‘नानू की जानू’ने साकार केलं पत्रलेखाचं स्वप्न अभय देओल साकारणार नानूची भूमिका

मुंबई : संजय घावरे

प्रत्येकाचं आपलं एक स्वप्न असतं. आपापल्या क्षेत्रात कितीही मोठं झालं तरी त्या स्वप्नाचा पाठलाग करण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करतच असतो. कलाकारांचंही असंच असतं. प्रत्येक कलाकाराचं कधीतरी कोणासोबत तरी काम करण्याचं स्वप्न असतं. प्रत्येकाचंच स्वप्न साकार होतंच असं नाही, पण काहींची स्वप्न मात्र कारकिर्दीच्या सुरुवातीच्याच काळात साकार होतात. ‘नानू की जानू’ या सिनेमात मुख्य भूमिका साकारणाऱ्या पत्रलेखाचं स्वप्न या सिनेमाच्या निमित्ताने साकार झालं आहे.

‘सिटी लाईट्स’ आणि ‘लव्ह गेम्स’ या सिनेमांनंतर पत्रलेखा आता ‘जानू की जानू’ या सिनेमात झळकणार आहे. या सिनेमात अभय देओल नानूच्या भूमिकेत आहे, तर पत्रलेखा त्याची जानू बनलीय. या हॅारर-कॅामेडीमध्ये अभयने एका गुंडाची भूमिका साकारली असून जानूच्या भूमिकेचं गुपित कायम राखण्यात आलं आहे. इतकंच काय तर सिनेमाच्या ट्रेलरमधूनही पत्रलेखा गायब आहे.

या सिनेमाच्या निमित्ताने स्वप्न साकार होण्याबाबत ‘मराठी ई बातम्या’शी बोलताना पत्रलेखा म्हणाली की, बालपणापासून मी शाहरुख खानची फॅन आहे. शाहरुखचे सर्व सिनेमे पाहते. अभयची मुख्य भूमिका असलेला ‘देव डी’ हा सिनेमा पाहिला आणि मला तो खूप आवडला. तेव्हा आपल्यालाही अभयसारखा एखादा सिनेमा मिळायला हवा असं वाटलं. योगायोगाने ‘नानू कि जानू’ची स्क्रीप्ट वाचण्यासाठी आली. या सिनेमात अभयसुद्धा असल्याचं समजलं तेव्हा माझ्या मनातील इच्छा आपोआपच पूर्ण झाली. अभयने आपला एक वेगळा चाहतावर्ग तयार केला आहे. हा चाहतावर्ग केवळ अभयच्या नावावर सिनेमे पाहायला येतो. आता अभयच्या निमित्ताने मला त्यांच्यासमोर माझंही अभिनयकौशल्या दाखवण्याची संधी लाभल्याचं पत्रलेखा म्हणाली. या सिनेमासोबतच पत्रलेखा सध्या आणखी एका महतत्त्वाच्या प्रोजेक्टवर काम करतेय. लवकरच त्याबाबतही समजेल.

About Editor

Check Also

One-battle-after-another-Movie

Oscar 2026 : ‘वन बॅटल आफ्टर अदर’ ने सर्वोत्कृष्ट चित्रपट जिंकला, फक्त सहा पुरस्कार जिंकले

Oscar 2026: ९८ व्या अकादमी पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपट श्रेणीत पॉल थॉमस अँडरसनचा “वन बॅटल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *