कॅगच्या न्यायालयात फडणवीस सरकार दोषी ऊर्जा, सिडको-नगरविकास, परिवहन, एमएसआरडीसीच्या कारभारावर ठपका

मुंबईः विशेष प्रतिनिधी

गतीमान सरकार, पारदर्शक सरकारचा नारा देत राज्यात  विराजमान झालेल्या भाजपा सरकारने आपल्या कार्यकाळात विकासकामांच्या नावाखाली गुंतवणूक वाढविली. मात्र दुसऱ्याबाजूला या वाढविलेल्या गुंतवणूकीचा परतावा मिळविण्याऐवजी नुकसानीचा कारभार केला असून एमएसआरडीसी, परिवहन विभाग, ऊर्जा विभागाला मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले. तर सिडकोच्या निविदा वाटपात मोठ्या प्रमाणावर नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका कॅगने तपासात उघडकीस आणत फडणवीस सरकारला दोषी ठरविल्याचे दिसून येत आहे.

फडणवीस सरकारच्या काळात ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी २०१३-१४ साली असलेली ८५ हजार ९९९ कोटी रूपयांवरून २०१७-१८ पर्यंत २ लाख १८ हजार ७४९ कोटी रूपयांपर्यंत वाढविली.  मात्र २०१६-१७ वर्षी ऊर्जा विभागाला १७ हजार ४६२ कोटी रूपयांचा तोटा सहन करावा लागला. परंतु २०१७-१८ या साली हे नुकसान कमी करण्यात ऊर्जा विभागाला यश येत तो ३ हजार ३२८ कोटी रूपयांपर्यंत खाली आणला. याशिवाय ऊर्जा विभागाच्या अखत्यारीत असलेल्या आठ पैकी चार सार्वजनिक उपक्रमांना ४ हजार १४२ कोटी रूपयांचा तोटा सहन करावा लागला. यातील सर्वाधिक तोटा हा एमएसईडीसीएल (३ हजार १७६ कोटी रू.) ला झाला आहे. तर सर्वाधिक कमी अर्थात ९२९ कोटी रूपयांचा तोटा एसएसपीजीसीएल कंपनीला झाला. तसेच जी २४ उपकेंद्रांची उभारणी करण्यात आली. तसेच ५२ उपकेंद्रांच्या उभारणीसाठी १ हजार ८३५ कोटी रूपयांची साधनसामग्री खरेदी करण्यात आली. परंतु ठेकेदारांने या केंद्रांची वेळेत उभारणी न केल्याने त्या रकमेवरील व्याजाचा भुर्दंड सरकारच्या माथी पडल्याचा ठपका कॅगने ठेवला.

राज्य सरकारच्या ७७ शासकिय कंपन्या व १० वैधानिक महामंडळे आहेत. यापैकी २१ कंपन्या निष्क्रिय आहेत. या कंपन्यांची उलाढाल २०१७-१८ मध्ये १० हजार ७९१ कोटी इतकी होती. मात्र याच वर्षात या कंपन्यांना २९४ कोटी रूपयांचे नुकसान सहन करावे लागल्याचे अहवालात उघडकीस आले. याशिवाय एसटी महामंडळाला ५२२ कोटी रूपये, राज्य रस्ते विकास महामंडळ अर्थात एमएसआरडीसीला २२४ कोटी रूपयांचे नुकसान सहन करावे लागल्याची बाबही कॅगने अहवालात नोंदविली आहे.

याशिवाय नगरविकास विभागाच्या अखत्यारीत येत असलेल्या सिडकोच्या कामातही मोठ्या प्रमाणावर अनियमितता आल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे हे खाते तत्कालीन मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांच्याकडे होते. सिडकोकडून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीच्या निविदा प्रक्रियेत नियमांचे उल्लघंन केल्याचे आणि मर्जीतील कंपन्यांना निविदा दिल्याचे उघडकीस आले आहे. याशिवाय रस्त्याच्या कामासाठी लागणाऱ्या साधनसामग्रीच्या किंमतीत तब्बल २२.०८ कोटी रूपयांचा फरक दिसून आा आहे. तर २२ कंत्राटदारांकडून वसुल करावयाच्या १८५.९७ कोटी रूपयांच्या पैशावर सिडकोने पाणी सोडल्याची बाब कँगने आपल्या अहवालात नमूद केली आहे.

About Editor

Check Also

100 percent direct approval for foreign investment in the insurance sector.

एफडीआय: विमा क्षेत्रात परदेशी गुंतवणुकीला १०० टक्के थेट मान्यता

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवारी एका महत्त्वपूर्ण आर्थिक सुधारणांचा भाग म्हणून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *