आशिष शेलार यांची घोषणा, आगामी ३६५ दिवसात १२०० कार्यक्रम होणार श्रमिकांच्या कलेला असतो घामाचा सुगंध ! आशिष शेलार यांचे मत

श्रमिकांची कला वृद्धींगत झाली होऊन पुढील पिढीपर्यंत नेली पाहिजे. आज जीपीटीचा जमाना आहे. त्यात कृत्रिम ट्यून मिळते पण सृजनाची ट्यून श्रमिक कलावंतच बनवू शकतो. या श्रमिकांच्या कलेला घामाचा सुगंध असतो, गौरव उद्गार राज्याचे सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी केले.

महाराष्ट्राच्या मातीतील अस्सल कलांचा श्रमिकांचा दोन दिवसांचा कला महोत्सव महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्यविभाग यांच्या वतीने ठाणे येथील हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे कलादालनात आयोजित करण्यात आला आहे.

या कला महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री अॅड. आशिष शेलार यांच्या हस्ते झाले.

त्यावेळी मंत्री आशिष शेलार म्हणाले की, ,लुप्त होत चाललेल्या लोककलांना पुनरुज्जीवन करणे , अन्य कलांना मानाचे स्थान देणे, देशासमोर आपले राज्य संपन्न म्हणून समोर ठेवणे या उद्देशाने सांस्कृतिक विभाग प्रामाणिकपणे काम करत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकार मध्ये सांस्कृतिक कार्य संचालनालय विभागाची जबाबदारी मला दिली आहे. गेल्या ८० ते ८५ दिवसात या विभागाच्या माध्यमातून आम्ही १७० कार्यक्रम केले. संस्कृती संवर्धनाचे, प्रचाराचे ,प्रसाराचे, कलावंतांना संधी आणि स्थान देण्याचे काम या कार्यक्रमातून करत आहोत . आगामी आर्थिक वर्षात ३६५ दिवसात बाराशे कार्यक्रमांची रचना केली असल्याची माहिती शेलार यांनी यावेळी बोलताना दिली.

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाकडून संगीत ,नाटक, लोककला लोकवाद्य ,कार्यशाळा अशा विविध कार्यक्रमातून संपन्न महाराष्ट्र राज्याचे दर्शन देशात सातत्याने होत असते. आज ठाण्यात होणारा श्रमिकांचा कला महोत्सव हा विशेष आहे. श्रमिकांच्या कलाकृतीला उपजत गुणी वृत्तीला श्रमिकाच्या कामांची ,मेहनतीची जोड आहे ,म्हणून या कार्यक्रमाचा सुगंध वेगळा आहे. विदेशातील कित्येक डॉलर खर्च केले तरी श्रमिक कलावंतांची कला निर्माण होऊ शकत नसल्याचे शेलार म्हणाले.

यावेळी व्यासपीठावर खासदार नरेश म्हस्के, भाजपा ठाणे शहर अध्यक्ष संजय वाघुले, संदीप लेले, सांस्कृतिक विभागाचे सहसंचालक श्रीराम पांडे, समर्थ भारत व्यासपीठाचे संचालक सुरेंद्र वैद्य, उल्हास कार्ले, मुख्य कार्यकारी अधिकारी भटू सावंत आदी उपस्थित होते. यावेळी श्रमिक व श्रमिकांच्या कलाविकासासाठी योगदान देणाऱ्या ६ गुणीजन यांचे शेलार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

दरम्यान, दोन दिवस आयोजित करण्यात आलेल्या श्रमिक कलावंतांच्या कला सादरीकरणाने श्रमिकांचा कला महोत्सव रंगणार आहे. या महोत्सवात कचरा वेचक, सफाई सेविका, घरकाम करणाऱ्या महिलांसह तृतीयपंथी, तमाशा कलावंत, गोंधळी, संबळ वादक, अंध दिव्यांग, पोतराज, वासुदेव, कोळी बांधव, तारपा कलावंत असे जवळपास १०० हून अधिक श्रमिक कलावंत या कलामहोत्सवात आपली कला सादर करणार आहेत.

About Editor

Check Also

IffI2025

IFFI2025 : ५६ वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गोव्यात सुरू

आठ दिवसांचा ५६ वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव IFFI गुरुवारी गोव्याची राजधानी पणजी येथे एका भव्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *