मंत्री प्रकाश आबिटकर यांची वैद्यकीय अधिकाऱ्यांना नववर्षाची भेट वैद्यकीय अधिकाऱ्यांना सेवा अखंड क्षमापित पत्राचे वितरण

आरोग्यसेवा आयुक्तालय मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात राज्यातील १९५ वैद्यकीय अधिकाऱ्यांना ‘सेवाखंड कालावधीत क्षमापित पत्राचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. गेली २० वर्ष प्रलंबित असलेल्या या प्रश्नाची सोडवणूक केल्याबद्दल वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आरोग्यमंत्री आबिटकर यांचे आभार मानले. यावेळी डॉक्टरांनी लोकांना अधिक चांगली आरोग्यसेवा देण्याची जबाबदारी पार पाडावी. चांगले काम करावे. तुमच्या हक्काच्या गोष्टी देण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे मंत्री आबिटकर म्हणाले.

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले की, नुकतेच १५० डॉक्टरांना ‘सेवा खंड कालावधी क्षमापित’ केले होते. एकूण ३४५ डॉक्टरांना पत्र देण्यात आले असून, उर्वरित सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना येत्या महिन्याभरात क्षमापण पत्राचे वितरण करण्यात येणार असल्याचे सांगितले. या ऐतिहासिक निर्णयामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांना अनेक प्रकारचे लाभ मिळू शकणार आहेत. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल वैद्यकीय अधिकाऱ्यांकडुन समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

पुढे बोलताना प्रकाश आबिटकर म्हणाले की, आरोग्य विभागात २००९ पूर्वी अस्थायी स्वरूपात अनेक वैद्यकीय अधिकारी कार्यरत होते. २००९ मध्ये या सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांचा शासकीय सेवेत समावेश झाला आहे. मात्र ‘सेवाखंड कालावधी क्षमापित नसल्याने त्यांना इतर लाभापासून वंचित राहावे लागत होते. वैद्यकीय अधिकारी यांचे संघटनेकडून याबाबत वारंवार मागणी होत होती. त्या अनुषंगाने पारदर्शकपणे सर्व पात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांना सेवाखंड क्षमापित करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे अनेक वैद्यकीय अधिकाऱ्यांची सलग सेवा ग्राह्य धरण्यात येणार असून त्यामुळे इतर आर्थिक व प्रशासकीय लाभ त्यांना मिळतील असेही यावेळी सांगितले.

प्रकाश आबिटकर पुढे बोलताना म्हणाले की, आरोग्यव्यवस्थेत समर्पित सेवा देण्याचा निश्चय करूया, या निर्णयामुळे आरोग्य सेवेत गुणात्मक वाढ होईल. नक्षलग्रस्त आदिवासी व डोंगरी भागात कार्यरत असणाऱ्या वैद्यकीय सेवेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेतनसह विशेष इन्सेटिव्ह देण्यासाठी देखील वित्त विभागास प्रस्ताव पाठवला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र उपजिल्हा रुग्णालय जिल्हा रुग्णालयात महात्मा फुले जन आरोग्य योजना सुरु झाली असून उपचारासाठी मान्य असलेल्या आजारांची संख्या वाढवून २३९९ करण्यात आली आहे . तज्ञ डॉक्टरांच्या मानधनातही भरघोस वाढ केली असल्याचे यावेळी सांगितले.

यावेळी उपसचिव केंद्रे, सहसंचालक राजेंद्र भालेराव, अवर सचिव गायकवाड, मुख्य प्रशासकीय अधिकारी कारेगावकर, आरोग्य विभागाचे इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

About Editor

Check Also

प्रकाश आबिटकर यांची माहिती, पॅलियेटिव्ह केअर आरोग्यसंपन्न महाराष्ट्रासाठी आणखी एक पाऊल पॅलियेटिव्ह केअर कार्यक्रम शुभारंभ व मेनोपॉज क्लिनिकचे राज्यस्तरीय लोकार्पण

राज्यातील जनतेला दर्जेदार आरोग्य सेवा देत आरोग्य संपन्न महाराष्ट्र घडविण्यासाठी राज्य शासनाने आरोग्य सेवेत आणखी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *