Skin Care

जाणून घ्या पावसाळ्यात टीव्ही कलाकार कसे करतात स्किनकेअर ? त्वचेला टवटवीत, कोमल व चमकदार ठेवण्यासाठी एण्ड टीव्ही कलाकार पावसाळ्यामधील स्किनकेअर उपायांबाबत त्यांचे सर्वोत्तम सिक्रेटस् सांगत आहेत.

मुंबई, 22 ऑगस्ट : पावसाळा सर्वांचा आवडता ऋतू आहे. पण पावसाळ्यासोबत स्किनकेअर बाबत समस्या देखील येतात. वाढणारी आर्द्रता व ओलसरपणामुळे पुरळपासून डिहायड्रेटेड त्वचेपर्यंत त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. त्वचेला टवटवीत, कोमल व चमकदार ठेवण्यासाठी एण्ड टीव्ही कलाकार पावसाळ्यामधील स्किनकेअर उपायांबाबत त्यांचे सर्वोत्तम सिक्रेटस् सांगत आहेत. हे कलाकार आहेत गीतांजली मिश्रा (राजेश, ‘हप्पू की उलटन पलटन’), मनिषा अरोरा (महुआ, ‘दूसरी माँ’) आणि विदिशा श्रीवास्तव (अनिता भाबी, ‘भाबीजी घर पर है’).

मालिका ‘हप्पू की उलटन पलटन’मधील नवीन राजेश ऊर्फ गीतांजली मिश्रा म्हणाल्या, ”माझी त्वचा पावसाळ्यादरम्यान नेहमीपेक्षा अधिक संवदेनशील बनते. त्वचा अधिक तेलकट बनल्याने पुरळ, मुरमा, काळे डाग, सफेद डाग दिसतात. या समस्यांचे निराकरण करण्यासाठी मी घरगुती उपाय म्हणून डाळींबाच्या बियांपासून बनवलेल्या फेस पॅकचा वापर करते, ज्यामध्ये अॅण्टीऑक्सिडण्ट्स व व्हिटॅमिन सी सारखे वृद्धत्वाला विरोध करणारे घटक संपन्न प्रमाणात असतात, ज्यामुळे निस्तेज त्वचा पुन्हा टवटवीत होते. मी दोन चमचे डाळींबाच्या बिया आणि एक कप कच्चे ओट्सचे मिश्रण तयार करते. भांड्यामध्ये हे मिश्रण घेत त्यामध्ये दोन चमचे मध व ताक मिसळते. हे मिश्रण काही मिनिटांसाठी माझ्या चेहऱ्यावर लावते आणि त्यानंतर चेहरा धुते. यामुळे त्वचेमधील मृत पेशी दूर होण्यास, त्वचा तेजस्वी होण्यास आणि त्वचेवरील तेलकटपणा दूर होण्यास मदत होते.”

मालिका ‘दूसरी माँ’मधील मनिषा अरोरा ऊर्फ महुआ म्हणाल्या, ”पावसाळा उत्साहाचे वातावरण घेऊन येतो आणि निसर्गाच्या सान्निध्यात पावसामध्ये भिजताना खूप धमाल येते. पण यामुळे त्वचेवर देखील परिणाम होतो, म्हणून त्वचेचे संरक्षण करणे महत्त्वाचे आहे. मी माझ्या त्वचेला टवटवीत ठेवण्यासाठी आठवड्यातून दोनदा घरगुती स्क्रबचा वापर करते. या स्क्रबमध्ये ओटचे जाडेभरडे पीठ, संत्र्याची साल आणि लाल मसूरची पावडर गुलाब पाण्याच्या मदतीने मिसळते. मी हे स्क्रब त्वचा अर्धी कोरडी असताना त्वचेवर लावते. काही मिनिटांसाठी चेहरा स्क्रब करते आणि त्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुते. यामुळे त्वचा तेजस्वी होते. मी त्वचा चमकदार असण्याची इच्छा असलेल्या सर्व वाचकांना या स्क्रबचा वापर करण्याची शिफारस करते.”

मालिका ‘भाबीजी घर पर है’मधील विदिशा श्रीवास्तव ऊर्फ अनिता भाबी म्हणाल्या, ”पावसाळा आपल्या त्वचेसाठी प्रतिकूल ठरू शकतो. पावसाळ्यादरम्यान सर्वत्र ओलावा असल्यामुळे त्वचा स्वच्छ व कोमल ठेवणे महत्त्वाचे आहे. याच कारणामुळे मी नियमितपणे माझ्या त्वचेची काळजी घेते. मी कोमल व तेजस्वी त्वचेसाठी दोन चमचे मीठ, एक चमचा लिंबाचा रस आणि काही थेंब ऑलिव्ह तेल या मिश्रणासह तयार केलेला साधा, पण गुणकारी फेशियल स्क्रब वापरते. मी माझ्या चेहऱ्यावरील अतिरिक्त काजळी आणि तेल काढून टाकण्यासाठी या स्क्रबचा वापर करते, ज्यामुळे त्वचा उत्साही व टवटवीत होते.”

About Marathi E Batmya

Check Also

IffI2025

IFFI2025 : ५६ वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गोव्यात सुरू

आठ दिवसांचा ५६ वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव IFFI गुरुवारी गोव्याची राजधानी पणजी येथे एका भव्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *