फोटो व्हायरल केला म्हणून राखी सावंतला अटक शर्लिन चोप्राच्या तक्रारीवरून अंधेरी पोलिसांनी केली कारवाई

आपल्या वादग्रस्त वागण्याने आणि बोलण्याने नेहमी चर्चेत असलेल्या अभिनेत्री राखी सावंतला मुंबईतील आंबोली पोलिसांनी अटक केली. एका मॉडेलचा फोटो व्हायरल केल्याचा आरोप राखी सावंतवर करण्यात आला आहे. या प्रकरणी त्या मॉडेलने केलेल्या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी कारवाई केली. या सदर मॉडेल महिलेचा फोटो राखीनं व्हायरल केला होता.

अभिनेत्री शर्लिन चोप्रानं यासंदर्भात ट्विटरवर माहिती दिली आहे. ‘आंबोली पोलिसांनी राखी सावंतला ८३३/२०२२ क्रमांकाच्या एफआयआरप्रकरणी अटक केली. काल राखी सावंतनं यासंदर्भात अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, तो अर्ज न्यायालयानं फेटाळला’, अशी माहिती शर्लिन चोप्रानं ट्वीटमध्ये दिली.

दरम्यान, राखी सावंतला थोड्या वेळात न्यायालयात हजर केलं जाणार असून त्यानंतर तिला पोलीस कोठडी की न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात येईल, याबाबत चित्र स्पष्ट होईल.

राखी सावंत आज दुपारी तिचा पती आदिल खान दुरानी याच्यासमवेत भागीदारीमध्ये सुरू केलेल्या डान्स अकॅडेमीचं उद्घाटनही करणार होती. दुपारी ३ च्या सुमारास हे उद्घाटन केलं जाणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र, आता राखी सावंतच्या अटकेमुळे हे उद्घाटन लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

राखीविरोधात शरलीन चोप्रानंच तक्रार दाखल केल्याचं सांगितलं जात आहे. शरलीन चोप्राचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ राखीनं पत्रकार परिषदेत दाखवला होता आणि त्यावरून आक्षेपार्ह भाषेत विधानही केलं होतं म्हणून राखीविरोधात तक्रार दाखल करण्यात आल्याचंही सांगितलं जात आहे.

About Editor

Check Also

ऐश्वर्या रॉय बच्चनला आयकर कर खटल्यात मिळाला विजय ४ कोटी रूपयांचा कर वाचला

आयकर अपीलीय न्यायाधिकरण (ITAT) मुंबईने ४ कोटी रुपयांच्या परवाना रद्द करण्याच्या बाजूने निकाल दिल्यानंतर ऐश्वर्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *