल्याने केंद्राकडे मदत मागण्यात आल्याची …

Read More »

भिमा कोरेगाव प्रकरणाची जबाबदारी स्विकारून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची मागणी

मुंबईः प्रतिनिधी भिमा कोरेगाव प्रकरणात जे काही घडले ते सरकारचे अपयश आहे. याप्रकरणाचे संपूर्ण राज्यात पडसाद उमटत असतानाही हे प्रकरण संवेदनशीलपणे हाताळण्यात अपयश आल्याने या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्विकारून तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे. दादर येथील …

Read More »

राष्ट्रमाता जिजाऊंच्या जयंती कार्यक्रमाला परवानगी नाकारली मुख्यमंत्री केजरीवाल येणार असल्याने परवानगी नाकारल्याची ब्रिगेडीयर सावंत यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंती दिनानिमित्त बुलढाणा येथील सिंदखेड राजा येथे १२ जानेवारी २०१८ रोजी एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मात्र या कार्यक्रमास दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे उपस्थित राहणार असल्याने बुलढाणा पोलिसांनी या कार्यक्रमालाच परवानगी नाकारल्याची माहिती या कार्यक्रमाचे आयोजक आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्ये ब्रिगेडियर सुधीर सावंत …

Read More »

महाराष्ट्रातील गुंतवणूकीसाठी आता मॅग्नेटीक महाराष्ट्र फेब्रुवारीत होणाऱ्या कार्यक्रमाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार उद्घाटन

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील गुंतवणूक वाढविण्यासाठी राज्य सरकारने मेक इन महाराष्ट्रनंतर पुन्हा एकदा मॅग्नेटीक महाराष्ट्र या कार्यक्रमाचे आयोजन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हा कार्यक्रम १८ ते २० फेब्रुवारी २०१८ या कालावधीत होणार असून या कार्यक्रमाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. यासंदर्भात नरीमन पॉंईट येथील हॉटेल ट्रायडंट …

Read More »