आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी भावना गवळी यांचा निकवर्तीय सईद खान यास दणका दोषमुक्तीचा अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळून लावला

शिवसेना शिंदे गटाच्या विधान परिषदेच्या आमदार भावना गवळी यांचे निकवर्तीय तथा सहकारी सईद खान यांचा मनी आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणातून मुक्त करण्याचा अर्ज विशेष पीएमएलए न्यायालयाने फेटाळून लावला आहे.

खान यांनी पडद्यामागे राहून भूमिका बजावली असून त्यांच्याविरुद्ध पुरेसे पुरावे असल्याचे विशेष न्यायाधीश ए. सी डागा यांनी १३ जानेवारी रोजी दिलेल्या आदेशात खान यांचा अर्ज फेटाळून लावताना नमूद केले आहे. आपण निर्दोष असून कधीही संस्थेचे पदाधिकारी नसल्याचे खान यांनी त्यांच्या दोषमुक्तीच्या अर्जात दावा केला होता. तसेच संस्थेचे कंपनीत रूपांतरित झाल्यानंतरच ते अध्यक्ष झाले. आरोपी हा संस्थेचा पदाधिकारी किंवा प्रभारी नव्हता, परंतु याचा अर्थ असा नाही की पदाधिकारी नसलेली व्यक्ती संस्थेच्या व्यवस्थापनावर नियंत्रण ठेवू शकत नाही. याप्रकऱणी पडद्यामागील व्यक्तीला समोर आणणे आवश्यक आहे. या प्रकरणात, अर्जदार पडद्यामागे राहून काम करीत असल्याचे रेकॉर्डवरून असे दिसून येते असेही खान यांचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळताना न्यायालयाने नमूद केले.

महिला उत्कर्ष प्रतिष्ठान’ नावाच्या संस्थेतील निधीमध्ये अपहार केल्याचा आरोप असलेल्या खान यांना सप्टेंबर २०२१ मध्ये सक्तवसूली संचालनालयाने (ईडी) अटक केली होती. सध्या ते जामिनावर आहेत. महाराष्ट्र विधान परिषदेच्या सदस्या गवळी यांनी पीएमएलए कायद्याअंतर्गत दाखल केलेल्या खटल्यासंदर्भात बाजू नोंदवण्यासाठी ईडीसमोर अनेक वेळा हजेरी लावली आहे. खान आणि गवळी यांनी सुमारे १८ कोटी रुपयांची बनावट कागदपत्रे आणि फसवणूक करून संस्थेचे खाजगी कंपनीत रूपांतर करण्याचा कट रचल्याचा ईडीचा आरोप आहे. म्हणूनच ईडीने त्यांच्या दोषमुक्तीच्या अर्जावर आक्षेप घेतला होता.

About Editor

Check Also

अखेर दिल्ली उच्च न्यायालयाने राजपाल यादव यांच्या शिक्षेला स्थगिती १८ मार्चपर्यंत राजपाल यादव यांच्या शिक्षेला स्थगिती

दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी राजपाल यादव यांची चेक बाउन्स प्रकरणात शिक्षा स्थगित केली, ज्यामुळे त्यांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *