मुंबई: प्रतिनिधी कोरोना लॉकडाऊनमुळे राज्यात अडकलेल्या स्थलांतरीत मजूरांचे मानसिक आरोग्य स्वस्थ रहावे यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाने पुढाकार घेतला आहे. आधीच रोजगार बंद, घरच्यांपासून दूर आणि आर्थिक अडचणीमुळे या कामगारांना मानसिक अनारोग्याला सामोरे जावे लागत असल्याने विभागाने पुढाकार घेतला. सुमारे ९४४ निवारागृहांमध्ये हे मजूर राहत असून त्यांना प्रशासनामार्फत विविध सोयीसुविधा पुरविल्या …
Read More »दिलासादायक बातमी: अखेर केंद्राने राज्य सरकारचे ऐकले ‘पुल टेस्टींग’ आणि ‘प्लाझ्मा थेरपीला’ केंद्राने मान्यता दिल्याची आरोग्यमंत्री टोपे यांची माहिती
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील वाढत्या कोरोनाबाधीत रूग्णांवर उपचार करण्यासाठी प्लाझ्मा थेरपीला मान्यता द्यावी आणि रूग्णांची माहिती जमा करण्यासाठी पुल टेस्टींग करण्याची मागणी राज्य सरकारकडून सातत्याने केंद्राकडे करण्यात येत होती. अखेर राज्य सरकारच्या या दोन्ही मागण्यांना केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ.हर्षवर्धन यांनी मान्यता दिली. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्त रूग्णांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळाला. कोरोना …
Read More »राज्यात कोरोना बाधितांच्या संख्येत विक्रमी वाढ ७७८ नवीन रुग्णांचे निदान एकूण ६४२७ वर पोहोचली
मुंबई : प्रतिनिधी आज राज्यात कोरोनाबाधीत ७७८ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ६४२७ झाली आहे. आज ५१ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ८४० रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ५३०४ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ९६ …
Read More »राज्यातला वेग सात दिवसांवर : पाच हॉटस्पॉट कमी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
मुंबई: प्रतिनिधी राज्यात कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा वेग मंदावला असून हा कालावधी सात दिवसांवर गेला आहे. जागतिक आरोग्य संघटना, आयसीएमआर यांच्या मार्गदर्शक सूचनानुसार राज्य शासनामार्फत कोरोना प्रतिबंध आणि उपचार केले जात आहेत. राज्यात घाबरून जाण्याची स्थिती नाही. मुंबईमध्ये संस्थात्मक क्वारंटाईन वाढविण्यावर भर देण्याच्या सूचना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुंबई महापालिकेला …
Read More »कालच्या तुलनेत राज्यात १२१ कमी रूग्ण बाधीत ४३१ने संख्या वाढत ५ हजार ६ ४९ वर पोहोचली
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाग्रस्त रूग्णांच्या संख्येत मागील तीन दिवसांपासून वाढत राहीलेली संख्या आज कमी झाली आहे. आज दिवसभरात ४३१ रूग्णांचे निदान झाले असून काल रूग्णांची संख्या ५५२ वर पोहोचली होती. त्यातुलनेत आज १२१ ने कमी रूग्ण आढळून आले आहेत. तर १८ रूग्णांचे निधन झाले असून राज्यातील एकूण रूग्णांची संख्या ५ …
Read More »व्वा छान: साठीतील ९८ रूग्णांसह ५०० हून अधिक तरूण कोरोनामुक्त आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा वाढत असतानाच मंगळवारी एकाच दिवशी कोरोनाच्या १५० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. ही दिलासादायक बाब असून आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या ७२२ जणांपैकी पुरूषांची संख्या सर्वाधिक ४४१ असून २८१ महिला आहेत. त्यामध्ये ३१ ते ५० या वयोगटातील ३१८ रुग्णांचा समावेश आहे. त्या खालोखाल २१ ते ३० …
Read More »एकामुळे दुसऱ्या मंत्र्यांच्या कार्यालयातील कर्मचारीही अंडर ऑब्जर्व्हवेशनखाली ? मंत्रालयातील दोन कर्मचाऱ्यांना तपासणीसाठी नेले
मुंबई: प्रतिनिधी राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाही राज्य मंत्रिमंडळातील काही बेजबाबदार सदस्यांकडून नको त्या गोष्टींची उठाठेव केली जात आहे. सदर या मंत्र्यांमुळे त्यांच्याच सहकारी मंत्री कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाही कोरोनाच्या अंडर ऑब्जर्व्हव्हेशन खाली जावे लागल्याची माहिती मंत्रालयातील प्रत्यक्षदर्शीने दिली. राज्य मंत्रिमंडळातील एक मंत्री कोरोना निगेटीव्ह-पॉजीटीव्ह असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सतत सुरु …
Read More »मुंबई महानगरची ४ हजार तर राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ५ हजारावर ३ दिवसात १५०० ने वाढली: १९ जणांचा मृत्यू
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील मागील दोन दिवसात कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या १०१८ वर पोहचली होती. त्यात आज नव्याने ५५२ रूग्णांची नोंद झाल्याने तीन दिवसात १५०० ने संख्या वाढली असून कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या ५ हजार २१८ वर पोहोचली आहे. मुंबई महानगरातील रूग्णांची संख्या ४ हजार ७७ वर पोहोचली असून तर २४ तासात १९ …
Read More »कोरोना रुग्णालयात आता व्हेंन्टीलेटर नाहीतर ऑक्सिजन स्टेशन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी राज्यामध्ये असलेल्या तोकड्या व्हेंटीलेटरवरच्या संख्येवर तोडगा म्हणून कोरोना उपचारासाठी असलेल्या विशेष रुग्णालयांमध्ये आणि अलगीकरणाची (क्वारंटाईन) सुविधा असलेल्या ठिकाणी आता ऑक्सिजन स्टेशन उभारण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक खाटांवर आता ऑक्सिजन मास्क लावण्यात येईल आणि त्याला ऑक्सिजन पुरवठ्याची सोय त्याठिकाणी केली जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे …
Read More »राज्यात नवे ४६६ रूग्णांचे निदान तर ५७२ जणांना घरी पाठविले कोरोनाग्रस्तांची संख्या ४६६६ वर पोहोचली
मुंबई : प्रतिनिधी राज्यात कालच्या तुलनेत आज जवळपास १०० रूग्णांच्या संख्येत घट झाली असून आज ४६६ नव्या रूग्णांचे निदान झाले आहे. रविवारी हीच संख्या ५५२ वर पोहोचली होती. मात्र नव्याने निदान झालेल्या रूग्णांच्या संख्येत घरी पाठविलेल्या रूग्णांची संख्या ५७२ आहे. त्यामुळे एकाबाजूला रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत असली तरी रोज …
Read More »
Marathi e-Batmya