जानेवारीमध्ये १४ दिवस बँका बंद पण विविध राज्यांमध्ये काही दिवस तर देशभरात एकदाच

मराठी ई-बातम्या टीम

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जानेवारी २०२२ च्या बँकेच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. यानुसार जानेवारी २०२२ मध्ये १४ दिवस बँका बंद राहणार आहेत.

जानेवारी २०२२ मध्ये बँकांना असणाऱ्या एकूण ११ दिवसांच्या सुट्ट्यांमध्ये ४ सुट्ट्या रविवारी आहेत. यामध्ये अनेक सुट्टया जोडूनही येत आहेत. मात्र, संपूर्ण देशातील बँका १४ बंद राहणार नाहीत. आरबीआयच्या अधिकृत संकेतस्थळावर जारी करण्यात आलेल्या सुट्ट्यांच्या यादीनुसार या सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यातील आहेत. या सर्व सुट्ट्या सर्व राज्यांमध्ये लागू होत नाहीत. ज्या राज्यात जो सण किंवा दिवस मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो तिथे ती सुट्टी लागू होते. आरबीआयच्या गाईडलाईन्सनुसार रविवारशिवाय महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद राहतील.

सुट्ट्यांची यादी

१ जानेवारी शनिवार – देशभरात नवीन वर्षाचा दिवस

२ जानेवारी रविवार – आठवड्याची देशव्यापी सुट्टी

३ जानेवारी सोमवार – सिक्कीममध्ये नवीन वर्ष आणि लासुंग सुट्टी असेल

४ जानेवारी मंगळवार- सिक्कीममधील लासुंग उत्सवासाठी सुट्टी असेल

९ जानेवारी रविवार – गुरू गोविंद सिंग जयंती, देशभरात आठवडा सुट्टी

११ जानेवारी मंगळवार – मिशनरी डे मिझोराम

१२ जानेवारी बुधवारी – स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त सुट्टी असेल

१४ जानेवारी शुक्रवारी – मकर संक्रांती अनेक राज्यांमध्ये आहे

१५ जानेवारी शनिवार – पोंगल आंध्र प्रदेश, पुडुचेरी, तामिळनाडू

१६ जानेवारी रविवार – आठवड्याची देशव्यापी सुट्टी

२३ जानेवारी रविवार – नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती, देशभरात आठवडा सुट्टी

२५ जानेवारी मंगळवार – राज्य स्थापना दिवस हिमाचल प्रदेश

२६ जानेवारी बुधवारी – देशभरात प्रजासत्ताक दिन

३१ जानेवारी सोमवार – आसाममध्ये

About Editor

Check Also

भारतीय शेअर बाजार जोरदार तेजीसह बंद, रिअल्टी आणि ऑटो शेअर्समध्ये खरेदी

आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रात भारतीय शेअर बाजार जोरदार तेजीसह बंद झाला. सेन्सेक्स ४४७.५५ अंकांनी म्हणजेच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *