अखेर केज न्यायालयाचा निर्णय, देशमुख हत्याप्रकरणी वाल्मिक कराडला मकोका वाल्मिक कराड नेमका कोणाच्या ताब्यात राहणार निर्णय उद्या

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या सात आरोपींनंतर खंडणी प्रकरणी सीआयडीला शरण आलेल्या वाल्मिक कराडला आज केज येथील न्यायालयात इतर आरोपांसोबत हजर करण्यात आले. त्यावेळी दोन्ही बाजूंच्या वकिलांनी केलेल्या युक्तीवादानंतर वाल्मिक कराड याच्यावर मकोका कायदा लागू करण्याची मागणी केजच्या न्यायालयाने मान्य केली.

त्यामुळे वाल्मिक कराड याच्यावर अवादा कंपनीकडून खंडणी वसूल प्रकरणाबरोबरच आता संतोष देशमुख यांच्या हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच वाल्मिक कराड यास या इतर सात आरोपींसोबत कार्यवाही होणार असल्याचे स्पष्ट झाले. त्याचबरोबर वाल्मिक कराड याला यापूर्वी सुनावण्यात आलेली पोलिस कोठडी संपत आल्याने आज केजच्या न्यायालयात हजर करण्यात आले असता वाल्मिक कराड याची आणखी चौकशी करायची असल्याने त्याची पोलिस कोठडी आणखी १४ दिवसांची वाढवू द्यावी अशी मागणी करण्यात आली. त्यावर दोन्ही बाजूंनी युक्तीवाद होत १४ दिवसांच्या पोलिस कोठडीस न्यायालयाने मान्यता दिली.

वाल्मिक कराड याला मागील सुनावण्यात आलेल्या १० दिवसांच्या पोलिस कोठडीत वाल्मिक कराडच्या आवाजाचे नमूने पोलिसांनी घेतले आहेत. अवदा कंपनीकडून खंडणी गोळा करण्यात वाल्मिक कराडनेच कंपनीच्या अधिकाऱ्यांना फोन करून खंडणीचे पैसे देण्यासाठी कंपनीतील अधिकाऱ्याला फोन केला होता असा आरोप आहे. तसेच त्याने कमावलेली संपत्ती कोणत्या पैशातून कमावली याचाही तपास करायचा असल्याने पोलिसांकडून त्याच्या १४ दिवसांची कोठडी मागितली.

केजच्या न्यायालयाने वाल्मिक कराडवर मकोका गुन्हा लावण्यास मंजूरी दिल्यानंतर वाल्मिक कराडचा ताबा एसआयटीकडे जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे कराडच्या अडचणीत मोठी वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, वाल्मिक कराड याचा सहभाग संतोष देशमुख यांच्या हत्येच्या कटात नसल्याचा दावा कराडच्या वकीलांनी न्यायालयात सुनावणीच्या दरम्यान केला. तसेच पोलिस कोठडीची मागणी न्यायालयाने फेटाळल्याचेही यावेळी सांगितले.

About Editor

Check Also

मुंबई उच्च न्यायालयाचे यशस्वी न्यायदान; ७९ वर्ष जुना खटला निकाली स्वातंत्र्यानंतर दाखल झालेल्या दिवाणी खटल्याचा दावा ७९ वर्षानंतर निकाली निघाला

मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. स्वातंत्र्यानंतरचा म्हणजेच ७ ऑक्टोबर १९४७ रोजी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *