यंदा दिवाळीत शेअर बाजारात मुहूर्त ट्रेडिंग, ही असेल संभाव्य वेळ १२ नोव्हेंबर रोजीची असणार वेळ

यंदा दिवाळी रविवार, १२ नोव्हेंबर २०२३ रोजी साजरी होत आहे. या दिवशी शेअर बाजाराला साप्ताहिक सुट्टी राहील. मात्र, दरवर्षीप्रमाणेच दिवाळीच्या दिवशीही शेअर बाजारात मुहूर्त ट्रेडिंग होईल. मुहूर्त ट्रेडिंग हा गुंतवणूकदारांसाठी अत्यंत शुभ मानला जातो. त्यामुळे मुहूर्त ट्रेडिंगला अनेक गुंतवणूकदार गुंतवणूक करण्यासही प्रारंभ करतात.

परंपरा ५१ वर्ष जुनी
दिवाळीच्या दिवशी शेअर बाजारात सुट्टी असत. पण सायंकाळी काही काळ ट्रेडिंग सुरू होते. यालाच मुहूर्त ट्रेडिंग म्हणतात. शेअर मार्केटमधील मुहूर्त ट्रेडिंगची परंपरा ५१ वर्ष जुनी आहे. हिंदू धर्मानुसार दिवाळीचा दिवस कोणत्याही नवीन गुंतवणूक, खरेदी, जमिनीचा व्यवहार, गृह प्रवेश इत्यादीसाठी अतिशय शुभ आहे. त्यामुळेदिवाळीच्या दिवशी गुंतवणूकदार मुहूर्त ट्रेडिंगमध्ये जास्त गुंतवणूक करतात.

यंदा मुहूर्त ट्रेडिंग कधी
या वर्षी रविवार, १२ नोव्हेंबर २०२३ रोजी दिवाळी आहे. या दिवशी मुहूर्तावर संध्याकाळचा मुहूर्त ट्रेडिंग असेल. त्याची संभाव्य वेळ जाणून घेऊया.
ब्लॉक डील सेशन – संध्याकाळी ५.४५ ते ६.०० पर्यंत
प्री ओपनिंग सेशन – संध्याकाळी ६.०० ते ६.०८ पर्यंत
सामान्य बाजार – ६.१५ ते ७.१५ वा
कॉल ऑक्शन सत्र – संध्याकाळी ६.२० ते ७.०५ पर्यंत
क्लोजिंग सत्र – ७.१५ ते ७.२५ वा

तेजी अपेक्षित
भारतीय शेअर बाजारात मुहूर्त ट्रेडिंग सुरू होण्यापूर्वी गणेश-लक्ष्मीची पूजा केली जाते. या पूजेत शेअर बाजाराचे सदस्य सहभागी होतात. त्यानंतर मुहूर्ताचा व्यवहार सुरू होतो. यंदा मुहूर्त ट्रेडिंग दिवशी शेअर बाजारात चांगली तेजी अपेक्षित आहे.

About Editor

Check Also

ईपीएफओच्या व्याज दरात काहीही बदल नाही २०११-१२ मधील व्याजदर ८.२५% चालू वर्षातही

सेवानिवृत्ती निधी संस्था ईपीएफओ EPFO ​​ने सोमवारी (२ मार्च २०२६) कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी (EPF) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *