जिंदाल स्टेनलेस महाराष्ट्रात ४२ हजार ८८६ कोटींची गुंतवणूक करणार उद्योजक रतन जिंदाल यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रस्ताव

जिंदाल स्टेनलेस लिमिटेड महाराष्ट्रात ४२ हजार ८८६ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा प्रकल्प उभा करणार आहे. यातून सुमारे साडे पंधरा हजार रोजगार संधी उपलब्ध होणार असल्याने, या प्रकल्पाचे महाराष्ट्रात स्वागत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

जिंदाल स्टेनलेस लिमिटेडचे अध्यक्ष रतन जिंदाल यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची ‘सागर’ या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या भेटीत जिंदाल यांनी या प्रकल्पाच्या उभारणीचा प्रस्ताव सादर केला. या प्रकल्पाची उत्पादन क्षमता वार्षिक चार दशलक्ष टन इतकी असणार आहे.

या उद्योग समुहाने आणि जिंदाल यांनी महाराष्ट्राच्या क्षमतेवर दाखविलेला विश्वास महत्वाचा आहे. त्यामुळे या प्रकल्पाकरिता सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी या भेटी दरम्यान झालेल्या चर्चेत नमूद केले.

याप्रसंगी उद्योग विभागाचे सचिव डॉ. पी. अनबलगन, जिंदाल समुहाचे वरिष्ठ अधिकारी आदी उपस्थित होते.

 

About Editor

Check Also

आयडीबीआय बँकेतील कॅनडाच्या फेअरफॅक्सला केलेली हिस्सा विक्री ठरतेय वादग्रस्त बोली लावण्याची प्रक्रिया आणि त्याचे पालन करण्यासाठी वापरलेले नियम यावरून संशय

आयडीबीआय (IDBI) बँकेतील बहुतांश हिस्सा कॅनेडियन वित्तीय सेवा समूह ‘फेअरफॅक्स फायनान्शिअल होल्डिंग्स’ला (Fairfax Financial Holdings) …

One comment

  1. स्वागत आहे तुमचे महाराष्ट्रात (ठाणे ज़िल्यात नवी मुंबई त

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *