वादाची लागण ‘हिंदू कोड बील’ ला नाटक सादरीकरणाच्या हक्कावरून वाद

मुंबई : प्रतिनिधी

राज्याच्या राजकिय, सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासात वादांना फार महत्व आहे. मात्र एखाद्या वादामुळे चांगली नाट्यकृतीच बंद होण्याची वेळ आली तर ते सामाजिकदृष्ट्या अतिशय घातक आहे. सध्या मराठी अनुवादीत हिंदू कोड बील या नाटकाच्या सादरीकरणाच्या हक्कावरून असाच वाद निर्माण झाला असून या वादाचा परिणाम या नाट्यकृतीवर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मूळ हिंदी भाषेत असलेल हिंदू कोड बील हे नाटक राजेश कुमार यांनी लिहील आहे. हे नाटक स्वातंत्र्यानंतर देशातील सर्वधर्मिय महिलांचे हक्क आणि या हक्काबाबत प्रत्येक धर्मातील कथित धर्म मार्तंडांच्या भूमिका व घटनाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची या कायद्यामागील भूमिका यावर आधारीत नाटक आहे. या नाटकाचा मराठी अनुवाद प्रमोद नवार यांनी केला आहे. तर त्याचे दिग्दर्शन संजय खिलारी यांनी केले आहे. मात्र या नाटकाच्या सादरीकरणाचे हक्क सामाजिक कार्यकर्त्ये सुबोध मोरे यांच्या असताना या नाटकाची कोणतीही रितसर परवानगी न घेताच कँनव्हॉस थिएटरच्या सचिन उन्हाळेकर यांनी परस्परच हे नाटक सादर करण्यास सुरुवात केली आहे.

याबाबत संबधित मराठी अनुवादक प्रमोद नवार आणि हक्कदार सुबोध मोरे यांनी यासंदर्भात सचिन उन्हाळेकर यांना याबाबत सातत्याने विचारणा करूनही त्यांच्याकडून म्हणावा तसा प्रतिसाद देत नाहीत. तसेच प्रत्येकवेळी करार मदार पुढील आठ दिवसात करून तीन-चार दिवसात करू असे सांगत करार न करताच सदरच्या नाटकाचे सादरीकरण करत आहेत. त्यामुळे कायदेशीर नियमांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप हिंदू कोड बील या नाटकाच्या सादरीकरणाचे हक्कदार सुबोध मोरे यांनी केला.

याबाबत लेखी स्वरूपात सचिन उन्हाळेकर यांना कळविण्यात आल्यानंतरही मुळ मराठी अनुवादक आणि हक्कदाराकडून कोणतीही पूर्व परवानगी न घेताच नाटकाचे प्रयोग करण्यास सुरुवात केली. मात्र याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

याबाबत सचिन उन्हाळेकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, मुळ लेखक राजेश कुमार यांच्या परवानगीचे पत्र आमच्याकडे आहेत. हे मुळ नाटक हिंदीत आहे. त्याचा मराठीत अनुवाद प्रवीण नवार हे आहेत. नवार हे या नाटकाची रिर्हसल, रंगीत तालीम होईपर्यंत नेहमी सोबत असत. मात्र या नाटकाचे हक्क तिसऱ्या व्यक्तीला विकण्यासंदर्भात कधी बोलले नव्हते. तसेच पहिले दोन प्रयोग ते नाटकालाही येवून बसले होते. त्यानंतर मात्र त्यांनी या नाटकाचे हक्क परस्पर आम्हाला कोणालाही न विचारता विकले. दरम्यानच्या काळात नवार यांच्याशी आम्ही करार करून त्यांना त्यांचे पैसे देण्याचा प्रयत्न केला. मात्र ते मुंबई महापालिकेत नोकरीला असल्याने करारावर सही करणार नसल्याचे सांगत करार करण्यास नकार दिला आणि पैसे स्विकारले नाहीत. मात्र आमच्याकडे नाटक सादर करण्यासाठी आवश्यक ती सर्व कागदपत्रे असल्याने आम्हाला नाटक करण्यापासून कोणी रोखू शकत नाही.

 

About Editor

Check Also

ऐश्वर्या रॉय बच्चनला आयकर कर खटल्यात मिळाला विजय ४ कोटी रूपयांचा कर वाचला

आयकर अपीलीय न्यायाधिकरण (ITAT) मुंबईने ४ कोटी रुपयांच्या परवाना रद्द करण्याच्या बाजूने निकाल दिल्यानंतर ऐश्वर्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *