मुख्यमंत्र्यांपाठोपाठ आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा इशारा तिसरी लाट येवू नये म्हणून काळजी घ्यावी लागणार

नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी

काही दिवसांपूर्वी राज्यात दहि हंडी उत्सवाला परवानगी संदर्भात आयोजित बैठकीत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सणसुद, उत्सव थोडेसे बाजूला ठेवून कोरोनाची लाट थोपविण्याच्यादृष्टीने काळजी घेवू असे आवाहन दहिहंडी पथकांना केले. त्यास काही दिवसांचा अवधी लोटत नाही तोच आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पुन्हा इशारा देत देशातील दुसरी लाट ओसरली नसल्याने आगामी सणासुदीच्या दिवसात काळजी घेण्याची आवश्यकता असल्याची इशारा दिल्याने आगामी काळातील गणेशोत्सव, नवरात्र, दसरा, दिवाळी निर्बंतातच साजरी करावी लागणार असून कोरोना विषयक नियम पाळणे बंधनकारक ठरणार आहे.

देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरली नाही. सणासुदीच्या दिवसानंतर कोरोना रुग्णसंख्येत नेहमीच वाढ झाल्याचं दिसून येतं. त्यामुळे सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यातील सण जबाबदारीने साजरे करणं गरजेचे असून लसीकरणामुळे रोगाची तीव्रता कमी होते आणि रुग्णालयात दाखल करण्याची स्थिती ओढावत नाही. त्यामुळे लसीकरण झाल्यानंतरही मास्क आणि करोना नियमावलीचं पालन करणं आवश्यक असल्याचे केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

मागील अनेक दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या ४० हजारांपेक्षा कमी होती. मात्र, गेल्या २४ तासांत पुन्हा रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. ही वाढ आधीच्या रुग्णसंख्येत तब्बल २३ टक्के आहे. बुधवारी देशात ४६ हजार १६४ करोनाबाधितांची नोंद करण्यात आली असून ६०७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, ३४ हजार १५९ जण बरे झाले आहेत. देशातील रिकव्हरी रेट ९७.६३ टक्क्यांवर आहे. विकली पॉझिटीव्हीटी रेट २.२ टक्क्यांवर असून डेली पॉझिटीव्हीटी रेट २.९८ टक्क्यांवर आहे. हा रेट गेल्या ३१ दिवसांपासून तीन टक्क्यापेक्षा खाली आहे.

सध्या देशात रोज येणाऱ्या करोना प्रकरणात केरळमधून ५१ टक्क्याहून अधिक रुग्ण आहेत. उत्सव काळात गर्दी टाळणं आवश्यक आहे. गर्दीमुळे करोना अधिक वेगाने पसरण्याची शक्यता आहे. सणासुदीच्या काळात अनिवार्य गर्दीच्या ठिकाणी दोन लस घेण्याची अट असावी असे इंडियन कॉन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे महासंचालक बलराम भार्गव यांनी मत व्यक्त केले.

त्यामुळे आगामी सणसुदीच्या दिवसात आता काळजी घेणे आवश्यक ठरणार असून सण सुदही साधेपणाने साजरे करावे लागणार आहेत.

About Editor

Check Also

आरोग्य योजनांच्या एकत्रीकरणासाठी ‘वॉर रूम’ची स्थापना कार्यकारी अधिकारी प्रविण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली वॉरची स्थापना

राज्यातील विविध आरोग्य योजनांचा समन्वय साधण्यासाठी, दुहेरी लाभ टाळण्यासाठी आणि सर्व आरोग्यविषयक योजनांची अंमलबजावणी एकाच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *