आयडॉलच्या एमएमएस व एमसीए प्रवेश परीक्षांचे अर्ज १२ जुलै २०२३ पासून ऑनलाईन सुरु दूरस्थ पध्दतीने घेता येणार शिक्षण

मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन अर्थात आयडॉल संस्थेला २०२३-२४ या शैक्षणिक वर्षांसाठी एआयसीटीई व यूजीसीने एमएमएस व एमसीए हे दोन अभ्यासक्रम दूरस्थ शिक्षणाच्या माध्यमातून सुरु करण्यास परवानगी दिली असून या अभ्यासक्रमाचे प्रवेश परीक्षांचे अर्ज ऑनलाईन माध्यमातून आजपासून ( बुधवार, दिनांक १२ जुलै २०२३ ) सुरु होत असून शेवटची तारीख २४ जुलै २०२३ आहे. तर एमएमएस व एमसीएची प्रवेश परीक्षा रविवार दिनांक १३ ऑगस्ट २०२३ रोजी ऑनलाईन होणार आहे.

२०२३-२४ या शैक्षणिक वर्षांपासून एआयसीटीई व यूजीसीने आयडॉलला मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (एमएमएस) या अभ्यासक्रमासाठी ७२० जागांची मान्यता दिली असून हा अभ्यासक्रम आयडॉलमधून दूरस्थ शिक्षणाच्या माध्यमातून आहे. हा अभ्यासक्रम एमबीए या अभ्यासक्रमाच्या समकक्ष आहे. तसेच आयडॉलमध्ये मास्टर ऑफ कॉम्प्युटर अँप्लिकेशन (एमसीए ) हा दोन वर्षाचा सुधारित अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमाला एआयसीटीई व यूजीसीने २००० जागांची मान्यता दिली आहे. एचआर, फायनान्स व मार्केटिंग या तीन विषयात एमएमएस हा अभ्यासक्रम करता येतो. या दोन्ही प्रवेश परीक्षेचे अर्ज ऑनलाईन माध्यमातून मागविण्यात येत असून ते विद्यापीठाच्या https://mu.ac.in/distance-open-learning या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ रवींद्र कुलकर्णी म्हणाले, मुंबई विद्यापीठाने एमएमएस व एमसीए सारखे महत्वाचे अभ्यासक्रम दूरस्थ माध्यमातून सुरु केले आहेत. नोकरी करणाऱ्यांसाठी व ज्या विद्यार्थ्यांना नियमित महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळू शकला नाही त्यांच्यासाठी हि एक संधी आहे.

About Editor

Check Also

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुक मतमोजणीप्रसंगी अडचण आली तरच ‘पाडू’चा वापर राज्य निवडणूक आयोगाकडून मतदानाच्या एक दिवस आधी माहिती

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या (बेल) मतदान यंत्राद्वारे झालेल्या मतदानाची मोजणी करताना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *