जागतिक कर्करोग दिनाचे औचित्य साधून राज्यातल्या अडीच कोटी महिलांच्या आरोग्य तपासणीची मोहीम राबवण्यात येत आहे. यासाठी ४३ हजार ४३५ आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात येत असून त्यापैकी १२५२ शिबिरे झाली असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधान परिषदेत दिली. सदस्य चित्रा वाघ यांनी महिलांमधील सर्वाधिक प्रमाणावर निदान होणाऱ्या …
Read More »महिला कर्करोगग्रस्तांसाठी आनंदाची बातमीः आता कर्करोगावर वर्षभरात लस केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची घोषणा
देशात कर्करोगाची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. विशेषतः महिलांमधील कर्करोग आजाराचे प्रमाण जास्त आहे. महिलांमध्ये वाढणाऱ्या कर्करोगाला आळा घालण्यासाठी लसीची निर्मिती केली जात आहे. विशेष म्हणजे कॅन्सरची लस पाच ते सहा महिन्यांत उपलब्ध होईल, अशी माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली असून ही लस ९ ते …
Read More »प्रकाश आबिटकर यांची माहिती, दोन हजार पदनिर्मितीसाठी शासनाची मान्यता राज्यातील ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र इ. आरोग्य संस्थामध्ये निर्माण होणार दोन हजार पद निर्मिती
राज्याचा सार्वजनिक आरोग्य विभाग अधिक सक्षम करण्यासाठी विभागांतर्गत विविध प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय स्थापन करण्यास शासनामार्फत मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार राज्यातील उपकेंद्र स्तरापासून ते जिल्हा रुग्णालय अशा आरोग्य संस्थांमध्ये शासनाने दोन हजार ७० पदनिर्मितीसाठी मान्यता दिली असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली आहे. पुढे बोलताना प्रकाश …
Read More »आंतरराष्ट्रीय मुखरोग शल्यचिकित्सक सप्ताह ११ ते १७ फेब्रुवारी विविध कार्यक्रम संपन्न
महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिनस्त असलेले शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, मुंबई या संस्थेच्या मुख शल्यचिकित्साशास्त्र विभागामार्फत ११ फेब्रुवारी ते १७ फेब्रुवारी, २०२५ दरम्यान “मुखरोग शल्यचिकित्सक सप्ताह” साजरा करण्यात आला. मुखरोग शल्यचिकित्सक सप्ताहाच्या अनुषंगाने आरोग्य भवनच्या सभागृहामध्ये ११ फेब्रुवारी २०२५ रोजी एका परिसंवादाचे आयोजन करण्यात आले …
Read More »हत्तीरोग दुरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहीमेचा शुभारंभ-राज्यातील ५ जिल्ह्यांत १० फेब्रुवारीपासून हत्तीरोगग्रस्त नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन- आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर
राष्ट्रीय जंतनाशक दिनाच्या निमित्ताने येत्या आज १० फेब्रुवारीपासून राज्यातील ५ जिल्ह्यांत हत्तीरोग दुरिकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहीम राबविण्यात येणार आहे. या राष्ट्रीयस्तरावर राबविण्यात येणाऱ्या मोहिमेचा शुभारंभ केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री जे. पी. नड्डा यांच्या हस्ते झाला असून, राज्य स्तरावर सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या मोहिमेला …
Read More »मोबाईल व्हॅन, रुग्णवाहिकांचे ९ फेब्रुवारी रोजी एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण आरोग्यसेवेच्या बळकटीकरणासाठी ठाणे येथे कार्यक्रमाचे आयोजन
राज्यात कर्करोग तपासणी व जनजागृती मोहीम राबविण्यात येत असून कर्करोग निदान व उपचारासाठी तसेच राज्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम, दर्जेदार आणि नागरिकांना सहजपणे उपलब्ध करून देण्यासाठी रविवार ९ फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात विविध आरोग्य सुविधांचे लोकार्पण होणार आहे. नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथे …
Read More »सर्व रुग्णालयातील औषधांची नवीन नियमावलीप्रमाणे गुणवत्ता तपासणी सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश
राज्यातील सर्व आरोग्य संस्था मधील औषधाचा उपलब्ध साठा व गुणवत्ता याची नवीन नियमावलीप्रमाणे तपासणी करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश अबिटकर यांनी दिले. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत हे निर्देश दिले आहेत. जिल्हास्तरापासून राज्य स्तरापर्यंत सर्वत्र तातडीने ही मोहीम हाती घेण्यात येणाऱ आहे. औषधांचा पुरेसा साठा ठेवावा राज्यातील सर्व …
Read More »प्रकाश आबिटकर यांची ग्वाही, पीसीपीएनडीटी कायदा अधिक प्रबळ करणार स्त्री आधार केंद्राच्या वतीने आयोजित विकासासाठी निरंतर वाटचाल
राज्य शासन महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी व सक्षमीकरणासाठी अनेक प्रभावी योजना राबवित आहे. या योजनेसोबत मुलींचा जन्मदर कमी होऊ नये यासाठी शासन प्रयत्नशील आहे. येत्या काळात स्त्रीभ्रूण हत्येला आळा घालण्यासाठी आणि मुलींचा जन्मदार वाढीसाठी पीसीपीएनडीटी कायदा अधिक प्रबळ करणार, असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले. …
Read More »‘जीबीएस’संदर्भात नागरिकांनी घाबरून जाऊ नये आरोग्य यंत्रणेने अलर्ट रहावे-पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे आवाहन
‘जीबीएस’ आजाराचे संशयित रुग्ण जिल्ह्यात आढळत आहेत. मात्र आरोग्य यंत्रणा सक्षम असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये. सातारा जिल्ह्यात ‘जीबीएस’ अर्थात गुइलन बॅरे सिंड्रोम या आजाराचे सात संशयित रुग्ण आढळले आहे. या पार्श्वभूमीवर पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण तथा साताराचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आरोग्य यंत्रणेची व्हीसीद्वारे बैठक घेऊन सतर्क …
Read More »आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचे आवाहन, कर्करोग प्रतिबंधासाठी जनजागृतीची गरज राज्यस्तरीय कर्करोग तपासणी व जनजागृती मोहिमेचा शुमारंभ
कर्करोगापासून बचाव करण्यासाठी राज्यात जनजागृती आवश्यकता असून वैद्यकीय क्षेत्रातील सर्व तज्ज्ञ याकामी सेवाभावाने काम करत आहेत. आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून हे काम अधिक चांगल्या पद्धतीने, अधिक गतीने आणि एकजुटीने करावे. कर्करोगावर मात करण्यासाठी योग्य औषध उपचारांबरोबर अत्याधुनिक आरोग्य केंद्राच्या उभारणीवर भर द्यावा लागणार असल्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज …
Read More »
Marathi e-Batmya