नागपूर : प्रतिनिधी राज्यातील ज्येष्ठ नागरीकांसाठी प्रवासात राखीव जागा ठेवणे, त्यांना वैद्यकीय उपचार सुविधा पुरविणे आदी गोष्टी राबविण्याबाबत राज्य सरकारने धोरण या आधीच ठरविण्यात आले आहे. त्यानुसार त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. तसेच ज्येष्ठ नागरीकांची वयोमर्यादा निश्चित करण्यासाठी महिनाभरात कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी दिली. …
Read More »शेतीमाल किंमती आणि बोंडअळी नुकसानीचा प्रस्ताव केंद्राकडे नाहीच राज्य सरकारकडून उत्तर न आल्याने विरोधकांचा सभात्याग
नागपूर : प्रतिनिधी राज्यातील शेतकऱ्यांच्या शेती मालाला हमी भाव मिळावा यासाठी सातत्याने गळा काढणाऱ्या भाजप सरकारने शेतीचा दर ठरविण्यासाठी कृषी आयोगाची स्थापना केली. मात्र या कृषी आयोगाने राज्यातील शेती मालाचा हमीभाव ठरविण्याचा प्रस्ताव आणि बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठविला नसल्याचा खुलासा केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंग …
Read More »गुजरातला पाणी देण्यावरून विधानसभेत गोंधळ पाणी अडविण्यासाठी केंद्राकडे १० हजार कोटी मागितल्याची मंत्र्यांची माहिती
नागपूर : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या हिश्शाचे पाणी रोखण्याऐवजी ते गुजरातला देण्यात येत असल्याच्या मुद्यावरून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी एकच गोंधळ घालत पाणी चोर, पाणी चोर भाजप पाणी चोरच्या घोषणा देत विधानसभेचे सभागृह दणाणून सोडत सरकारला चांगलेच धारेवर धरले. या गोंधळातच जलसंधारण मंत्री गिरिष महाजन यांनी दमणगंगा-पिंजाळ व पार-तापी-नर्मदा नदी जोड प्रकल्पासाठी …
Read More »मी महाराष्ट्राची मराठी मुलगी अभिनेत्री अमिषा पटेलचा असाही मराठी बाणा
मुंबई : प्रतिनिधी बॉलिवुडमधील सर्वांनाच सध्या मराठीचे वेध लागले आहेत. प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या प्रकारे मराठी चित्रपटसृष्टीच्या जवळ येण्याचा प्रयत्न करीत आहे. मराठी चित्रपटात योग्य भूमिका साकारण्याची संधी न मिळालेले काही कलाकार मराठी चित्रपटांच्या कार्यक्रमांना हजेरी लावत आपलं मराठी प्रेम दाखवत आहेत. ‘कोई मिल गया’ गर्ल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या …
Read More »कोणी कितीही सांगितले तरी माझ्या कामाचे श्रेय मलाच मिळते महिला व बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांचे प्रतिपादन
नागपूर : प्रतिनिधी राज्यात मंत्री म्हणून विराजमान झाल्यानंतर ग्रामीण भागातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी जलयुक्त शिवार ही योजना तयार केली. ही योजना देशातील इतर राज्यांनाही चांगलीच आवडली असून राजस्थान, मध्य प्रदेश सारख्या राज्यांनी त्याची अंमलबाजवणीही सुरु केली आहे. त्यामुळे जी योजना मी सुरु केलेली आहे. त्याचे श्रेय मलाच मिळणार असून ती …
Read More »ओखी वादळग्रस्तांना पंचनाम्यानंतर मदत देणार मदत जाहीर करण्यास सरकारची चालढकल
नागपूर : प्रतिनिधी अरबी समुद्रात आलेल्या ओखी चक्रीवादळामुळे कोकणातील आंबा, काजू आणि मच्छिमार उत्पादकांचे नुकसान झाले. या वादळग्रस्तांना राष्ट्रीय आप्तकालीन परिस्थिती अर्थात एनडीआरएफमध्ये येत नसल्याने या विभागातून नुकसान भरपाई देता येणार नाही. मात्र पंचनामे करून एसडीआरएफ अर्थात राज्य आपतकालीन परिस्थितीतून नुकसान भरपाई देणार असल्याचे सांगत नेमकी किती नुकसान भरपाई देणार …
Read More »बालमृत्यू रोखण्यासाठी प्रयत्न करणार आरोग्यमंत्री डॉ.दिपक सावंत यांचे आश्वासन
नागपुर : प्रतिनिधी नाशिक व गोरखपुर या दोन्ही धटना परस्पर विरोधी आहेत. गोरखपुरची घटना ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे झाली. तर नाशिक मधील घटना काही त्या शहरातली नाही. ठाणे, पालघर, धुळे या आदीवासी पट्ट्य़ातील कुपोषित बालके उपचारार्थ नाशिकमध्ये येतात. यामध्ये जन्मता मृत्यू किंवा जन्मा अगोदर मृत्यू दरामध्येही फरक आहे. वातावरणातील फरक याला कारणीभूत …
Read More »वांद्रे येथील शासकिय घरे मालकी हक्काने देण्याबाबत सरकारकडून चालढकल मुख्यमंत्र्याशी चर्चा केल्यानंतरच निर्णय घेण्याचे सा.बां.मंत्री पाटील यांचे उत्तर
नागपुर : प्रतिनिधी मुंबईतील वांद्रे येथील शासकिय वसाहतीतील घरे सरकारी कर्मचाऱ्यांना मालकी हक्काने देण्याबाबत मी व्यक्तीश: सकारात्मक आहे. मात्र हा निर्णय मोठा असल्याने याबाबत मुख्यमंत्र्यांच्या सोबत चर्चा केल्यानंतरच याविषयी अधिक बोलणे योग्य होणार असल्याचे गोलमाल उत्तर सार्वजनिक बांधकांम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत दिले. विधान परिषदेत शासकीय कर्मचाऱ्यांच्या मोडकळीस …
Read More »राज्यातील शैक्षणिक क्षेत्र खाजगी कंपन्यांना खुले स्वयंअर्थसहाय्यित शाळा सुधारीत विधेयक विधानसभेत मंजूर
नागपूर: प्रतिनिधी केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणानुसार कार्पोरेट क्षेत्रातील किंवा खाजगी कंपन्यांना त्यांचा सामाजिक उत्तरदायित्व निधी (सोशल रिस्पॉन्सबिलीटी फंड) खर्च करण्यासाठी शाळा स्थापन करण्याची मुभा राज्य सरकारने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच या खाजगी कंपन्यांना शैक्षणिक संस्था सुरु करणे सोयीचे व्हावे यासाठी स्वयंअर्थसहाय्यित शाळा (स्थापना व विनियमन) या कायद्यात …
Read More »ब्रेकनंतर सोशल मीडियावर राणी हिचकीद्वारे पुनरागमन करणार
मुंबई: प्रतिनिधी फेसबुक, व्हॉट्सअप तसंच ट्विटर यांसारख्या सोशल मीडियाने आज सर्वानाच झपाटलं आहे. सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटीजपर्यंत सर्वजण आज या मोहजालात अडकले आहेत, पण काही कलाकारांनी मात्र अद्याप या विश्वात डोकावण्याचं धाडस केलेलं नाही. बाळंतपणासाठी ब्रेक घेतलेल्या राणी मुखर्जीनेही आजवर या विश्वापासून दूरच राहणं पसंत केलं होतं. आदिराच्या जन्मानंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या …
Read More »
Marathi e-Batmya