आरबीआयच्या पतधोरणात आठव्यांदा कोणताही बदल नाही रेपो रेट दर सलग आठव्यांदा ६.५ टक्के इतकाच राहणार

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात आरबीआय RBI ने ७ जून रोजी सलग आठव्यांदा पतधोरणातील रेपो दरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला. सध्याचा रेपो रेट हा ६.५ टक्के इतका आहे. त्यामुळे बँकाकडून देण्यात येणाऱ्या कर्जाच्या व्याजदरात वाढ करण्यात होणार नाही. त्याचबरोबर महागाईवर लक्ष ठेवणार असल्याची माहिती आरबीआयचे गर्व्हनर शक्तीकांत दास यांनी दोन दिवस चालू वर्षाच्या २०२४-२५साठी झालेल्या आरबीआयच्या संचालक मंडळाच्या बैठकीनंतर सांगितले.

दोन दिवस चाललेल्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत आरबीआयचे गर्व्हनर शक्तीकांत दास यांनी वरील माहिती दिली.

शक्तीकांत दास पुढे बोलताना म्हणाले की, मे २०२२ पासून २५० बेसिस पॉइंट्सपर्यंत सलग सहा दर वाढीनंतर गेल्या वर्षी एप्रिलमध्ये दर वाढीचे चक्र थांबवण्यात आले. चालू आर्थिक वर्षाचे दुसरे द्वि-मासिक चलन धोरण जाहीर करताना, चलनविषयक धोरण समितीने (MPC) रेपो दर ६.५% वर अपरिवर्तित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

पुढे बोलताना शक्तीकांता दास म्हणाले की, एमपीसी सामान्य मान्सूनच्या अपेक्षेदरम्यान अन्नधान्याच्या महागाईवर लक्ष ठेवेल. आरबीआय RBI ने चालू आर्थिक वर्षासाठी ७% च्या आधीच्या अंदाजावरून वाढीचा अंदाज ७.२% पर्यंत वाढवला आहे.

https://x.com/RBI/status/1799044490763944307

बुधवारी सकाळी १० वाजता आरबीआयच्या दर-निर्धारण पॅनेल – MPC – च्या चर्चा केल्यानंतर शक्तीकांता दास यांनी निर्णय जाहीर केला.

सरकारने आरबीआय RBI ला दोन्ही बाजूंनी २% च्या फरकाने किरकोळ महागाई ४% वर सुनिश्चित करण्याचे आदेश दिले आहेत. या वर्षी एप्रिलमध्ये किरकोळ महागाई दर ४.८३% इतका होता.

एमपीसी MPC समिती मध्ये तीन बाह्य सदस्य आणि आरबीआय RBI चे तीन अधिकारी असतात. शशांक भिडे, आशिमा गोयल आणि जयंत आर वर्मा हे दर-निर्धारण पॅनेलचे बाह्य सदस्य आहेत.

About Editor

Check Also

कच्च्या तेलाच्या प्रति बॅरल किंमतीत वाढ मात्र बाजार २५०० अंशाने घसरला निफ्टी बाजारही घसरणीला

तेलाच्या किमती वाढल्याने आणि एचडीएफसी बँकेबद्दलच्या चिंतेमुळे गुंतवणूकदार अस्वस्थ झाल्याने, गुरुवारी दलाल स्ट्रीटवर विक्रीची नवी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *