राज्य सरकारचा मोठा निर्णय: वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलल्या वैद्यकिय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी घेतला निर्णय

मराठी ई-बातम्या टीम

राज्यातील वाढत्या कोरोना आणि ओमायक्रॉन विषाणूच्या प्रभावामुळे राज्यातील वैद्यकीय विभागाकडून १७ आणि ३१ जानेवारी २०२२ पासून घेण्यात येणाऱ्या परिक्षा  एक महिना पुढे ढकलण्यात आल्या आहेत. तसेच या सर्व परिक्षा फेब्रुवारी महिन्यात घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्य सरकारने जारी केलेल्या प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.

त्याचबरोबर मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक शिकाऊ डॉक्टर्संना मोठ्या प्रमाणावर कोरोनाची लागण होत असल्याच्या घटना उघडकीस येत आहेत. त्यामुळे या शिकाऊ डॉक्टर्संना बरे होण्यास आणि त्यांना अभ्यास करण्यास पुरेसा अवधी मिळावा या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

ओमायक्रोन विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या परीक्षा आता येत्या १४ फेब्रुवारी २०२२ पासून घेण्यात येणार आहेत. या परीक्षा १७ जानेवारी २०२२ पासून सुरु होणार होत्या. तर पदवीच्या विद्यार्थ्यांच्या सर्व विद्याशाखांच्या परीक्षा ह्या दिनांक २८ फेब्रुवारी  २०२२ पासून घेण्यात  येणार आहेत. या परीक्षा ३१ जानेवारी २०२२ पासून सुरु  होणार होत्या.

राज्यात ओमायक्रोन विषाणूचा प्रादुर्भाव अधिक झाल्यास महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील संलग्न महाविद्यालयातील वैद्यकीय शिक्षक आणि  विद्यार्थी यांची रुग्णसेवेसाठी गरज भासू शकते हे लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्रती कुलपती तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

या बैठकीस विद्यापीठाच्या कुलगुरू, लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डॉ. माधुरी कानिटकर, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव डॉ. सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त श्री. विरेंद्र सिंग, संचालक, डॉ. दिलीप म्हैसेकर, सहसंचालक, डॉ. अजय चंदनवाले, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

About Editor

Check Also

आरोग्य योजनांच्या एकत्रीकरणासाठी ‘वॉर रूम’ची स्थापना कार्यकारी अधिकारी प्रविण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली वॉरची स्थापना

राज्यातील विविध आरोग्य योजनांचा समन्वय साधण्यासाठी, दुहेरी लाभ टाळण्यासाठी आणि सर्व आरोग्यविषयक योजनांची अंमलबजावणी एकाच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *