अँटिलिया स्फोटक प्रकरण : प्रदीप शर्मा यांचा यांचा अर्ज फेटाळला विशेष एनआयए न्यायालयाचा निर्णय

अँटिलिया स्फोटकांचे प्रकरण आणि व्यापारी मनसुख हिरण यांच्या हत्येशी संबंधित प्रकरणी चकमक फेम प्रदीप शर्मा यांचा दोषमुक्तीचा अर्ज विशेष न्यायालयाने शनिवारी फेटाळून लावला.

खोट्या आरोपांतर्गत या प्रकरणात गोवण्यात आल्याचा प्रदिप शर्मा यांचा युक्तिवाद प्रकरणाच्या या टप्प्यावर मान्य करू शकत नाही, असे राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) विशेष न्यायाधीश ए.एम. पाटील यांनी अर्ज फेटाळून लावताना स्पष्ट केले. प्रथमदर्शनी हा खटला आरोपींनी रचलेल्या मोठ्या कटाशी संबंधित आहे. तसेच साक्षीदारांचे जबाब आणि कागदोपत्री पुरावे बनावट होते, असा निष्कर्ष या टप्प्यावर काढता येत नाही, असे न्यायालयाने प्रामुख्याने दोषमुक्तीचा अर्ज फेटाळताना नमूद केले.

बेकायदा कारवाया प्रतिबंध(युएपीए) कायद्यातंगत दाखल गुन्ह्याशी आपला कोणताही संबंध नाही. निव्वळ संशय हा आरोप निश्चितीसाठी पुरेसा नाही, असेही शर्मा यांनी दोषमुक्तीच्या अर्जात म्हटले होते.

काय आहे प्रकरण

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर २५ फेब्रुवारी २०२१ रोजी स्फोटकांनी भरलेली एसयूव्ही गाडी जप्त करण्यात आली आणि त्यानंतर उद्योगपती मनसुख हिरेन यांचा मृतदेह ५ मार्च रोजी ठाण्यातील खाडीतमध्ये आढळून आला होता. त्यानंतर या प्रकरणात बडतर्फ पोलीस अधिकारी आणि मुख्य आरोपी सचिन वाझे, माजी पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा, माजी पोलीस विनायक शिंदे, रियाजुद्दीन काझी आणि सुनील माने तसेच नरेश गोर, संतोष शेलार, आनंद जाधव, सतीश मोठकुरी आणि मनीष सोनी यांना अटक करण्यात आली. शर्मा यांना सर्वोच्च न्यायालयाने वैद्यकीय जामीन मंजूर केला आहे.

About Editor

Check Also

अखेर दिल्ली उच्च न्यायालयाने राजपाल यादव यांच्या शिक्षेला स्थगिती १८ मार्चपर्यंत राजपाल यादव यांच्या शिक्षेला स्थगिती

दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी राजपाल यादव यांची चेक बाउन्स प्रकरणात शिक्षा स्थगित केली, ज्यामुळे त्यांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *