‘रणभूमी’साठी तिसऱ्यांदा एकत्र आले वरुण-करण-शशांक दोन वर्षांनंतरच्या दिवाळीचं अॅडव्हान्स बुकींग

मुंबई : प्रतिनिधी

तरुणाईच्या गळयातील ताईत बनलेला अभिनेता वरुण धवन सध्या ‘सुई धागा’ या हिंदी चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात वरुणच्या जोडीला अनुष्का शर्मा आहे. या चित्रपटातील दोघांचाही हटके लुक नुकताच रिव्हील करण्यात आल्याने या चित्रपटाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या वातावरणातच निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने वरुण आणि दिग्दर्शक शशांक खेतान यांच्यासोबत चित्रपट बनवत असल्याची घोषणा करीत लक्ष वेधून घेतलं आहे.

थेट चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख घोषित करीत करणने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. ‘रणभूमी’ असं शीर्षक असलेला हा सिनेमा २०२० मध्ये दिवाळीला प्रदर्शित करण्याचे घोषित करीत करणने जणू दोन वर्षांनंतरच्या दिवाळीचे अॅडव्हान्स बुकिंगच केलं आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने करण, वरुण आणि शशांक तिसऱ्यांदा एकत्र येणार आहेत. करणचंच निर्मिती-दिग्दर्शन असलेल्या ‘स्टुडन्ट ऑफ द इयर’ या चित्रपटाद्वारे बॅालिवुडमध्ये दाखल झालेल्या वरुणने अल्पावधीतच आपला वेगळा ठसा उमटवला आहे. या चित्रपटानंतर करणची निर्मिती तसंच शशांकच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’ आणि ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ या चित्रपटांमध्ये वरुणने मुख्य भूमिका साकारली. आता ‘रणभूमी’साठी हे तिघे पुन्हा एकत्र आले आहेत. या चित्रपटात सूडकथा पाहायला मिळणार आहे. इतर कलाकारांची घोषणा लवकरच करण्यात येणार आहे.

About Editor

Check Also

सलीम खान यांना दाखल केले लीलावती रूग्णालयात आरोग्याबद्दलतची कोणातीही अधिकृत माहिती नाही

अभिनेता सलमान खानचे वडील, ज्येष्ठ पटकथा लेखक सलीम खान यांना मंगळवारी मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *